Share:
Home Building Guide
Our Products
Useful Tools
Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost
Share:
प्लास्टरिंग हे बांधकाम उद्योगातील एक खूप जुने तंत्र आहे ज्यामध्ये भिंती, छत किंवा पार्टिशनच्या उघड्या पृष्ठभागावर, चुना किंवा सिमेंट, वाळू आणि पाण्याचे मिश्रण असलेल्या प्लास्टरचा पातळ थर लावणे समाविष्ट आहे. विटकाम, काँक्रीट आणि इतर मटेरियल लपवून या पृष्ठभागांना गुळगुळीत आणि अखंड फिनिश देणे हा प्लास्टरिंगचा प्राथमिक हेतू असतो. ते निव्वळ सौंदर्यपूर्ण दिसत असले तरी भिंती आणि छतांचे संरक्षण, टिकाऊपणा, सपाटीकरण आणि संरेखन या दृष्टीने प्लास्टरिंग हे बांधकामात अनेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
प्लास्टरचे अनेक प्रकार आहेत आणि ते वेगवेगळ्या गरजा, पर्यावरणीय परिस्थिती आणि सौंदर्यविषयक प्राधान्ये पूर्ण करतात. प्लास्टरिंगच्या सर्वात सामान्यपणे वापरल्या जाणार्या काही प्रकारांवर एक नजर टाकूया.
सिमेंट प्लास्टरिंग, ज्याला बर्याचदा सिमेंट रेंडरिंग म्हणून संबोधले जाते, त्यात सिमेंट, वाळू आणि पाणी यांचे मिश्रण वापरले जाते. हे तंत्र एक मजबूत आणि टिकाऊ पृष्ठभाग तयार करते जे हवामान आणि पर्यावरणीय परिस्थितीस प्रतिरोधक असते. हे सामान्यत: विविध घटकांपासून संरक्षण करण्यासाठी बाहेरील भागात वापरले जाते आणि त्याची अष्टपैलूता विविध पोत(टेक्ष्चर) आणि फिनिश साध्य करते.
जिप्सम प्लास्टरिंग, ज्याला प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणून देखील ओळखले जाते, अंतर्गत पृष्ठभागांसाठी ही एक लोकप्रिय निवड आहे. जिप्सम हे एक नैसर्गिकरित्या आढळणारे खनिज आहे जे पाण्यात मिसळल्यास एक गुळगुळीत पेस्ट तयार करते जी त्वरीत कोरडी होते आणि स्वच्छ, पॉलिश केलेले स्वरूप प्रदान करते. या प्रकारचे प्लास्टरिंग त्याच्या अग्निरोधक गुणधर्मांसाठी ओळखले जाते आणि बर्याचदा अशा ठिकाणी वापरले जाते जेथे स्वास्थ्य आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते.
माती/चिखल प्लास्टरिंग हे जुने तंत्र असून त्यात स्थानिक पातळीवरील मातीला भुसा किंवा शेणासारख्या इतर नैसर्गिक मटेरियलमध्ये मिसळून तिचा वापर केला जातो. हा एक पर्यावरण-अनुकूल दृष्टीकोन आहे जो ग्रामीण आणि मातीची फिनिश तयार करतो आणि उत्कृष्ट थर्मल इन्सुलेशन(उष्णतेपासून बचाव) आणि सच्छिद्रता प्रदान करतो, ज्यामुळे तो पारंपारिक आणि शाश्वत बांधकाम पद्धतींसाठी उचित ठरतो.
चुना(लाईम) प्लास्टरिंगमध्ये प्राथमिक बंधनकारक मटेरियल म्हणून चुन्याचा वापर केला जातो. हे शतकानुशतकांपासुन वापरले जात आहे आणि त्याच्या सच्छिद्रता आणि लवचिकतेसाठी ते प्रसिद्ध आहे, जे संरचनेला बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करते. वास्तूची अस्सलता कायम राखणे सर्वात महत्वाचे आहे अशा ऐतिहासिक वास्तू आणि जीर्णोद्धार प्रकल्पांमध्ये चुना प्लास्टर बर्याचदा आढळून येते.
वॉटरप्रूफ प्लास्टर, नावाप्रमाणेच, हे पाणी आणि ओलावा प्रतिकर्षित करण्यासाठी डिझाइन केलेले असतात. बाथरूम आणि बेसमेंटसारख्या ओलसरपणाचा धोका असलेल्या भागांसाठी ही एक महत्त्वपूर्ण निवड आहे. या प्रकारच्या प्लास्टरिंगमध्ये पाण्याचा प्रतिकार वाढविणारे मटेरियल समाविष्ट केलेले असतात, ज्यामुळे पाण्याचे नुकसान आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी हा एक प्रभावी उपाय ठरतो.
प्लास्टरिंगचे विविध प्रकार बांधकामात अनेक हेतू पूर्ण करतात, हे सर्व, बांधकामांची एकंदरीत कार्यक्षमता, सौंदर्य आणि दीर्घायुष्यास हातभार लावतात. बांधकाम प्रक्रियेत प्लास्टरिंग ही एक आवश्यक पायरी का आहे याची काही प्रमुख कारणे जाणून घेऊया.
