Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence


पेंट बबलिंग म्हणजे काय? भिंतींवरील पेंट ब्लीस्टरींगची सामान्य कारणे आणि उपाय

घरमालक आणि डीआयवाय शौकीन यांच्यासाठी पेंट बबलिंग ही वैफल्यग्रस्त समस्या असू शकते. हे केवळ आपल्या भिंतींच्या सौंदर्याबद्दल विचलित करत नाही तर ते त्यामागील कारणे आणि संभाव्य नुकसानाबद्दल चिंता देखील वाढवतात. या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण भिंतींवर पेंट बबलिंगची सामान्य कारणे आणि या समस्येचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आपल्याला व्यावहारिक उपाय याबद्दल जाणून घेऊया.

Share:


आपण कधी आपल्या रंगवलेल्या भिंतींच्या पृष्ठभागावर अदृश्य(लवकर न दिसणारे) बुडबुडे(बबल) तयार होताना पाहिले आहेत का? पेंट बबलिंग, ज्याला पेंट ब्लीस्टरींग म्हणून देखील ओळखले जाते, ही एक वैफल्यग्रस्त समस्या आहे जी आपल्या घराच्या देखावा बिघडवू शकते आणि रंगकामाच्या एकूण स्थितीबद्दल चिंता वाढवू शकते.


जेव्हा रंगवलेल्या भिंतीखालील बबल (बुडबुडे) किंवा ब्लीस्टर(फोड) तयार होतात, ज्यामुळे ती वर उचलली जाते आणि विकृत होते, तेव्हा ही घटना उद्भवते. हे उंचावलेल्या भागांद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे जे लहान उंचवटे किंवा बुडबुड्यांसारखे दिसू शकतात आणि हे आकारात लहान ठिपक्यांपासून मोठ्या पट्यांपर्यंत असू शकतात. इलाज न केल्यास, भिंतींवरील पेंट ब्लीस्टरींग कालांतराने अधिक खराब होऊ शकते, ज्यामुळे पोपडे निघणे आणि भेगा जाणे यासारखे अधिक व्यापक नुकसान होऊन महागड्या दुरुस्तीची आवश्यकता असू असते. या ब्लॉगमध्ये, आपण पेंट बबलिंगमागील सामान्य कारणांबद्दल जाणून घेऊ आणि आपल्या भिंती मुळ स्वरुपात आणि दृष्टीस आकर्षक अशा राहतील याची खात्री करत या समस्येला रोखण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी आपल्याला प्रभावी उपाय माहिती करून घेऊ.

 


भिंतींवरील पेंट ब्लीस्टरींगची कारणे काय आहेत?



रंगवलेल्या भिंतीच्या समग्रतेशी तडजोड करणारे अनेक घटक रंगावरील बुडबुडे (पेंट बबल) निर्मितीस कारणीभूत ठरू शकते. समस्येचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी ही कारणे समजून घेणे महत्वाचे आहे. चला या समस्येमागील काही सामान्य कारणे आणि त्या दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया:

 

1. अस्वच्छ पेंटिंग(रंगकाम) पृष्ठभाग

पेंट बबलिंगचे एक प्राथमिक कारण म्हणजे अस्वच्छ किंवा निकृष्टपणे तयार केलेल्या पृष्ठभागावर रंग लावणे. जेव्हा पेंटिंगचा पृष्ठभाग धूळ, घाण, ग्रीस किंवा इतर पदार्थांनी दूषित होतो, तेव्हा ते पेंटच्या योग्यप्रकारे चिकटून राहण्याच्या क्षमतेस अडथळा आणते. परिणामी, रंग वाळल्यावर बबल(बुडबुडे) किंवा ब्लीस्टर (पापुद्री फोड) तयार होऊ शकतात.

 

उपाय

अस्वच्छ रंगकाम पृष्ठभागामुळे होणारे बबलिंग टाळण्यासाठी, पेंटिंग करण्यापूर्वी भिंती पूर्णपणे स्वच्छ करणे आणि तयार करणे आवश्यक आहे. स्क्रॅपर किंवा सॅंडपेपर(घासकागद) वापरुन कोणताही सुटलेला किंवा खपल्या निघणारा रंग काढून सुरुवात करा. पुढे, घाण, ग्रीस आणि इतर दूषित पदार्थ काढून टाकण्यासाठी सौम्य डिटर्जंट द्रावण किंवा विशिष्ट वॉल क्लीनरने भिंती धुवा. रंग लावण्यापूर्वी पृष्ठभाग स्वच्छ धुवा आणि त्याला पूर्णपणे कोरडा होऊ द्या.

