भारतातील काही मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांशी निगडीत असल्याचा अल्ट्राटेकला अभिमान वाटतो, ज्यायोगे कंपनीच्या उच्च दर्जाच्या सिमेंट, काँक्रिट आणि संलग्न उत्पादनांच्या पुरवठ्याद्वारे त्यांना हातभार लावला जातो. “अभियंत्यांची निवड किंवा पसंती’ असल्यामुळे भारताच्या प्रगतीमध्ये हातभार लावणा-या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा अल्ट्राटेक हा पसंतीचा ब्रँड आहे. या प्रकल्पांची गंभीरता आणि राष्ट्र निर्माणाशी या प्रकल्पांचा संबंध लक्षात घेत अल्ट्राटेकने प्रकल्पाच्या काँक्रिट आणि सिमेंटच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिने प्रकल्पाच्या ठिकाणी समर्पित प्रकल्प उभारले आहेत, जे आवश्यक दर्जा मानकांनुसार उत्पादनाला कस्टमाइझ करतात आणि वास्तववादी कालावधीत ते उत्पादन उपलब्ध करुन देतात. वांद्रे - वरळी सी लिंक, मुंबई मेट्रो, बेंगळुरू मेट्रो आणि कोलकाता मेट्रो या सर्वांचे निर्माण अल्ट्राटेक सिमेंटच्या मजबूत आणि उच्च दर्जाच्या मानकांवर करण्यात आले आहे.