Share:
होम बिल्डिंग गाईड
आमचे प्रॉडक्ट्स
उपयोगी टूल्स
प्रॉडक्ट्स
अल्ट्राटेक बिल्डिंग प्रॉडक्ट्स
Share:
• सुरक्षितता वाढविण्यासाठी आणि सौंदर्य आकर्षण टिकवून ठेवण्यासाठी भेगा/तडा गेलेली फरशीकडे लक्ष देणे महत्वाचे असते.
• यशस्वी दुरुस्तीसाठी आसंजक, बदली फरशी आणि सुरक्षा उपकरणांसह आवश्यक ती साधने गोळा करा.
• दुरुस्ती प्रक्रियेदरम्यान आजूबाजूचा परिसर झाकून आणि संरक्षक उपकरणे परिधान करून सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
• नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी, साफसफाईपासून ग्राउटिंगपर्यंत चरण-दर-चरण प्रक्रियेचे अनुसरण करा.
• अंतिम ग्राऊटिंगसह दुरुस्ती पूर्ण करा, बदललेल्या फरशीमध्ये स्थिरता आणि अखंड फिनिश मिळवा.
तुटलेली फरशी दुरुस्त करण्यात मदत करण्यासाठी प्रथम योग्य उपकरणांसह प्रारंभ करूया:
आपल्याला सर्वात आधी एका आसंजकाची (अधेसिव्ह) आवश्यकता भासेल. आपल्या विशिष्ट फरशी प्रकारासाठी आणि आपण काम करीत असलेल्या पृष्ठभागासाठी योग्य उच्च-गुणवत्तेचे आसंजक निवडा. आणखी एक महत्त्वाचे मटेरियल म्हणजे नवीन फरशी. एकसंध लुक/देखावा कायम राखण्यासाठी विद्यमान फरशीच्या आकार, रंग आणि पोत सह जुळणारी बदलीची फरशी निवडा. नवीन फरशी बसविल्यावर फरशीमधील पोकळी भरण्यासाठी आपल्याला ग्राऊटची देखील आवश्यकता असेल. अखंड फिनिशसाठी ग्राऊट रंग विद्यमान ग्राऊटशी जुळतो आहे याची खात्री करा. शेवटी, मास्किंग टेप शेजारच्या टाइल्सचे संरक्षण करण्यास, योग्य संरेखनास मार्गदर्शन करण्यास, जादाच्या आसंजकाचे व्यवस्थापन करण्यास आणि स्वच्छ ग्राऊट लाइन राखण्यास मदत करतो.
फरशांमधील जुने आणि खराब झालेले ग्राऊट कार्यक्षमतापूर्वक काढून टाकण्यासाठी ग्राऊट रिमूव्हरचा वापर केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, लाकूड, धातू आणि चिनाईसह विविध मटेरियलमध्ये ड्रिलिंग करण्यासाठी कॉम्बी ड्रिल उपयुक्त ठरते. याबरोबरच हातोड्याच्या संयोगाने वापरले जाणारे हातोडा छेनी हे फरशी, मोर्टार किंवा इतर मटेरियल तुकडे करून काढून टाकण्यासाठीचे साधन आहे. ग्राऊट स्प्रेडर हे एक साधन आहे जे फरशांमध्ये समानपणे ग्राऊट लावण्यासाठी वापरले जाते. हे एक नीटनेटके आणि एकसमान ग्राऊट अनुप्रयोग प्राप्त करण्यात मदत करते, आणि हे सुनिश्चित करते की फरशांमधील पोकळ्या पुरेशा प्रमाणात भरल्या गेल्या आहेत. आणखी एक महत्त्वाचे साधन म्हणजे टायल्स स्पेसर्स, जे सातत्यपूर्ण अंतर राखतात, फरशांमध्ये एकवाक्यता सुनिश्चित करतात आणि ग्राऊटिंग प्रक्रिया सुलभ करतात. आदर्शपणे 2-3 इंचाचे ब्लेड आणि रिप्लेसमेंट ब्लेडसह ट्रिमिंग चाकू हा, फरशी, ग्राऊट किंवा आसंजक यासारख्या मटेरियलला कापण्यासाठी आणि आकार देण्यासाठी उपयुक्त असतो. पाण्याची बादली आणि स्पंज हे साधने स्वच्छ करण्यासाठी, पृष्ठभाग पुसण्यासाठी आणि फरशी बसविण्यादरम्यान अतिरिक्त ग्राऊट किंवा आसंजक व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक आहेत. स्पंज स्वच्छतेचे नियंत्रित आणि अचूक साधन प्रदान करतो.