प्लास्टरिंग विट-बांधकाम आणि इतर बांधकाम मटेरियलसाठी संरक्षक कवच म्हणून कार्य करते. ते आघात, हवामानामुळे होणारा क्षय आणि तापमानातील बदल यासारख्या बाह्य बलांचा प्रतिरोध वाढवते. गवंडीकाम बांधकाम/चिनार च्या संरचनात्मक अखंडतेला बळकटी देऊन, प्लास्टरिंग संपूर्ण बांधकामाच्या दीर्घायुष्यास हातभार लावते.
प्लास्टरिंगच्या प्राथमिक कार्यांपैकी एक म्हणजे एक गुळगुळीत आणि समान पृष्ठभाग प्रदान करणे जे रंगकाम आणि इतर शोभेच्या कार्यासाठी आदर्श आहे. प्लास्टर न करता, असमान पृष्ठभाग आणि दोष अधिक दिसून येतील, परिणामी खराब फिनिश येईल.
पाऊस, वारा आणि सूर्यप्रकाश यासारख्या बाह्य घटकांच्या संपर्कात येण्यामुळे बांधकाम मटेरियलचा पृष्ठभाग हळूहळू खराब होऊ शकतो. प्लास्टरिंग एक अडथळा तयार करते जो मूलभूत/खाली असलेल्या संरचनेला या वातावरणीय हल्ल्यांपासून/उद्भवापासून वाचवतो, जेणेकरून त्याची गुणवत्ता आणि स्वरूप दीर्घकाळ टिकवून राहते.
ओलाव्याच्या प्रवेशामुळे बुरशीची वाढ, मटेरियलची हानी आणि संरचनात्मक अस्थिरता यासह विविध समस्या उद्भवू शकतात. प्लास्टरिंग, विशेषत: वॉटरप्रूफिंग तंत्रासह एकत्रित केल्यास, भिंती आणि छतांमध्ये ओलावा झिरपण्यापासून प्रतिबंधित करते आणि संरचनेच्या अखंडतेचे रक्षण करते.
अंतर्गत (इंटिरिअर) आणि बाह्य(एक्सटीरियर)चे व्हिज्युअल अपील (सौंदर्य आकर्षण) वाढवण्यामध्ये प्लास्टरिंग महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे रुक्ष आणि असमान पृष्ठभागांचे पॉलिश केलेल्या पृष्ठभागांमध्ये रूपांतर करते जे चेतनामय रंग ते डौलदार वॉलपेपर्समध्ये रंगवण्यास तयार असतात.
आपण माहिती घेतल्याप्रमाणे, प्रकल्पाच्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्ये पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारचे प्लास्टरिंग वापरले जाऊ शकते. प्लास्टरिंग प्रक्रियेची आपली समज आणखी वाढविण्यासाठी, आपल्याला यूट्यूबवर हाऊ टु प्लास्टर ए वॉल (भिंतीला प्लास्टर कसे करावे) हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्याची शिफारस केली आहे. असे केल्याने, आपण या आवश्यक तंत्राचा अधिक चांगला दृष्टीकोन प्राप्त कराल जे आधुनिक बांधकाम प्रकल्पांमध्ये आम्हाला चांगली सेवा देत आहे.
चुना प्लास्टरमध्ये कधीकधी जसे ते कोरडे होत जाते तसे आकुंचनामुळे त्यावर बारीक हेयरलाइन क्रॅक/भेगा येऊ शकतात. तथापि, त्या बहुतेक वरवरच्या असतात आणि सहजपणे दुरुस्त केल्या जाऊ शकतात.
प्लास्टर केल्यानंतर भिंती पूर्णपणे कोरड्या होऊ दिल्या जातात. एकदा कोरड्या झाल्यावर, रंगकाम किंवा वॉलपेपरिंग पूर्वी गुळगुळीत फिनिश सुनिश्चित करण्यासाठी ते पुढील चरणासाठी तयार केले जाऊ शकतात ज्यात सामान्यत: घासणे समाविष्ट असते.
वापरल्या जाणार्या प्लास्टरच्या प्रकारानुसार सजलन प्रक्रिया कालावधी (दिवस) भिन्न असू शकतात. साधारणत: सिमेंट प्लास्टरसाठी प्लास्टरिंगच्या दुसर्या दिवसापासून सजलन प्रक्रिया सुरू करून कमीत कमी ७ दिवस चालू ठेवावी.
होय, प्लास्टर केल्यानंतर आपण भिंती रंगवू शकता परंतु प्लास्टर पूर्णपणे कोरडे आहे याची खात्री करणे आवश्यक असते. एकदा प्लास्टर पूर्णपणे कोरडे झाल्यावर, प्लास्टर सील करण्यासाठी आणि पेंटचे भिंतीत शोषण होणे रोखण्यासाठी प्राइमिंग पेंट लावण्याची शिफारस केली जाते.
अंतर्गत भिंतींसाठी सामान्य प्लास्टरिंग मिश्रण प्रमाण १ भाग सिमेंट ते ६ भाग वाळू असते, तर बाह्य भिंतींसाठी किंवा ओलाव्याच्या संपर्कात असलेल्या पृष्ठभागांसाठी १ भाग सिमेंट ते ४ भाग वाळू चे गुणोत्तर वापरले जाते. तथापि, विशिष्ट आवश्यकतांच्या आधारे ते बदलू शकते.