Share:
होम बिल्डिंग गाईड
आमचे प्रॉडक्ट्स
उपयोगी टूल्स
प्रॉडक्ट्स
अल्ट्राटेक बिल्डिंग प्रॉडक्ट्स
Share:
काँक्रीट कॉम्पॅक्शन म्हणजे ताज्या टाकलेल्या काँक्रीटमधील अडकलेल्या हवेचे प्रमाण दृढीकरण(कंसोलिडेशन) करून कमी करण्याची प्रक्रिया होय. ते पोकळी दूर करून, घनता वाढवून आणि खडी आणि सिमेंट पेस्ट दरम्यान चांगले बंधन वाढवून काँक्रीटची एकंदर गुणवत्ता सुधारते. काँक्रीट च्या बांधकामाची मजबूती, टिकाऊपणा आणि दीर्घायुष्य यांच्यासाठी कॉम्पॅक्शन महत्त्वपूर्ण योगदान देते. योग्य कॉम्पॅक्शन प्राप्त करून, आपण काँक्रीटमध्ये विविध प्रकारच्या भेगा जाणे टाळू शकता आणि त्याचे एकंदरीत आयुष्य वाढवू शकता.
अनेक काँक्रीट कॉम्पॅक्शन पद्धती अस्तीत्वात आहेत, प्रत्येकाचे अद्वितीय फायदे आणि अनुप्रयोग आहेत. त्या प्रत्येकाचा पुढील भागात आढावा घेऊया.
मॅन्युअल कॉम्पॅक्शन, ज्याला काँक्रीटचे हँड कॉम्पॅक्शन देखील म्हणतात, त्यात काँक्रीट कॉम्पॅक्ट करण्यासाठी हँडहेल्ड(हातात धरता येणारी) साधने वापरून मजुरांचे शारीरिक कष्टाचा सहभाग समाविष्ट आहेत. या पद्धतीसाठी सामान्यत: ट्रॉवेल(थापी), टॅंपर(ठासणी) आणि रॉड वापरले जातात. हे लहान-मोठ्या प्रकल्पांसाठी किंवा मोठ्या कॉम्पॅक्शन उपकरणांसाठी मर्यादित प्रवेश असलेल्या क्षेत्रांसाठी योग्य आहे.
मॅन्युअल कॉम्पॅक्शन दरम्यान, मजूर काँक्रीटचे मिश्रण वारंवार दाबून, टॅम्प करून आणि आघात करून काळजीपूर्वक काम करतात जेणेकरून हवेची पोकळी काढून टाकली जाईल आणि चांगले कॉम्पॅक्शन प्राप्त होईल. कुशल कामगार मर्यादित जागेतील किंवा गुंतागुंतीच्या सळई असलेल्या भागात प्रभावीपणे काँक्रीट कॉम्पॅक्ट करू शकतात. तथापि, मॅन्युअल कॉम्पॅक्शन वेळखाऊ असू शकते आणि योग्य कॉम्पॅक्शन सुनिश्चित करण्यासाठी अनुभवी मजुरांची आवश्यकता असते.
दाब आणि धक्के देण्याची तंत्रे सामान्यत: प्रयोगशाळेच्या वातावरणात किंवा प्रीकास्ट काँक्रीट उत्पादनात वापरली जातात. या पद्धतीत, हवेची पोकळी दूर करण्यासाठी आणि एकसमान घनता सुनिश्चित करण्यासाठी काँक्रीटच्या नमुन्यावर दाब किंवा आघात भार लावला जातो. प्रयोगशाळेच्या वातावरणात, कॉम्पॅक्शन उपकरण किंवा कॉम्पॅक्शन फॅक्टर उपकरण यासारख्या विशिष्ट उपकरणांचा वापर केला जातो. ही उपकरणे काँक्रीटच्या नमुन्यावर दबाव देतात, ज्यामुळे ते कॉम्पॅक्ट होते आणि त्याच्या गुणधर्मांची अचूक चाचणी आणि विश्लेषण करणे शक्य होते.
प्रीकास्ट काँक्रीट निर्मितीमध्ये धक्का देणारा टेबल किंवा व्हायब्रेटिंग टेबलचा वापर केला जातो. या टेबलांवर काँक्रीट ठेवले जाते आणि वेगवान उभ्या दिशेतील व्हायब्रेशनस् लावली जातात, ज्यामुळे मिश्रण खाली बसते आणि अडकलेली हवा निघून जाते. ही काँक्रीट कॉम्पॅक्शन पद्धत बर्याचदा उच्च-कार्यक्षमता असलेले काँक्रीट तयार करण्यासाठी वापरली जाते ज्यास इष्टतम मजबूती आणि टिकाऊपणासाठी कसून कॉम्पॅक्शन करणे आवश्यक असते.
स्पिनिंगद्वारे (गरगर फिरवून) काँक्रीटचे कॉम्पॅक्शन हे विशिष्ट अनुप्रयोगांमध्ये वापरले जाणारे एक विशेष तंत्र आहे. उच्च-कार्यक्षमता असलेले काँक्रीट तयार करण्याची त्याची प्रभावीता ही सामान्यत: पाईप, खांब आणि इतर बेलनाकार घटकांसारख्या प्रीकास्ट काँक्रीट उत्पादनांच्या निर्मितीत वापरली जाते.
