वॉटरप्रूफिंग च्या पद्धती, मॉडर्न किचन डिझाईन्स, home करता वास्तु टिप्स, घर बांधकाम खर्च

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा



आर्किटेक्टची भूमिका काय असते?

आर्किटेक्ट हा एक दूरदर्शी निर्माता आहे जो कल्पनाशक्तीला कार्यक्षमतेशी जोडतो, आपल्या जीवनातील लँडस्केपला आकार देतो. त्यांची भूमिका ब्लुप्रिंट काढण्यापलीकडे जाते; यात अशा वातावरणाला आकार देणे समाविष्ट आहे जे प्रेरणा देते, नावीन्य निर्माण करते आणि विविध उद्देशांची पूर्तता करते. आर्किटेक्टच्या बहुआयामी भूमिकेचा वेध घेऊया, आपल्या निर्मित पर्यावरणातील त्यांच्या वैविध्यपूर्ण योगदानाचा शोध घेऊया.

Share:


• आर्किटेक्ट डिझाइन, नियोजन आणि देखरेख करतात, जेणेकरून स्वप्न आणि व्यावहारिकतेचा समतोल सुनिश्चित होईल.

 

• ड्रॉइंग(रेखाचित्रे) तयार करणे आणि खर्चाचा अंदाज घेण्यापासून ते कंत्राटदार व ग्राहकांसोबत मिळून कार्य  करण्यापर्यंत त्यांची कामे आहेत

 

• नाविन्यपूर्ण आणि आकर्षक डिझाइन असलेल्या कार्यात्मक जागा तयार करण्यावर ते लक्ष केंद्रित करतात.

 

• ते त्यांच्या समस्या-सोडविणे, संप्रेषण आणि नेतृत्व कौशल्यांचा फायदा घेतात आणि संबंधित नियमांचे पालन करतात.


प्रत्येक बांधकाम प्रकल्पासाठी आर्किटेक्टची गरज असते. बहुसंख्य लोकांना आर्किटेक्टचे कार्य समजत नाही आणि बर्‍याचदा त्यांना ते सिव्हिल इंजिनीअर किंवा बिल्डरच्या भूमिकेसह गोंधळात घेतात. होय, हे सर्वजण इमारतीचे काम आणि बांधकाम हाताळतात, परंतु त्या प्रत्येकाच्या स्वतःच्या अशा विशिष्ट जबाबदाऱ्या आहेत. आर्किटेक्ट काय करतो आणि आपण बांधकाम प्रकल्प हाती घेत असल्यास आपल्याला त्याची आवश्यकता का आहे याचे तपशीलवार वर्णन खाली आहे.


आर्किटेक्ट कोण आहे?



आर्किटेक्ट हा प्रगत(अॅडवांस) पदवी असलेला व्यावसायिक आहे ज्याने बांधकाम प्रकल्पांचे डिझाइन, नियोजन आणि पर्यवेक्षण कसे करावे याबद्दल तज्ञ प्रशिक्षण प्राप्त केलेले असते. बांधकामापूर्वी ते इमारतीची विविध ड्रॉइंग किंवा डिझाइन तयार करतात. ते व्यावसायिक आहेत जे बांधकाम प्रकल्पातून आपल्या ग्राहकांना काय हवे आहे याची सर्जनशीलपणे कल्पना करतात आणि ती कल्पना जमिनीवर प्रत्यक्षात आणतात. आर्किटेक्टने इमारतीच्या प्रकल्पासाठी डिझाइन तयार केल्यानंतर, ते आता प्रकल्पाला अस्तीत्वात आणण्यासाठी ग्राहक आणि इतर व्यावसायिकांच्या सहकार्याने काम करू शकतात. आता आर्किटेक्टची भूमिका आपल्याला समजली आहे, तर आपण ऑफ-साइट आणि ऑन-साइट वेगवेगळी आर्किटेक्ट कर्तव्ये आणि आर्किटेक्ट कौशल्ये समजून घेऊया.

