होम बिल्डिंग गाईड
आमचे प्रॉडक्ट्स
उपयोगी टूल्स
प्रॉडक्ट्स
अल्ट्राटेक बिल्डिंग प्रॉडक्ट्स
अल्ट्राटेकचे पोर्टलॅंड पोझ्झोलाना सिमेंट त्याच्या कार्यक्षमतेसाठी प्रसिध्द आहे. स्फेरिकल सिमेंट कणांमध्ये सर्वोच्च फाइननेस मूल्य आढळते, ते अधिक मुक्तपणे फिरतात आणि छिद्रे अधिक चांगल्याप्रकारे भरण्याची मुभा देतात. यामुळे खासकरुन ऊष्ण तापमान स्थितींमध्ये सिमेंटच्या स्लंप हानीचा दर कमी होतो. पीपीसी सिमेंट आपल्या कमी जल सामुग्रीमुळे गळती थांबवून पाण्याचे गळती होणारे मार्ग बंद करते.
पीपीसी अतिशय सुक्ष्म स्वरुपाचे असल्यामुळे त्याचा पेस्ट वॉल्युम वाढवते, ज्यामुळे कॉंक्रीटचा स्टीलसोबत सुधारीत बंध निर्माण होण्यात परिणाम होतो. सिमेंट सुरुवातीच्या हायड्रेशनाध्ये चुनखडक/लाइमला मुक्त करते, ज्यामुळे पोकळ्या कमी होतात आणि परिणामत: कॉंक्रीटची पारगम्यता कमी होते, ज्यामुळे टिकाऊपणा मिळतो. यामुळे संरचनेमध्ये सुक्ष्म भेगांच्या विकासाला आळा बसतो, यामुळे संरचनेची मजबूती वाढते.
अतिशय उच्च प्रमाणात टिकाऊपणा आणि सल्फेट, पाणी तसेच रासायन आक्रमणांना प्रतिरोध असल्यामुळे याचा वापर समुद्र किना-यालगतच्या इमारतीच्या, समुद्री संरचनांच्या, पाण्यातील ब्रीच पियर्सम ऍबटंमेंट्स आणि आक्रमक स्वरुपाच्या वातावरण स्थितींमध्ये बांधकाम करण्यासाठी केला जाऊ शकतो.
पोझ्झोलॅनिक सामुग्रीची हायड्रेटिंग पोर्टलॅंड सिमेंटने मुक्त केलेल्या कॅल्शिअम हायड्रॉक्साइडसोबत अभिक्रिया होऊन सिमेंटिटिअस संयुगे तयार होत असल्यामुळे पीपीसी अपारगम्यता आणि कॉंक्रीटची घनता वाढवते. याचा उपयोग अतिशय आत्मविश्वासाने हायड्रोलिक संरचना, समुद्री कार्ये, मोठ्याप्रमाणावर कॉंक्रीटिंग इ.च्या बांधकामासाठी करता येतो. यामुळे कॉंक्रीटचे अल्कली ऍग्रिगेटच्या अभिक्रियांपासून रक्षण होते.