या पद्धतीत काँक्रीटने भरलेला साचा भरधाव वेगाने गरगर फिरवला जातो. फिरताना निर्माण होणारे अपकेंद्री बल प्रभावीपणे अडकलेली हवेची पोकळी बाहेर काढून टाकते आणि काँक्रीटचे घनीकरण करते. ही काँक्रीट कॉम्पॅक्शन पद्धत एकसमान घनता सुनिश्चित करते आणि उच्च-गुणवत्तेचे प्रीकास्ट घटक साध्य करण्यास मदत करते.
काँक्रीटमध्ये प्रभावी कॉम्पॅक्शन प्राप्त करण्यासाठी काँक्रीट कॉम्पॅक्शन मशीन, विशेषत: मेकॅनिकल व्हायब्रेटर ही सर्वात मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत आहे. यात काँक्रीटला कंपने देण्यासाठी मेकॅनिकल व्हायब्रेटरचा वापर केला जातो, परिणामी चांगले कॉम्पॅक्शन होते. तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की सेल्फ कॉम्पॅक्टिंग काँक्रीट किंवा सेल्फ कॉन्सॉलिडेटिंग काँक्रीट (एससीसी) सारख्या विशिष्ट प्रकारच्या द्रव काँक्रीट मिश्रणांसाठी व्हायब्रेटर वापरण्याची आवश्यकता नसते.
विविध प्रकारचे मेकॅनिकल व्हायब्रेटर उपलब्ध आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या अनुप्रयोगांसाठी योग्य आहे, त्यापैकी काही येथे दिले आहेत:
एमर्जन(विसर्जन) किंवा इंटरनल(अंतर्गत) व्हायब्रेटर म्हणून देखील ओळखले जाते, निडल व्हायब्रेटर सामान्यत: भिंती, कॉलम आणि इतर अरुंद भागांमध्ये काँक्रीट कॉम्पॅक्ट करण्यासाठी वापरले जातात. या व्हायब्रेटरमध्ये लवचिक शाफ्टला जोडलेले व्हायब्रेट करणारे शीर्ष टोक असते. व्हायब्रेट करणारे टोक नियमित अंतराने काँक्रीटमध्ये घातले जाते, ज्यामुळे व्हायब्रेशन्स मिश्रण प्रवाही करू करतात, हवेची पोकळी काढून टाकतात आणि एकसमान काँक्रीट कॉम्पॅक्शन प्राप्त करून देतात.
सर्फेस व्हायब्रेटर, ज्याला स्क्रीड किंवा पॅन व्हायब्रेटर देखील म्हणतात, ही एक काँक्रीट कॉम्पॅक्शन पद्धत आहे जी काँक्रीट स्लॅब, फूटपाथ आणि सपाट पृष्ठभाग कॉम्पॅक्ट करण्यासाठी वापरली जाते. हे व्हायब्रेटर काँक्रीटच्या पृष्ठभागावरून फिरविली जातात, ज्यामुळे एकाच वेळी ते सपाट केले जाते आणि अतिरिक्त हवेची पोकळी देखील काढून टाकली जाते. सर्फेस व्हायब्रेटर विशेषतः मोठ्या आडव्या पृष्ठभागांवर गुळगुळीत फिनिश प्राप्त करण्यासाठी प्रभावी असतात.
फॉर्मवर्क व्हायब्रेटर हे विशेषत: फॉर्मवर्कमध्ये काँक्रीट घनीकरण करण्यासाठी डिझाइन केलेले असतात. आत बसविलेल्या सळईभोवती योग्य काँक्रीट कॉम्पॅक्शन सुनिश्चित करण्यासाठी आणि गुळगुळीत पृष्ठभाग फिनिश प्राप्त करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. भिंती, बीम आणि कॉलम यासारख्या उच्च-गुणवत्तेच्या काँक्रीट घटकांसाठी फॉर्मवर्क व्हायब्रेटर आवश्यक असते.
टेबल व्हायब्रेटरचा वापर प्रीकास्ट पॅनेल किंवा फरशी सारख्या पातळ काँक्रीट घटकांना कॉम्पॅक्ट करण्यासाठी केला जातो. काँक्रीट एका व्हायब्रेटिंग टेबलवर ठेवले जाते, जे संपूर्ण पृष्ठभागाला व्हायब्रेटरी हालचाल प्रदान करते. या काँक्रीट कॉम्पॅक्शन पद्धतीची हालचाल प्रभावीपणे पोकळी काढून टाकते आणि घनता वाढवते, पातळ विभागांमध्ये कंपन तयार करून काँक्रीटचे उत्कृष्ट कॉम्पॅक्शन सुनिश्चित करते.
थोडक्यात, मजबूत आणि टिकाऊ काँक्रीट बांधकाम प्राप्त करण्यात काँक्रीट कॉम्पॅक्शन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अडकलेली हवेची पोकळी काढून टाकून आणि मिश्रण घनीकृत करून, कॉम्पॅक्शन काँक्रीटची मजबूती, घनता आणि अपार्यता वाढवते. आपण मॅन्युअल कॉम्पॅक्शन, दाब आणि धक्के, स्पीनिंग किंवा व्हायब्रेशन(कंपन) द्वारा मेकॅनिकल कॉम्पॅक्शन यापैकी कोणतीही पद्धत निवडले तरी योग्य तंत्रांचे अनुसरण करणे आणि योग्य उपकरणे वापरणे आवश्यक आहे.
आपल्या काँक्रीट बांधकामाचे दीर्घायुष्य आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी कॉम्पॅक्शन कसे करावे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, काँक्रीटवरील कॉम्पॅक्शनवरील माहितीपूर्ण व्हिडिओ येथे दिला आहे.