 

 

आर्किटेक्ट काय करतो?


१. प्रकल्प चर्चा :

आर्किटेक्टला सर्व बैठकांमध्ये भाग सहभाग घेण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प वार्तालाप/चर्चा लागतात. या चर्चांमध्ये ग्राहकाच्या प्राथमिक गरजा समजून घेणे समाविष्ट असते. प्रकल्पाच्या अपेक्षांची काळजीपूर्वक नोंद घेतली पाहिजे. ग्राहकाच्या गरजेनुसार बजेट तयार केले जाऊ शकते. आर्किटेक्टसोबतच्या इतर चर्चांमध्ये खालील मुद्दे समाविष्ट असतील:

 

a. साइटच्या मर्यादा आणि क्षमता

b. आर्थिक अंदाजपत्रक/बजेट आणि उद्दिष्टांवर चर्चा

क. गरजेनुसार जागेची किंवा इमारतीची वेगवेगळी निवड

ड. दळणवळण सुलभ व्हावे म्हणून आखलेल्या आणि तयार केलेल्या, अंमलात आणलेल्या कार्यपद्धती

 

2. ड्रॉइंग:

आर्किटेक्टची सर्वात मोठी भूमिका म्हणजे बांधकाम प्रकल्पांसाठी डिझाइन तयार करणे. घरे, कार्यालये, शॉपिंग मॉल्स आणि इतर बरेच काही स्केचिंग आणि डिझाइन करण्यात ते तज्ञ असतात. ते ग्राहकांनी मनात कल्पलेल्या डिझाइनचे स्केच देखील काढू शकतात. या सर्व ड्रॉइंगला, बांधकाम होत असलेल्या क्षेत्रानुसार विविध बांधकाम कायद्यांच्या गरजा आणि आवश्यकता पूर्ण कराव्या लागतात. अशा नियमांमध्ये फायर रेग्युलेशन्स, बिल्डिंग कोड, बिल्डिंग स्टाईल, कन्स्ट्रक्शन लोकेशन आणि पिन कोड स्ट्रक्चर्स यांचा समावेश असतो.

 

३. खर्चाचा अंदाज :

खर्चाचा अंदाज ही आर्किटेक्टची आणखी एक महत्त्वाची भूमिका आहे. डिझाइनवर काम करताना आणि कामाचे वेगवेगळे टप्पे समजून घेताना आर्किटेक्ट प्रकल्पाचे बजेट तयार करण्यात मदत करू शकतो. जर बजेट ग्राहकाच्या आवाक्याबाहेर जात असेल तर आर्किटेक्ट त्यांना आधीच सावध करू शकतो.

 

4. बांधकाम करार :

आर्किटेक्ट बांधकामाच्या विविध कामांसाठी कंत्राटदारांची निवड करू शकतात. निविदा प्राप्त झाल्यानंतर, आर्किटेक्ट निविदा विश्लेषण अहवाल तयार करतो. आर्किटेक्ट कोणत्या प्रकारच्या कामात कार्यरत आहे हे करारावर अवलंबून असते. आर्किटेक्टने कोणत्या कार्यावर लक्ष केंद्रित करावे हे ग्राहकासोबतचा करार ठरवेल. आर्किटेक्टच्या भूमिकेत पूर्ण झालेल्या कामाशी संबंधित देयके/पेमेंट्स तपासण्यासाठी महिन्याच्या शेवटी पावत्या/बीजक(इनवॉइस) तपासणे देखील समाविष्ट असते.

 

५. कंत्राटदारांची नेमणूक :

आर्किटेक्टला इतर बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांसोबत जवळून काम करावे लागते. त्यामुळे आर्किटेक्टने साईटवर काम करणाऱ्या कंत्राटदारांची निवड करणे चांगले ठरते. आर्किटेक्ट कामासाठी योग्य तज्ञांची निवड करत असल्याने ग्राहकासाठी काम सोपे होते.

