वॉटरप्रूफिंग च्या पद्धती, मॉडर्न किचन डिझाईन्स, home करता वास्तु टिप्स, घर बांधकाम खर्च

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा



घरासाठी वास्तुशास्त्रीय रंग : सकारात्मक ऊर्जा आणि सुसंवाद वाढवा

संतुलित आणि सौहार्दपूर्ण वातावरण तयार करण्यासाठी आणि सर्वांगीण ऊर्जा प्रवाह सुधारण्यासाठीचे घरांसाठीचे सर्वोत्तम वास्तुशास्त्रीय रंग जाणून घ्या.

Share:


रंग आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, आपल्या मनःस्थितीवर, भावनांवर आणि सर्वांगीण खुशालीवर ते परिणाम करतात. वास्तुशास्त्र या प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्राच्या क्षेत्रात, रंगांचा घरातील ऊर्जेच्या प्रवाहावर खोलवर परिणाम होतो असे मानले जाते. वास्तुशास्त्रीय तत्त्वांनुसार आपल्या घरातील वेगवेगळ्या खोल्यांसाठी योग्य रंगांची निवड केल्यास सौहार्दपूर्ण आणि सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होते. या ब्लॉगमध्ये आपण केवळ रंगकामाच्या सूचनाव्यतिरिक्त इतरही गोष्टी बघणार आहोत, आणि घर तसेच त्यातील विविध खोल्यांसाठीचे आदर्श वास्तुशास्त्रीय समजून घेणार आहोत. वास्तूशास्त्रीय दिशेनुसार भिंतीच्या रंगांचा वापर आणि सकारात्मक व चैतन्यपूर्ण वातावरण तयार करण्यासाठी या रंगांचा समावेश कसा करता येईल हे ही आपण जाणून घेणार आहोत.


वास्तु शास्त्रानुसार घराचे रंग



वास्तुशास्त्रीय तत्त्वांनुसार आपल्या घराच्या विविध भागांसाठी योग्य रंगांची निवड केल्यास सकारात्मक ऊर्जा प्रवाह आणि सर्वांगीण सुख:द वातावरणावर मोठा परिणाम होऊ शकतो. प्रत्येक विशिष्ट खोलीसाठी सुचवलेले वास्तुशास्त्रीय रंगांना समजून घेऊन घरातील वास्तुशास्त्रीय रंगांचा आढावा घेऊया :


1) वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरासाठीचे रंग

 

स्वयंपाकघर हे घराचे हृदय आहे आणि योग्य रंग त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणू शकतात. वास्तुशास्त्रानुसार केशरी, लाल, पिवळा आणि गुलाबी रंगाच्या छटा स्वयंपाकघरासाठी योग्य आहेत. ह्या उत्साहपूर्ण रंगछटा भूक उत्तेजित करतात आणि सकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देतात, ज्यामुळे आपला स्वयंपाक तसेच जेवण करण्याचा अनुभव अधिक आनंददायक होतो. या रंगांमुळे स्वयंपाकघरातील सकारात्मक ऊर्जा, चैतन्य आणि उत्साह वाढतो, असे मानले जाते. दुसरीकडे, काळ्या आणि राखाडी रंगांच्या छटा वापरणे टाळणे चांगले, कारण त्या उदासीत आणि सुस्त वातावरण तयार करू शकतात, ज्यामुळे जागेतील सर्वांगीण उर्जा कमी होते.

