घराशी संबधित दस्तऐवज कसे तयार

करावेत

25 मार्च, 2019

एकदा का तुम्ही प्लॉट विकत घेण्याचा निर्णय घेतला की, तुमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत याची खात्री करा. त्यांच्याशिवाय तुमची खरेदी लांबणीवर पडेल.

बहुतेक आवश्यक कागदपत्रे कायदेशीर आणि वैयक्तिक अशा दोन प्रकारांमध्ये विभागता येऊ शकतात.

कायदेशीर कागदपत्रे: ही कागदपत्रे आवश्यक असतात आणि यापैकी एक देखील गहाळ झाल्यामुळे खरेदीला उशीर होऊ शकतो.

त्यामध्ये यांचा आंतर्भाव होतो:-


टायटल डीड, सेल डीड किंवा मदर डीड: विक्रेत्याकडून घेतले जाते

लॅंड क्लियरन्स: जर तुम्हाला शेतजमीनीचे बिगर शेती जमीनीत रूपांतर करायचे असेल तर

एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट (भार प्रमाणपत्र): जमीनीची नोंदणी असलेल्या उपनिबंधक कार्यालयातून प्राप्त होते

रेकॉर्ड ऑफ राइट्स (आरओआर) प्रमाणपत्र: तहसीलदारांच्या कार्यालयातून मिळवावे लागते.कथा प्रमाणपत्र: सहाय्यक महसूल अधिकाऱ्याकडून मिळवावे लागते. व्यक्तीगत कागदपत्रे : वैयक्तिक कागदपत्रे पूर्णपणे सत्यापनासाठी असतात उदा.: आधार, मतदार ओळखपत्र आणि पॅन कार्ड.

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी:

जर विक्रेता मालक नसेल तर 'पॉवर ऑफ अॅटर्नी' दस्तऐवज तपासा.

विक्रेत्याने नमूद केलेले मोजमाप अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वेक्षण खात्याकडून जमीनीचे सर्वेक्षण स्केच मिळवा.

जर एकापेक्षा जास्त मालक असतील, तर सर्व मालकांकडून 'रिलीज सर्टिफिकेट' मिळण्याची खात्री करा.


Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further
LOADING...