नेहमीच आवश्यक नसले तरी, हातमोजे परिधान केल्याने आपल्या हातांचे धारदार कडा आणि फरशी बदली दरम्यान वापरल्या जाणार्या मटेरियलपासून संरक्षण होऊ शकते. फरशी बदलण्याच्या प्रक्रियेदरम्यान सुरक्षा चष्मा घालून आपल्या डोळ्यांचे मलबा आणि धारदार कडांपासून संरक्षण करा. तडा गेलेल्या फरशा दुरुस्ती करताना डस्ट मास्क हा एक मौल्यवान संरक्षक साधन आहे. ते आपल्याला श्वसन हीत, सुरक्षा मानकांचे अनुपालन आणि स्वच्छ, निरोगी कामाचे वातावरण सुनिश्चित करण्यात मदत करते.
सर्वप्रथम, आपल्याकडे आवश्यक सर्व सुरक्षा उपकरणे/साधने आहेत याची खात्री करा. आता भेगा/तडा गेलेली फरशीची दुरुस्ती कशी करायची यावर चर्चा करूया.
अस्ताव्यस्त क्षेत्रामुळे सुधारण्यापेक्षा नुकसान जास्त होऊ शकते. आपण स्वच्छ सेट-अपसह प्रारंभ करत असल्याची खात्री करा. आजूबाजूचा परिसर मऊ कापडाने वाळवावा. तुटलेली / तडा गेलेली फरशी दुरुस्त केल्याने धूळ जमा होऊ शकते म्हणून आपण काम सुरू करण्यापूर्वी धुळीची चादर (डस्ट शिट) टाकू शकता. जर आपल्या जवळपास प्लगहोल असतील तर ते झाकून ठेवा कारण धुळीमुळे प्लग पॉईंट्स बंद होऊ शकतात. फरशीवरील भेग/तडाची दुरुस्ती कशी सुनिश्चित करावी याचे हे काही मूलभूत प्रारंभिक मुद्दे आहेत.
भेगा/तडा गेलेली फरशीचे ग्राऊट सैल करण्यात मदत करण्यासाठी ग्राऊट रिमूव्हर वापरा. फरशांमधील भेगा.तडे कसे दुरुस्त करावे हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेत, आपण सभोवतालच्या फरशांचे नुकसान करणार नाहीत याची खात्री करा. खराब झालेल्या फरशीच्या मध्यभागी मास्किंग टेप वापरा जेणेकरून आपण चुकून घसरून दुसरी फरशी फोडणार नाही.
ग्राऊट काढून टाकणे हे एक अत्यंत महत्वाचे काम आहे कारण फरशांच्या मधील पोकळीमध्ये मागे राहिलेल्या कोणत्याही ग्राऊटमुळे आजूबाजूच्या फरश्यांवर कॉम्प्रेशन (दबाव) होऊ शकते ज्यामुळे त्यांना तडे जाऊ शकतात.
भेगा/तडा गेलेली फरशीमध्ये छिद्र करण्यासाठी ड्रिल मशीन वापरा. आपण खूप वेगाने जाणार नाही याची खात्री करा कारण आपण खाली टाकलेल्या कोणत्याही पाईप किंवा केबलचे नुकसान करू शकता. तुटलेल्या फरशीच्या मध्यभागी असलेल्या टेपमध्ये संथ गतीने ड्रिलिंग सुरू करा.