 

2. प्राइमरचा वापर टाळणे

प्राइमर हा पृष्ठभाग आणि रंग यांच्यादरम्यान एक महत्त्वपूर्ण बंधन एजंट म्हणून कार्य करतो, ज्याद्वारे चांगले आसंजन(चिकटणे क्षमता) वाढवते आणि भिंतींवर पेंट ब्लीस्टरींग होण्याची शक्यता कमी होते. प्राइमरचा वापर टाळल्यामुळे, विशेषत: सच्छिद्र किंवा रंगविरहित पृष्ठभागांवर, अपुरे बंधन बसून आणि शेवटी पेंट ब्लीस्टरींग होऊ शकते.

 

उपाय

रंगकाम (पेंटिंग) करण्यापूर्वी, पृष्ठभागावर अनुरूप प्राइमर लावण्याची खात्री करा. प्राइमर एकसमान आणि स्थिर अधस्तर तयार करतो, रंगाचे आसंजन वाढवतो आणि ब्लीस्टरींग टाळतो. पृष्ठभाग मटेरियल आणि आपण वापरू इच्छित असलेल्या रंगाच्या प्रकाराशी सुसंगत असा प्राइमर निवडावा.

 

3. पेंटिंग पृष्ठभागावरील ओलावा

पेंटिंग च्या पृष्ठभागावरील जास्त ओलावा हा पेंट बबलिंग मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतो. जेव्हा पाणी किंवा जास्त आर्द्रता पृष्ठभागात प्रवेश करते तेव्हा ते पेंट फिल्मच्या खाली अडकून राहू शकते. आणि जसे आर्द्रतेचे बाष्पीभवन होईल, तसे दाब निर्माण करून, पेंट ब्लीस्टर आणि पापुद्रे निर्माण होतात.

 

उपाय

भिंतींवर ओलावा-संबंधित ब्लीस्टरींग दूर करण्यासाठी, ओलाव्याचा स्त्रोत शोधून काढणे आणि त्याचे निराकरण करणे महत्वाचे आहे. प्लंबिंग गळती, छत गळती किंवा संघनन निर्मिती यासारख्या कोणत्याही गळती किंवा पाणी झिरपण्याच्या समस्येसाठी भागाची तपासणी करा. कोणत्याही गळतीची दुरुस्ती करा आणि बाथरूम आणि स्वयंपाकघर यासारख्या उच्च ओलाव्याची शक्यता असलेल्या भागात योग्य व्हेंटिलेशन(हवा खेळण्याची सोय) सुनिश्चित करा. याव्यतिरिक्त, पेंटिंग(रंगकाम) करण्यापूर्वी पृष्ठभाग पूर्णपणे कोरडा होण्यासाठी पुरेसा वेळ द्या.

 

४. सभोवतालचे उच्च तापमान

अत्यधिक उष्णता किंवा उच्च तापमानामुळे रंग वाळण्याची प्रक्रिया जलदपणे होऊ शकते, ज्यामुळे बबल तयार होतात. जेव्हा रंग(पेंट) खूप लवकर वाळतो, तेव्हा पेंट फिल्ममध्ये अडकलेले सॉल्व्हेंट्स किंवा ओलावा बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, परिणामी ब्लीस्टरींग होते.

 

उपाय

उच्च तापमानामुळे होणारे पेंट बबलिंग टाळण्यासाठी, अत्यंत उष्ण हवामानात पेंटिंग(रंगकाम) करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. दिवसाची शीतल वेळ निवडा किंवा मध्यम तापमान असलेल्या ऋतूंमध्ये रंगकाम करण्याचा विचार करा. याव्यतिरिक्त, सॉल्व्हेंट्स आणि ओलाव्याचे पुरेसे बाष्पीभवन होण्यासाठी वाळवण्याच्या प्रक्रियेदरम्यान योग्य व्हेंटिलेशन सुनिश्चित करा.

 

5. चुकीचे रोलर कव्हर निवडणे

अयोग्य रोलर कव्हर वापरणे देखील बबलिंगसाठी कारणीभूत ठरू शकते. चुकीच्या रोलर कव्हरमुळे रंग समानपणे लागू होऊ शकत नाही किंवा लिंट(रू) किंवा फायबर्स(तंतू) मागे राहू शकतात, ज्यामुळे असमान पेंट फिल्म आणि नंतर ब्लीस्टरींग होऊ शकते.

 

उपाय

रोलर कव्हर निवडताना, आपण रंगकाम करत असलेल्या पृष्ठभागाचा प्रकार आणि आपण वापरत असलेल्या रंगाच्या प्रकाराचा विचार करा. वेगवेगळे रोलर कव्हर विशिष्ट पृष्ठभागांसाठी डिझाइन केलेले असतात, जसे की गुळगुळीत किंवा पोतदार(टेक्चर) भिंती आणि लेटेक्स किंवा ऑइल बेसेड(तेल-आधारित) सारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांसाठी. गुळगुळीत आणि समान अनुप्रयोग प्राप्त करण्यासाठी आपल्या विशिष्ट रंगकाम प्रकल्पासाठी यथायोग्य असलेले रोलर कव्हर निवडा.