 

 

2) वास्तुशास्त्रानुसार शयनगृहासाठीचे रंग

 

शयनगृह ही विश्रांती आणि पुनरुज्जीवनाची जागा आहे. निळ्या, हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या हलक्या छटा सुखदायक मानल्या जातात आणि त्या शांततेची भावना वाढवतात. जेव्हा शयनगृहाचा विचार केला जातो तेव्हा शांत आणि निवांत वातावरण तयार करणे आवश्यक असते जे आरामदायक झोप आणि विश्रांतीस प्रोत्साहित करते. हलका हिरवा, निळा आणि जांभळा रंगांसारख्या सुखदायक रंगांची निवड करा. या शांत रंगांचा मनावर आणि शरीरावर शांत प्रभाव पडतो, ज्यामुळे आपल्याला दीर्घ दिवसानंतर विश्रांती मिळण्यास मदत होते. हे रंग शांती, सौहार्द आणि भावनिक खुशालीसह संबंधित आहेत. शयनगृहात चमकदार आणि उठून दिसणारे रंग वापरणे टाळा, कारण ते खूप उत्तेजक असू शकतात आणि विश्रांती घेण्याच्या आणि शांत झोपण्याच्या आपल्या क्षमतेस अडथळा आणू शकतात.

 

 

3) वास्तुशास्त्रानुसार दिवाणखानासाठीचे रंग

 

दिवाणखाना म्हणजे पाहुण्यांचे उठणे बसणे आणि आदरातीथ्य करण्याची जागा आहे. दिवाणखाना कुटुंब आणि मित्रांसाठी एकत्र येण्याची जागा म्हणून कार्य करते, म्हणून त्यासाठी उबदार आणि निमंत्रित वातावरण तयार करणारे रंग निवडणे महत्वाचे असते. या जागेसाठी पिवळा, हिरवा आणि निळा अशा चमकदार आणि चैतन्यमय रंगांची शिफारस केली जाते. हे रंग एकदिली, सामाजिक संवाद आणि सजीव वातावरणाला चालना देतात. तथापि, दिवाणखान्यात गडद आणि उग्र रंगांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यामुळे जागा लहान आणि कमी स्वागतार्ह दिसून येऊ शकते. हे रंग आनंद, वाढ आणि शांततेचे प्रतिनिधित्व करतात, ज्यामुळे ते चैतन्यमय वातावरणासाठी सर्वोत्तम ठरतात.

 

 

4) वास्तुशास्त्रानुसार पूजा घरासाठीचे रंग

 

पूजाघर हे प्रार्थना आणि ध्यानासाठीचे पवित्र स्थान आहे. हे रंग शुद्धता, प्रबोधन आणि अध्यात्माचे प्रतीक आहेत. या भागात, पांढरा रंग सर्वात शुभ रंग मानला जातो कारण तो पवित्रता आणि शांततेचे प्रतीक आहे. पूजाघरात पांढरा रंग हा प्रमुख रंग म्हणून वापरल्याने शांत आणि ईश्वरी वातावरण तयार होते. याव्यतिरिक्त, पिवळ्या, निळ्या किंवा गुलाबी रंगांच्या हलक्या छटा देखील सौम्य आणि शांत वातावरण प्रेरित करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. पूजाघरात गडद आणि उग्र रंगांचा वापर करणे टाळणे महत्वाचे आहे, कारण ते प्रार्थना आणि ध्यानासाठी आवश्यक शांत आणि सौम्य वातावरणात व्यत्यय आणू शकतात.

 

या विशिष्ट खोल्यांमधील रंगांना वास्तुशास्त्रीय तत्त्वांशी जोडून आपण सकारात्मक ऊर्जा वाढवू शकता आणि एक सलोख्याचे राहणी वातावरण तयार करू शकतात. प्रत्येक खोलीच्या इच्छित हेतूशी सुसंगत असे रंग निवडणे लक्षात ठेवा, ज्यामुळे आपल्या संपूर्ण घरात संतुलित आणि शुभ वातावरण सुनिश्चित होईल.