एकदा छिद्र पाडल्यानंतर, आपण अधिक खोल ड्रिल करण्यासाठी वेगाने हालचाल करू शकता.
ही पायरी आपल्याला तुटलेली फरशी कशी काढावी हे समजण्यास मदत करेल. ड्रिलिंग करताना आपण तयार केलेल्या छिद्रांमधून फरशीचे तुकडे बाहेर काढून टाकण्यास सुरवात करण्यासाठी छन्नी वापरा.
जास्त आडदांड आणि अधीर होऊ नका, फरशीच्या मध्यभागापासून सुरुवात करता बाजूपर्यंत पुढे होत चला. तुकड्यांमुळे शेजारच्या फरशांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
जर काही आसंजक शिल्लक राहिले असेल तर तो ट्रिमिंग चाकूने काढून टाका.
तुकडे झालेल्या फरशा कशा दुरुस्त कराव्यात या प्रक्रियेतील ही सर्वात महत्वाची पायरी आहे. सर्वप्रथम, कोणतेही आसंजक न वापरता बदली फरशी (रिप्लेसमेंट टायल) पोझिशन करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ती त्याजागी बरोबर फिट बसते याची खात्री होईल. जर ते उर्वरित जमीनीवरील / भिंतीच्या फरशांमधून बाहेर येत असेल (एकसमान पातळी न राहता फुगवटा निर्माण होणे) तर आपल्याला नवीन फरशी बसविण्यापूर्वी उपस्थित अतिरिक्त आसंजक काढून टाकण्याची आवश्यकता असू शकते.
एकदा आपण सेटिंगवर खूश झाल्यावर, आपल्या रिप्लेसमेंट टायलच्या मागील बाजूस ग्राऊट स्प्रेडर वापरुन आसंजकाचा लेप लावा आणि नवीन फरशी ठामपणे जागेवर ठेवा जेणेकरून ती आपल्या उर्वरित जमीनीवरील / भिंतीवरील फरशांसाह अखंडपणे बसेल.
तुटलेली फरशी कशी दुरुस्त करायची आणि नवीन फरशी कशी बसवायची या आपल्या प्रयत्नात यशस्वी झाल्यानंतर ती सुरक्षित/घट्ट बसविण्यासाठी तुम्हाला फरशी ग्राऊट करावी लागेल. हे करण्यासाठी, प्रथम, ग्राऊट लावण्यासाठी फरशांमध्ये अंतर राखण्यासाठी टायल स्पेसर फिट करा आणि आसंजक कोरडे होण्यापूर्वी फरशी घसरणार/जागेवरून हलणार नाही याची खात्री करा.
एका दिवसानंतर, आपण स्पेसर काढून टाकू शकता आणि रिप्लेसमेंट टाइलच्या सभोवतालच्या जागेत/पोकळीत नवीन ग्राऊट भरू शकता.
फरशील गेलेला तडा/भेगा आणि लिफ्टिंग(वर उघडून येणे) दुरुस्त करण्यासाठी ही उपयुक्त चरण-दर-चरण (स्टेप बाय स्टेप) प्रक्रिया गरजेच्या वेळी उपयुक्त ठरू शकते. आपल्याला आता साधने, सुरक्षा उपकरणे आणि भेगा/तडा गेलेल्या फरशा दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेची माहिती झाली आहे. भेगा/तडा गेलेल्या फरशांची दुरुस्ती कशी करावी यावरील या विस्तृत मार्गदर्शकासह, आपण तडा गेलेली फरशी बदलणे आणि आपल्या फरशी बसविलेल्या पृष्ठभागांचे स्वरूप पुनः स्थापित करण्याचे कार्य हाताळण्यासाठी सुसज्ज असाल.