होम बिल्डिंग गाईड
आमचे प्रॉडक्ट्स
उपयोगी टूल्स
प्रॉडक्ट्स
अल्ट्राटेक बिल्डिंग प्रॉडक्ट्स
कोणत्याही बांधकामाचे, विशेषत: घरांचे आणि इमारतींचे आयुर्मान वाढविण्यासाठी वॉटरप्रूफिंग महत्त्वाचे असते. वॉटरप्रूफिंग साहित्य वापरल्यामुळे आतील भिंतींचे संरक्षण होते, बांधकामाच्या हानीला, धातूला गंज लागण्यास आणि लाकूड कुजण्यास आळा घातला जातो.
Uअल्ट्राटेक वेदर प्रो वॉटरप्रूफिंग बांधकामाच्या दरम्यान वापरण्यासाठी खास तयार करण्यात आलेली प्रतिबंधात्मक वॉटरप्रूफिंग सिस्टीम आहे. वेदर प्रो सिस्टीम परिणामकारकपणे तुमच्या घराचे ओलसरपणापासून संरक्षण करते. आमच्या वेदर प्रो वॉटरप्रूफिंग सिस्टीममध्ये दोन घटक असतात:
ओलरसरपणा तुमच्या घरात छत, बाहेरील भिंती, जमीन आणि अगदी पायातूनही येऊ शकता. म्हणून तुमच्या घराच्या मजबुतीचे ओलसरपणापासून संरक्षण करण्यासाठी तुमचे संपूर्ण घर अल्ट्राटेक वेदर प्लसने बांधून घ्या. अल्ट्राटेक वेदर प्लस पाण्याला दूर सारते आणि घराला ओलसरपणापासून अधिक चांगले संरक्षण पुरविते.
तुमच्या घरात जी नको असलेली आर्द्रता घुसते, त्याला दमटपणा म्हणतात. ओलसरपणा हा तुमच्या घराच्या दृढतेचा सर्वात मोठा शत्रू आहे. ओलसरपणा एकदा तुमच्या घरात घुसला, की तो जलदगतीने पसरतो आणि तुमच्या घराचे बांधकाम आतून पोकळ आणि कमकुवत बनते. ओलसरपणामुळे तुमच्या घराचे आयुष्य कमी करतो आणि परिणामस्वरूपी त्यातून पाणी आत झिरपू लागते.
ओलसरपणा घराच्या कोणत्याही भागातून आत घुसू शकतो. तो छतातून आणि भिंतींतून आत घुसू शकतो आणि संपूर्ण घरात वेगाने पसरतो. तो घराच्या पायातूनही आत घुसतो आणि भिंतींच्या माध्यमातून पसरतो.
ओलसरपणामुळे पोलादाला गंज लागतो आणि आरसीसीमध्ये तडे येतात, ज्यामुळे बांधकामाची मजबुती कमी होते. यामुळे घराचे बांधकाम आतून पोकळ आणि कमकुवत होते, परिणामस्वरूपी त्याच्या टिकाऊपणावर परिणाम होतो. दुर्दैवाने, ओलसरपणा दिसून येईपर्यंत त्याने आधीच हानी केलेली असते.
ओलसरपणा हा बरा न होणाऱ्या रोगासारखा असतो, ज्यामुळे तुमचे घर आतून पोकळ आणि कमकुवत होते. ओलसरपणा एकदा घरात घुसला की, त्यापासून मुक्ती मिळवणे अशक्य असते. वॉटरप्रुफिंगच्या, रंगाचा किंवा डिस्टेंपरचा पातळ थराच्या लवकरच पोपडे पडतात आणि त्यामुळे ओलसरपणापासून दीर्घ काळापर्यंत संरक्षण मिळत नाही. पुन्हा प्लॅस्टर करणे आणि पुन्हा पेंटिंग करणे हे खर्चिक आणि गैरसोयीचे असले तरीही त्यापासून तुम्हाला फक्त तात्पुरता दिलासा मिळतो. म्हणून, तुमच्या घराचे ओलसरपणापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शहाणपणाचे ठरते.