 

 

सारांश तक्ता :
 

  खोली

  वास्तुशास्त्रीय रंग

  हे रंग टाळा

  स्वयंपाकघर

  केशरी, लाल, पिवळा, गुलाबी

  काळा, राखाडी

  शयनगृह

  निळ्या, हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या हलक्या छटा

  झगझगीत भडक रंग

  दिवाणखाना

   पिवळा, हिरवा, निळा

  गडद आणि उग्र रंग

  पुजाघर

  पांढरा, हलका पिवळा, हलका निळा

  गडद आणि उग्र रंग

 

वास्तु दिशेनुसार भिंतीचे रंग



घरासाठी वास्तुशास्त्रीय रंग समजून घेताना, आपल्या घराची दिशा ही भिंतीचे आदर्श रंग निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. प्रत्येक दिशा विशिष्ट रंगांशी संबंधित आहे जी आपल्या राहण्याच्या जागेत सकारात्मक ऊर्जा आणि संतुलन वाढवू शकते. भिंतींच्या दिशेनुसार वास्तूशास्त्रीय रंगांचे सविस्तर स्पष्टीकरण येथे दिले आहे :

 

1) उत्तर

उत्तराभिमुख भिंतींसाठी हिरवा रंग आदर्श रंग आहे, कारण तो समृद्धी, वाढ आणि विपुलतेचे प्रतिनिधित्व करतो. तो पाण्याच्या घटकाशी संबंधित आहे, जे जीवन आणि पुनरुज्जीवन दर्शविते. आपल्या उत्तराभिमुख भिंती हिरव्या रंगात रंगविल्यास संपत्ती आणि यश आकर्षित होऊ शकते आणि आपल्या घरात सौहार्द आणि संतुलनाची भावना देखील वाढू शकते.

 

2) पूर्व

पूर्वाभिमुख भिंतींसाठी पांढऱ्या रंगाची शिफारस केली जाते, कारण तो शुद्धता, उदबोधन आणि नवीन सुरुवातीचा प्रतीक आहे. पूर्व दिशा हवेच्या घटकाशी संबंधित आहे, जी ज्ञान आणि सुजाणतेची प्रतीक आहे. आपल्या पूर्वाभिमुख भिंतींना पांढरा रंग दिल्यास स्पष्टता आणि मोकळेपणाची भावना निर्माण होते,ज्यातून सकारात्मक विचार आणि बौद्धिक वाढीस उत्तेजन मिळते.

 

3) दक्षिण

वत्सलता, ऊर्जा आणि चैतन्य आणण्यासाठी दक्षिणाभिमुख भिंतींवर लाल आणि पिवळ्या रंगाचा वापर करावा. दक्षिण दिशा अग्नीच्या घटकाशी संबंधित आहे, जी उत्कटता, धैर्य आणि परिवर्तनाचे प्रतिनिधित्व करते. लाल रंग शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे, तर पिवळा रंग आनंद आणि आशावादाचे प्रतीक आहे. आपल्या दक्षिणाभिमुख भिंतींवर या रंगांना अंतर्भूत केल्यास आपल्या घरात एक तरतरीत आणि ऊर्जावान वातावरण तयार होऊ शकते.

 

4) पश्चिम

पश्चिमाभिमुख भिंतींसाठी निळा रंग सर्वोत्तम आहे, कारण तो शांतता, सौहार्द आणि भावनिक संतुलन दर्शवितो. पश्चिम दिशा धरतीच्या मूलद्रव्याशी संबंधित आहे, जी स्थिरता आणि आधार दर्शविते. आपल्या पश्चिमाभिमुख भिंती निळ्या रंगात रंगवून, एक सुखदायक आणि शांत वातावरण तयार केले जाऊ शकते, जे विश्रांती आणि भावनिक खुशालीस प्रोत्साहित करते.

 

5) ईशान्य

पांढरा आणि हलका निळा रंग ईशान्येकडे असलेल्या भिंतींसाठी शुभ रंग आहेत, कारण ते अध्यात्म, शांती आणि दैवी मार्गदर्शनास प्रोत्साहन देतात. ईशान्य दिशा वास्तुशास्त्रात सर्वात शुभ मानली जाते, कारण ती आध्यात्मिक वाढ आणि प्रबोधनाशी संबंधित आहे. आपल्या ईशान्येकडील भिंतींवर या रंगांना अंतर्भूत केल्यास एक शांत आणि सौम्य वातावरण तयार होऊ शकते, जे ध्यान आणि आत्मपरीक्षणासाठी अनुकूल आहे.

