उत्कृष्टबांधकाम
एएफसीओएनने भारतातील सर्वात लांब रेल्वे पूल बांधण्याचा सन्मान मिळवला असून हा पुल 4.62 किलोमीटर लांब आहे आणि वल्लरपदम द्वीपाला उत्तर कोचीतील इडापल्लीशी जोडतो . रेल्वे विकास निगम लिमिटेडसाठी (आरव्हीएनएल) हा प्रकल्प हाती घेण्यात आला आणि 27 महिन्यांत तो पूर्ण झाला. हा राष्ट्रीय विक्रम होता. जरी डिझाइन आरव्हीएनएलचे असले तरी कंपनीने आपल्या कौशल्याचा उपयोग करून त्यात बदल केला आणि त्याला इन-हाऊस प्रोजेक्ट बनवले.
काँक्रिटच्या पंपिंगसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा 2.1 किलोमीटर लांबीसोबत वापर करून हा पूल अतिशय कमी कालावधीत बांधण्यात आला. एका महिन्यात सुमारे500 मीटर चा विक्रमी वेग असलेल्या अत्याधुनिक गर्डर लाँचरच्या मदतीने पुलाचे गर्डर उभारण्यात आले. एनआरएस मलेशियाच्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत लाँचिंग-ट्रसचा परिचय हे प्रकल्पाच्या डिलिव्हरीमधल्या सर्वोत्कृष्ठतेच्या क्षेत्रातले आणखी एक मोठे नावीन्य आहे. या पुलावर पाइल फाउंडेशनवर घाटांवर प्री-कास्ट गर्डरचे 134 स्पॅन विराजमान आहेत.
कंपनीने संपूर्ण करार कालावधीत कडक सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण यंत्रणा आणि प्रक्रियांची देखरेख केली आहे. या ठिकाणी राखून ठेवलेले सुरक्षा मानक आंतरराष्ट्रीय मानकांच्या तोडीचे होते आणि हा प्रकल्प शून्य मृत्यूच्या नोंदीने पूर्ण करण्यात आला.
या प्रकल्पासाठी एएफसीओएनला इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूटकडून 'बेस्ट प्री-स्ट्रेसिंग स्ट्रक्चर फॉर द इयर 2010’, डी अँड बी अॅक्सिस बँक इन्फ्रा अवॉर्ड्स 2011मध्ये “बेस्ट प्रोजेक्ट इन रेल्वेज श्रेणीत’ आणि 'सीएनबीसी नेटवर्क 18 द्वारे ’सीएनबीसी टिव्ही 18 एस्सार स्टील इन्फ्रास्ट्रक्चर एक्सलन्स अवॉर्ड्स2011' पुरस्कार मिळाले आहेत.