First slide [800x400] First slide [800x400]

तुमच्या घराच्या बांधकामासाठी तुम्ही कंत्राटदार नियुक्त करणे का महत्वाचे आहे ते इथे दिले आहे

तुमच्या घराच्या बांधकामात अनेक लोकांचा सहभाग असतो. मालक-तुम्ही आणि तुमचे कुटुंब, आर्किटेक्ट-जो घराचे डिझाइन करतो, कामगार व मेसन्स-जे तुमचे घर बांधतात आणि कंत्राटदार- जो सगळ्या बांधकाम कृतीचे नियोजन करतो आणि समन्वय साधतो. प्रत्येक व्यक्ती तुमच्या घराच्या निर्माणात अंतर्गत सहभाग घेत असली तरी कंत्राटदाराची भूमिका अतिशय महत्वाची असते, ज्यात बांधकाम प्रोजेक्ट दिलेल्या वेळेत व बजेटमध्ये पूर्ण करण्याची शाश्वती मिळते.

कंत्राटदाराची भूमिका:
 
थोडक्यात सांगायचे तर, स्ट्रक्चरल इंजिनिअर सिव्हिल इंजिनियर आहे जो आपल्या घराच्या संरचनेच्या अखंडतेचे मूल्यांकन करण्यात पारंगत आहे. ते महत्वपूर्ण बाबींचे विश्लेषण करतात उदा.पायाची दृढता, स्थिरता आणि भिंतींची भार धारण करण्याची क्षमता आणि सिमेंट, स्टील, ऍग्रिगेट इ.वापरलेल्या सामुग्रीचा दर्जा
1

नियोजन

 

तुमच्या घराच्या संकल्पनेला सत्यात आणण्यासाठी तुम्हाला नियोजनाची आवश्यकता असते. कंत्राटदार आपल्याला बांधकाम टप्प्यासाठी सज्ज होण्यास मदत करण्याच्या दृष्टीने नियोजन, टाइमलाइन आणि बजेट आखण्यात मदत करतो.

2

प्रोजेक्ट व्यवस्थापन

 

एकदा नियोजन कार्यान्वित झाले की, कंत्राटदार तुमच्या घराच्या बांधकामादरम्यान सर्व खबरदारी घेतल्या जाण्याची खात्री करुन घेण्यासाठी, सामुग्री खरेदीपासून मेसन्स आणि कामगारांना नेमण्यापर्यंत प्रत्येक वस्तूचा मागोवा ठेवत व्यवस्थापकाची भूमिका बजावतो

3

प्रोजेक्टचे पर्यवेक्षण

 

मेसन्स आणि कामगार वीट आणि टाइल लावतात, कंत्राटदाराच्या मार्गदर्शनानुसार तुमचे घराला आकार घेते. कंत्राटदाराने साइटवर होत असलेल्या कामाशी समन्वय साधला पाहिजे आणि प्रत्येक लहान बदल आणि विकासाबद्दल जागरूक असले पाहिजे.

4

कायदेशीर आणि नियमक तपासण्या

 

तुम्हाला घरबांधणीबद्दल, विशेषत: कदाचित विशेषत: कायदे व नियमनांच्या गुंतागुंतींबद्दलसर्व काही माहित नसते. कंत्राटदार म्हणूनच, तुमच्याकडची अशी व्यक्ती आहे ज्याला, प्रोजेक्टच्या सुरुवातीपासून आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या आणि परवान्यांसह परिपूर्ण ज्ञान असते.

अंतत:, तुमचा बांधकाम कंत्राटदार घर बांधणीची प्रक्रिया सुरळीत होण्याच्या शाश्वतीसाठी महत्वाची भूमिका बजावतो. म्हणून जेव्हा सुरुवात करते वेळी तुम्ही योग्य कंत्राटदार निवडला आहे याची खात्री करुन घ्यावी, जो अनुभवी आहे, त्याच्याकडे समस्या सोडवण्याची क्षमता आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही गृहनिर्माण-प्रवासात मदतीसाठी त्याच्यावर खरोखरच विसंबून राहू शकता .

गृहनिर्माणाच्या अशा प्रकारच्या आणखीन टिप्ससाठी अल्ट्राटेक सिमेंटच्या #गोष्ट घराची च्या संपर्कात रहा.

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा