वॉटरप्रूफिंग च्या पद्धती, मॉडर्न किचन डिझाईन्स, home करता वास्तु टिप्स, घर बांधकाम खर्च

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा


बांधकामात वापरले जाणारे १० प्रकारचे बांधकाम साहित्य

घर किंवा कोणतीही वास्तू बांधणे हे रोमांचक असते, परंतु ह्या सर्वांची सुरुवात योग्य बांधकाम मटेरियल निवडण्यापासून होते. बांधकाम उद्योग विविध प्रकारचे मटेरियल उपलब्ध करून देतात, प्रत्येकाचे स्वतःचे अद्वितीय गुणधर्म आणि हेतू आहेत. या लेखात आपण बांधकामात वापरल्या जाणाऱ्या दहा प्रकारच्या बांधकाम मटेरियल्स बाबत जाणून घेऊया.

Share:


स्टील, सिमेंट, काँक्रीट, रेडी मिक्स काँक्रीट, बाइंडिंग वायर, लाकूड, दगड, वीटांचे ब्लॉक आणि खडी अशा विविध प्रकारचे बांधकाम मटेरियल बांधकामात वापरले जाते. या पैकी प्रत्येक बांधकाम मटेरियलमध्ये वजन, सामर्थ्य, दीर्घायुष्य आणि किंमत अशी विविध वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे ते विशिष्ट प्रकारच्या वापरासाठी योग्य ठरतात. एखाद्या प्रकल्पासाठी बांधकाम मटेरियलची निवड ही त्यांच्या किंमतीवर आणि संरचनेवर येणार्‍या बल आणि दबावांचा सामना करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते.



बांधकामात वापरल्या जाणार्‍या मटेरियलचे प्रकार

बांधकाम मटेरियलचे सामान्यत: दोन स्त्रोतामध्ये वर्गीकरण केले जाते: नैसर्गिक आणि मानवनिर्मित. तथापि, बांधकामात वापरण्यापूर्वी दोन्हीही निर्मित करणे किंवा त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. इमारत बांधकामात वापरल्या जाणाऱ्या मटेरियलची यादी खालीलप्रमाणे आहे.

 

1) स्टील



स्टील हा लोह आणि कार्बनपासून बनविलेला एक मजबूत धातू आहे, ज्यात इतर मटेरियल मिसळले जाते जेणेकरून ते लोहापेक्षाही अधिक मजबूत आणि नुकसानीस प्रतिरोधक बनते. उदाहरणार्थ, स्टेनलेस स्टील, गंज आणि ऑक्सिडेशनचा प्रतिरोध करते कारण त्यात अतिरिक्त क्रोमियम असते. वजन जास्त असूनही, त्याच्या अविश्वसनीय सामर्थ्यामुळे आधुनिक इमारती आणि मोठे औद्योगिक केंद्रे बांधण्यासाठी ही एक शीर्ष पसंती आहे.

 

२) सिमेंट



सिमेंट हे एक महत्त्वपूर्ण बांधकाम मटेरियल आहे जे कडक होते आणि इतर मटेरियलला चिकटवते, त्यांना एकत्र चिकटून राहण्यास मदत करते. हे सहसा एकट्याने वापरले जात नाही; त्याऐवजी, ते वाळू आणि खडीमध्ये मिसळले जाते. सिमेंट अनेकदा बारीक वाळूत मिसळून मोर्टार तयार केले जाते, ज्याचा वापर इमारतीच्या बांधकामात विटा आणि दगडांसाठी केला जातो. वाळू आणि खडीसह मिसळल्यावर ते काँक्रीट बनते, जे विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये वापरले जाणारे एक अष्टपैलू मटेरियल आहे. घनीभूत होण्याची आणि जोडण्याची त्याची क्षमता त्याला बांधकामाचा आधारस्तंभ बनवते, ज्यामुळे इमारती आणि वास्तू काळाच्या कसोटीवर टिकतील याची खात्री होते.

 

३) काँक्रीट



काँक्रीट हे एक विशेष बांधकाम मटेरियल आहे जे खडी, चुरा केलेले दगड, रीसायकल केलेले काँक्रीट आणि सिंथेटिक मटेरियल सारखे लहान-मोठे तुकडे मिसळून तयार केले जाते. हे तुकडे द्रव आसंजक(बाइंडर), सहसा सिमेंट, सह एकत्र चिकटतात, हे आसंजक हळूहळू कोरडे होत कडक होत जाते. वापरल्या जाणार्‍या सर्वात सामान्य प्रकारच्या सिमेंटला पोर्टलंड सिमेंट म्हणतात, जे चुनखडी आणि माती गरम करून आणि नंतर त्यात जिप्सम घालून बनवले जाते. जेव्हा आपण पोर्टलंड सिमेंट पाण्यात आणि या तुकड्यात मिसळतो तेव्हा त्याचे रूपांतर मजबूत पदार्थात होते ज्याला आपण काँक्रीट म्हणतो. आपल्या सभोवताली दिसणाऱ्या अनेक वास्तूंचा मूलाधार हे भक्कम मटेरियल आहे.

 

4) रेडी मिक्स काँक्रीट



रेडी मिक्स काँक्रीट हे एक सोयीचे बांधकाम मटेरियल आहे जे साइटपासून दूर असलेल्या प्लांटमध्ये तयार केले जाते आणि बांधकाम साइटवर पूर्व-मिश्रित आणि वापरासाठी तयार असलेल्या स्वरुपात येते. हे सिमेंट, वाळू आणि खडी सारखे तुकडे आणि पाणी यांचे मिश्रण असते, जे काँक्रीट प्लांटमध्ये अचूकपणे मोजले जातात आणि मिसळले जातात. हे तयार मिश्रण एकजिनसीपणा आणि गुणवत्ता सुनिश्चित करते, ज्याद्वारे बांधकाम साइट्सवरील वेळ आणि प्रयत्न वाचतात. कंत्राटदार ते सरळ साच्यांमध्ये किंवा फॉर्मवर्कमध्ये ओतू शकतात, ज्यामुळे अचूक प्लेसमेंट आणि सजलन प्रक्रिया शक्य होते. कधीकधी, काँक्रीट हाताळणे सोपे करण्यासाठी किंवा त्याच्या कडक होण्याच्या वेळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अॅडमिक्श्चर नावाचा अतिरिक्त घटक टाकला जातो, ज्यामुळे ते बांधकाम साइटवर कार्यक्षमतापूर्वक नेले जाऊ शकते.

 

5) बाइंडिंग वायर (बंधन तार)



बाइंडिंग वायर बांधकामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, ती विविध घटकांना सुरक्षितपणे एकत्र ठेवण्यास मदत करते. हे जोडणी बिंदूंवर रिन्फोर्सिंग बार (सळई) आपसात बांधण्यासाठी विशेषतः उपयुक्त ठरते, ज्याद्वारे संरचनेची स्थिरता सुनिश्चित होते. बाइंडिंग वायर सहसा माइल्ड स्टीलपासून बनविली जाते.

 

1. कंस्ट्रक्शनल बाइंडिंग वायर (सरळ कट वायर):

ही तार बांधकामासाठी आदर्श आहे, जी मजबूत आणि सुरक्षित बांधणी प्रदान करते.

 

2. ब्लॅक एनील्ड बाइंडिंग वायर

रोजच्या बांधणीच्या गरजांसाठी परिपूर्ण असलेली ही तार हाताळायला सोपी असते आणि घट्ट पकड सुनिश्चित करते.

 

3. गॅल्वेनाइज्ड आयर्न बाइंडिंग वायर

गंजास प्रतिरोधक असलेली, ही तार टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणार्‍या अनुप्रयोगांसाठी योग्य असते.

 

4. स्मॉल कॉइल रिबार वायर

संरचनात्मक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी विशेषत: रिबार(सळई) बांधणीसाठी डिझाइन केलेली आहे.

 

5. टाई लूप टाय वायर

बांधकामातील विविध प्रकारच्या बांधणी अनुप्रयोगांसाठी अष्टपैलू आणि उपयुक्त आहे.

 

6. पॅकिंगसाठी बाइंडिंग वायर

प्रामुख्याने मटेरियल आणि वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठीच्या पॅकेजिंगमध्ये वापरली जाते.

 

7. यू टाइप बाइंडिंग वायर

यू अक्षराच्या आकाराची ही तार विशिष्ट बांधणी आवश्यकतांसाठी तयार केलेली असते.

 

8. गैल्वेनाइज्ड वायर

गंजापासून अतिरिक्त संरक्षण प्रदान करते, बाह्य वापरासाठी आदर्श आहे.

 

9. स्टेनलेस स्टील वायर

गंजास प्रतिरोधक, ज्यामुळे बाह्य आणि सागरी अनुप्रयोगांसाठी योग्य ठरते.

 

10. ब्रास वायर

त्याच्या सामर्थ्य आणि गंज प्रतिकारासाठी ओळखले जाते, सामान्यत: विविध उद्योगांमध्ये वापरले जाते.

 

11. एल्यूमिनियम वायर

हलकी आणि गंज-प्रतिरोधक, विशिष्ट अनुप्रयोगांसाठी आदर्श जेथे वजन महत्वाचे असते.

 

12. पीव्हीसी कोटेड बाइंडिंग वायर

अतिरिक्त संरक्षण प्रदान करते आणि सामान्यत: त्याच्या हवामान प्रतिरोधामुळे बाह्य आणि कठोर वातावरणात वापरली जाते.

 

६) लाकूड



लाकूड हे झाडांपासून मिळणारे एक अष्टपैलू नैसर्गिक बांधकाम मटेरियल आहे आणि शतकानुशतकांपसून ते एक विश्वासार्ह बांधकाम मटेरियल राहिले आहे. हे विविध प्रकारांमध्ये येते, प्रत्येकाची स्वतःची अशी अद्वितीय वैशिष्ट्ये आणि उपयोग आहेत. लाकूड एक बांधकाम मटेरियल आहे जे त्याच्या सामर्थ्य, टिकाऊपणा आणि सौंदर्यात्मक आकर्षणासाठी मौल्यवान मानले जाते, ज्यामुळे बांधकाम उद्योगातील बांधकाम, फर्निचर, फ्लोअरिंग आणि इतर असंख्य अनुप्रयोगांसाठी ते एक लोकप्रिय निवड बनते. ओंडका, लाकूड, फलक आणि फळी यासारख्या विविध प्रकारांमध्ये कापले किंवा दाबले जाते तेव्हा त्याचा बांधकामात वापर केला जातो.

 

त्याचे नवीकरणीय स्वरूप देखील इमारत आणि डिझाइनमध्ये पर्यावरणास अनुकूल पर्याय बनवते. एफएससी (फॉरेस्ट स्टीवर्डशिप कौन्सिल) प्रमाणपत्रासारख्या जबाबदारीने प्राप्त केल्यास, लाकूड हे सुनिश्चित करते की जंगलांचे शाश्वत व्यवस्थापन केले जाते, स्थानिक समुदायांना आधार देताना नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधतेच्या संवर्धनास प्रोत्साहन दिले जाते

 

७) दगड



दगड हा शतकानुशतकांच्या भूगर्भीय प्रक्रियेतून तयार झालेला एक नैसर्गिक बांधकाम मटेरियल आहे. हे ग्रॅनाइट, चुनखडी, संगमरवर आणि इतर बर्‍याच काही प्रकारांमध्ये येते, प्रत्येकात अद्वितीय रंग आणि पोत असते. पाया, भिंती, फरशी आणि सजावटीच्या घटकांसाठी बांधकामात वापरले जाणारे बांधकाम मटेरियल म्हणजे दगड, ते इमारतींना अतिरिक्त मजबूती देतात. त्यांची मजबुती आणि कठोर हवामानाचा सामना करण्याची क्षमता, दगडी मटेरियलला बांधकामात एक लोकप्रिय निवड बनवते, ज्यामुळे दीर्घकाळ टिकणारी कामगिरी आणि ग्रामीण सौंदर्य हे दोन्ही सुनिश्चित होते.