 

6. कंत्राटदार आणि अभियंत्यांसोबत काम करणे:

आर्किटेक्टने योग्य लोकांना कामावर ठेवल्यानंतर डिझाइनचा अर्थ लावून देऊन, कामाच्या प्रगतीवर देखरेख ठेवून आणि डिझाइन चांगल्या प्रकारे अंमलात आणले जात आहे याची खात्री करून कार्यसंबंध टिकवून ठेवणे महत्वाचे असते. आर्किटेक्टच्या भूमिकेत प्लंबर, इलेक्ट्रिशियन, इंजिनीअर आणि इतर तज्ञांसोबत हातमिळवणी करून काम करणे जेणेकरून त्यांना योग्य काम करता येईल, याचा समावेश असतो.

 

7. कल्पक आणि अभिनव कल्पना आणणे:

आर्किटेक्टचे काम केवळ प्रत्येक इमारतीची दुसऱ्या इमारतीप्रमाणे नक्कल करणे नसते. ते प्रकल्पाच्या सौंदर्य आकर्षण आणि स्वरूपाबद्दल देखील असते. ठराविक इमारती विशिष्ट आकारांप्रमाणे दिसाव्यात म्हणून बनवल्या जातात आणि लक्ष वेधून घेणारी नवनवीन डिझाईन्स सुचवण्याचे काम आर्किटेक्टचे असते.

 

8. ग्राहकासोबत काम करणे:

आर्किटेक्टला ग्राहकांच्या वतीने काम करावे लागते आणि बांधकाम सुरू असलेल्या राज्य सरकार किंवा क्षेत्रीय प्राधिकरणाकडून आवश्यक परवानग्या प्राप्त कराव्या लागतात. त्यांना डिझाईनच्या ब्लुप्रिंट मंजुरीसाठी सरकारकडे सादर कराव्या लागतात.

 

9. पर्यवेक्षण:

इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा, आर्किटेक्ट प्रकल्पाच्या एकंदरीत बांधकामात एका पर्यवेक्षकाची भूमिका बजावतात. त्यांची रचना/डिझाईन असल्याने नेमकी कसली गरज आहे, काय चूक होऊ शकते आणि ती कशी दुरुस्त करायची हे त्यांना माहिती असते.


आर्किटेक्ट कर्तव्ये आणि कौशल्ये



आर्किटेक्ट कल्पकता आणि तांत्रिक कौशल्यांची सांगड घालून विविध कामे हाताळत इमारतींचे डिझाइन तयार करतात. त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये सलोख्याच्या जागांची कल्पना करणे, प्रकल्पांवर देखरेख ठेवणे, संरचनात्मक स्थिरता सुनिश्चित करणे आणि नियमांचे पालन करणे समाविष्ट असते. डिझाइन क्षमतेव्यतिरिक्त, आर्किटेक्टना चांगल्या समस्या-सोडविणे, संप्रेषण आणि नेतृत्व कौशल्यांची आवश्यकता असते. कलात्मक दृष्टीचा व्यावहारिकतेशी समतोल साधून, स्वप्नांना कार्यात्मक जागेत रूपांतरित करून आणि कलात्मकता, नावीन्य आणि तांत्रिक कौशल्याचे मिश्रण दाखवून ते क्लिष्टता व्यवस्थापित करतात.



आर्किटेक्टच्या भूमिकेत कलात्मकता, तांत्रिक कौशल्य आणि सामाजिक जाणीव यांची सांगड घालणार्‍या विविध जबाबदाऱ्या असतात. त्यांचे योगदान इमारतींना आकार देते, शहरी जागांची पुनर्व्याख्या करते आणि प्रेरणा देणारे वातावरण तयार करते, जे आपण राहत असलेल्या जगावर एक अमिट ठसा उमटवते. आर्किटेक्टची भूमिका अष्टपैलू असून घरबांधणीतील इंजिनीअर्स आणि आर्किटेक्टचे महत्त्व या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजू शकते.



संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ





घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....