 

पेंट बबलिंगच्या या सामान्य कारणांकडे लक्ष देऊन आणि शिफारस केलेल्या उपायांची अंमलबजावणी करून, आपण आपल्या भिंतींवर पेंट ब्लीस्टरींग होण्याच्या घटना कमी करू शकता. तथापि, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की गंभीर किंवा सतत पेंट-बबलिंग समस्यांसाठी मूलभूत समस्या ओळखण्यासाठी आणि योग्य उपाय प्रदान करण्यासाठी व्यावसायिक हस्तक्षेपाची आवश्यकता असू शकते.


भिंतीवर पेंट ब्लीस्टरींग टाळण्यासाठी काही टिपा



पेंट ब्लीस्टरींग रोखण्यासाठी रंगकाम (पेंटिंग) प्रक्रियेदरम्यान तपशीलाकडे लक्ष देणे आणि योग्य तंत्रांचे अनुसरण करणे आवश्यक आहे. पेंट बबलिंग आसलेले छत आणि भिंती टाळण्यास मदत करण्यासाठी येथे काही अतिरिक्त टिपा दिल्या आहेत:

 

1. रंग हळूहळू ढवळवा

रंग वापरण्यापूर्वी, त्यास संपूर्ण आणि हळू हळू ढवळणे महत्वाचे आहे. जलद ढवळाढवळ केल्याने रंगामध्ये हवेचे बुडबुडे निर्माण होऊ शकतात, जे वाळविण्याच्या प्रक्रियेदरम्यान भिंतींवर ब्लीस्टर निर्माण होण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्याऐवजी, एक ढवळणारी काठी किंवा पॅडल वापरा आणि जास्त हवा प्रवेश न करता गुळगुळीत आणि सुसंगत पोत सुनिश्चित करण्यासाठी हळूवारपणे रंग मिसळा.

 

2. रोलरसह हळूहळू लावा

रोलरसह रंग लावताना, हळूहळू आणि अगदी रोलिंग मोशन (घरंगळ हालचाल) वापरणे महत्वाचे आहे. जास्त जोराने दाबणे किंवा जास्त दाब लावणे टाळा, कारण यामुळे पेंट फिल्मच्या खाली हवेची पोकळी तयार होऊ शकतात. एका बाजूने प्रारंभ करा आणि रंगाचा एकसमान कोट मिळविण्यासाठी सुसंगत वेग आणि दबाव राखून दुसर्‍या बाजुपर्यंत रंगकाम करा.

 

3. लेटेक्स पेंटवर थेट ऑइल-बेसेड पेंट वापरू नका

आधी लेटेक्स पेंटने रंगवलेल्या पृष्ठभागावर थेट ऑइल-बेसेड रंग लावल्यास भिंतींवर खराब आसंजण आणि पेंट ब्लीस्टर येऊ शकतात. ह्या दोन प्रकारच्या पेंटमध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत आणि सुसंगतता सुनिश्चित करण्यासाठी योग्य पृष्ठभाग तयार करणे आणि प्राईमिंग आवश्यक आहे. जर आपण लेटेक्सकडून ऑइल-बेसेड पेंटकडे स्विच करू इच्छित असाल किंवा त्याउलट करू इच्छित असाल, तर नवीन प्रकारचा पेंट लावण्यापूर्वी पृष्ठभागास योग्य प्राइमरने प्राइम करण्याचा सल्ला दिला जातो.

 

या टिपा, आधी नमूद केलेल्या कारणे आणि उपायांसह एकत्रित, आपल्याला पेंट बबलिंगच्या घटना कमी करण्यास आणि आपल्या भिंतींवर गुळगुळीत आणि दीर्घकाळ टिकणारी पेंट फिनिश प्राप्त करण्यास मदत करू शकतात.



पेंट बबलिंग ही एक सामान्य समस्या आहे जी पर्यावरणीय परिस्थिती, पृष्ठभाग तयार करणे आणि रंगकाम तंत्रासह विविध घटकांमुळे उद्भवू शकते. याचे कारण ओळखणे आपल्याला योग्य उपाय निवडण्यात मदत करेल. काही पेंटिंग टिप्सचा विचार करून आणि भिंतींवर पेंट ब्लीस्टरींग टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलून आपण आपल्या भिंतींना व्यावसायिक आणि गुळगुळीत फिनिश देऊ शकता, ज्यामुळे दीर्घकाळ टिकणारे रंगकाम सुनिश्चित करत सोबतच आपल्या घराच्या वर्णछटा वाढवते.



संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ





घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....