 

८) विटा



विटा हे बांधकामात वापरले जाणारे सर्वात जुने आणि मूलभूत बांधकाम मटेरियल आहे. त्या सामान्यत: भट्टीवर भाजलेल्या मातीपासून बनविल्या जातात. भिंती, इमारती आणि विविध गवंडीकामाच्या बांधकामांसाठी विटांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्या वेगवेगळ्या आकार, लांबीरुंदी आणि रंगांमध्ये येतात आणि त्या घर बांधण्यासाठी वापरले जाणारे एक मटेरियल आहेत जे अष्टपैलू डिझाइन शक्यतांना अनुमती देते. त्यांच्या टिकाऊपणा आणि इन्सुलेट प्रदान करणार्‍या गुणधर्मांसाठी ओळखल्या जाणार्‍या, विटा हे एक असे बांधकाम मटेरियल आहे जे बांधकाम उद्योगात काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहे, आणि त्याने स्थापत्य प्रकल्पांना सामर्थ्य आणि अभिजात, पारंपारिक लूक हे दोन्ही प्रदान केले आहे.

 

9) ब्लॉक्स



ब्लॉक्स हे मॉड्युलर बांधकाम युनिट्स आहेत जे काँक्रीट, माती किंवा एरेटेड काँक्रीट सारख्या मटेरियलपासून बनविले जातात. ही युनिट्स आकार आणि लांबीरुंदीत भिन्न असतात, प्रत्येक विशिष्ट बांधकामाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केली जातात. बांधकाम प्रकल्पांमध्ये भिंती, पार्टिशन आणि संरचनात्मक घटक तयार करण्यात ते एक मूलभूत भूमिका बजावतात. ब्लॉक्स हे बांधकाम मटेरियल आहे जे त्याचे सामर्थ्य, स्थिरता आणि स्थापनेच्या सुलभतेसाठी ओळखले जाते, ज्यामुळे ते निवासी आणि व्यावसायिक दोन्ही इमारतींसाठी व्यावहारिक निवड बनते.

 

10) अॅग्रिगेट (समुच्चय)



अॅग्रिगेट हे बांधकामात वापरले जाणारे दाणेदार मटेरियल आहेत, ज्यात सामान्यत: चुरा केलेले दगड, खडी, वाळू किंवा काँक्रीट आणि डांबर यासारख्या रीसायकल केलेल्या मटेरियलचा समावेश असतो. हे घटक रस्ते, इमारती आणि पूल यासारख्या विविध बांधकाम प्रकल्पांसाठी पायाभूत बिल्डिंग ब्लॉक म्हणून काम करतात. अॅग्रिगेट संरचनात्मक आधार प्रदान करतात, वजनाच्या वितरणास मदत करतात आणि काँक्रीट व डांबरी मिश्रणांचे सामर्थ्य वाढवतात. आकार आणि प्रकारांच्या विविध उपलब्ध श्रेणीसह, विशिष्ट बांधकाम गरजा पूर्ण करण्यासाठी अॅग्रिगेट हे अचूकपणे तयार केले जाऊ शकतात.

 

घर बांधताना बांधकामात वापरल्या जाणाऱ्या योग्य बांधकाम मटेरियलची निवड महत्त्वाची ठरते. अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्यूशन्स हे सिमेंट, काँक्रीट आणि रेडी-मिक्स सोल्यूशन्ससह बांधकाम मटेरियलची विस्तृत श्रेणी प्रदान करतात. या अष्टपैलू पर्यायांसह, आपण सहजपणे आपल्या बांधकामाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण जुळणी शोधू शकतात.



बांधकामाच्या जगात, मटेरियलबद्दल माहितीपूर्ण निवड ही आवश्यक आहे. बांधकामात वापरल्या जाणार्‍या बांधकाम मटेरियलचे वैशिष्ट्ये आणि अनुप्रयोग समजून घेतल्यास माहितीपूर्ण निवड करण्यात सहाय्यता होते आणि सुरक्षित, विश्वासार्ह बांधकाम निर्मिती होते. हे निर्णय घरांचे सामर्थ्य, टिकाऊपणा आणि देखाव्यावर परिणाम करतात. आपण नवीन घर बांधत असाल किंवा जुन्या घराचे नूतनीकरण करीत असाल, तर योग्य निवडी बांधकाम क्षेत्रात यश सुनिश्चित करतात.



संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ





घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....