 

6) आग्नेय

चंदेरी आणि हलका राखाडी रंग आग्नेय बाजूच्या भिंतींसाठी आदर्श आहे, कारण ते लावण्य, प्रकृष्टन आणि आधुनिकतेचे प्रतिनिधित्व करतात. आग्नेय दिशा अग्नीच्या घटकाशी संबंधित आहे, जी कल्पकता आणि आसक्तीचे प्रतीक आहे. आपल्या आग्नेयाभिमुख भिंती चंदेरी किंवा हलक्या करड्या रंगात रंगविणे कलात्मक अभिव्यक्ती आणि नाविन्यपूर्णतेस प्रेरणा देऊ शकते आणि आपल्या घराला लालित्याचा एक अंश देखील प्रदान करून शकते.

 

7) नैऋत्य

लालसर गुलाबी आणि हलका तपकिरी रंग नैऋत्य-मुख भिंतींसाठी योग्य आहेत, कारण ते वत्सलता, आराम आणि स्थिरतेची भावना निर्माण करतात. नैर्ऋत्य दिशा धरतीच्या मूलद्रव्याशी संबंधित आहे, जी भूमिस्थपणा आणि स्थिरता दर्शवते. आपल्या नैर्ऋत्याभिमुख भिंतींवर या रंगांना अंतर्भूत केल्यास आरामदायक आणि पोषक वातावरण तयार होऊ शकते, जे भावनिक खुशाली आणि सुरक्षिततेच्या भावनेस प्रोत्साहन देऊ शकते.

 

8)वायव्य

वायव्याभिमुख भिंतींसाठी पांढऱ्या आणि हलक्या करड्या रंगाची शिफारस केली जाते, कारण ते शुद्धता, स्पष्टता आणि मानसिक लक्ष केंद्रित असण्याचे प्रतीक आहेत. वायव्य दिशा हवेच्या घटकाशी संबंधित आहे, जी संवाद आणि बौद्धिक वाढ दर्शविते. आपल्या वायव्याभिमुख भिंती पांढऱ्या किंवा हलक्या करड्या रंगाने रंगविणे मुक्त संवाद आणि स्पष्ट विचारांना प्रोत्साहित करते, जे निरोगी नातेसंबंध आणि वैयक्तिक वाढीस प्रोत्साहन देते.

 

आपल्या भिंतींच्या दिशेनुसार योग्य वास्तुशास्त्रीय रंगांचा समावेश करून, आपण आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा प्रवाह, संतुलन आणि सलोखा वाढवू शकतात, आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी एक चैतन्यमय आणि पोषक राहण्याची जागा तयार करू शकतात.

 

सारांश तक्ता :

 

दिशा

वास्तुशास्त्रीय रंग

उत्तर

हिरवा

पूर्व

पांढरा

दक्षिण

लाल, पिवळा

पश्चिम

निळा

ईशान्य

पांढरा, हलका निळा

आग्नेय

चंदेरी, हलका करडा

नैऋत्य

लालसर गुलाबी, हलका तपकिरी

वायव्य

पांढरा, हलका करडा



घराच्या बाह्य आणि अंतर्गत भागासाठी योग्य वास्तुशास्त्रीय रंगांचा वापर केल्यास सर्वांगीण ऊर्जा प्रवाह, संतुलन आणि सलोखा लक्षणीयरित्या वाढू शकतो. वर नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, आपण आपल्या राहण्याच्या जागेत सकारात्मक आणि चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण करू शकता. लक्षात ठेवा, वास्तुशास्त्राच्या तत्त्वांचे पालन करताना आपल्या व्यक्तिमत्त्वाशी आणि आवडीनिवडीशी सुसंगत रंगांची निवड करणे महत्वाचे आहे. वास्तूविषयी अधिक सखोल माहितीसाठी, आपण "घरासाठी वास्तु टिप्स" हा लेख देखील पाहू शकतात.



संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ





घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....