Share:
Home Building Guide
Our Products
Useful Tools
Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost
Share:
• आधुनिक कॉम्पॅक्ट(अरुंद) घरांना एक आरामदायक राहणी वातावरणासाठी योग्य प्रकारे नियोजित केलेल्या व्हेंटिलेशनची आवश्यकता असते.
• खिडकीचे ठिकाण, स्पेशल व्हेंटिंग आणि एअर प्युरिफायर आणि एक्झॉस्ट फॅनचा वापर यांबद्दल काळजीपूर्वक विचारविनिमय केल्याने वायुप्रवाह सुधारण्यासाठी महत्वपूर्ण मदत होते.
• सिस्टीमचे नैसर्गिक आणि यांत्रिक ते संतुलित प्रणाली पर्यंत वेगवेगळे प्रकार पडतात, प्रत्येक प्रकार अद्वितीय फायदे प्रदान करतो.
• निवडण्याच्या निर्णयांमध्ये प्रणाली/सिस्टीमचा प्रकार, रणनीती, बजेट, आकारमान, हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण, देखभाल आणि इंस्टॉलेशन यांचा समावेश असतो.
अनेक वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज हवेशीर असलेले घर अधिक महत्त्वाचे आहे. वाढते प्रदूषण, दाटीवाटीच्या शहरी जागा आणि कमी हिरवळ यामुळे नवीन बांधकामांमधील व्हेंटिलेशन सिस्टीम सुधारणे आजकाल अधिक महत्त्वाचे झाले आहे.
व्हेंटिलेशन आपल्या घराला ओलावा, धूर, स्वयंपाकातील दुर्गंधी आणि घरातील प्रदूषकांपासून मुक्त होण्यास मदत करते. स्टोव्ह आणि फायरप्लेस सारख्या घरगुती उपकरणांमधील वायू खराब व्हेंटिलेशन असलेल्या घरात जमा होऊ शकतात आणि आपले आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आणू शकतात
म्हणूनच, आपले घर बांधताना, आपल्याला विविध प्रकारच्या व्हेंटिलेशन सिस्टमचे मूल्यांकन करणे आवश्यक असते ज्याद्वारे आपण ताजे आणि चांगल्या गुणवत्तेची हवा प्रदान करून आपले घर हवेशीर ठेवणारा पर्याय निवडू शकतात.
योग्य होम व्हेंटिलेशन सिस्टम कातरमाळ्यामधील(अॅटिक) उष्णतेची पातळी नियंत्रित करते, बंद जागा आणि तळघरात ओलसरपणा कमी करते आणि इन्सुलेशन नसलेल्या भिंतींमधून ओलावा बाहेर ठेवते. त्यामुळे खिडक्या अशा ठिकाणी लावाव्यात की ज्यामुळे घरातील वायुप्रवाहाला मदत होईल. स्वयंपाकघरातील चिमण्या आणि एक्झॉस्ट फॅनचा वापर करून हवा कोणत्याही त्रासाशिवाय बाहेर जाईल याची खात्री करावी. याव्यतिरिक्त, आपण आपल्या बाथरूमसाठी देखील एक्झॉस्ट फॅन/पंखे वापरू शकतात.
आजकाल, लोकसंख्येचा मोठा भाग हा पूर्व-डिझाइन केलेल्या आणि बांधलेल्या बहुमजली अपार्टमेंटमध्ये राहते, ज्यामुळे त्यांना घराच्या एकंदरीत डिझाइनसाठी फारसा पर्याय उरत नाही. जर तुम्ही अशा घरात राहण्याचा विचार करत असाल तर जास्तीत जास्त व्हेंटिलेशन सुनिश्चित करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत.
आपण एखाद्या उंच इमारतीमधील अपार्टमेंट रहात असाल किंवा वैयक्तिक घरात रहात असाल याची पर्वा न करता, धोरणात्मकरित्या प्लेस केलेल्या खिडक्या आपल्या ताज्या हवेचा प्राथमिक स्त्रोत असतात. व्हेंटिलेशन जास्तीत जास्त करण्यासाठी, एअरफ्लो(वायुप्रवाह) वाढविणार्या भागात खिडक्या स्थापित करा आणि त्यांचे तोंड मोकळ्या जागांकडे ठेवा. ही सोपी पायरी घरातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा करू शकते.
वायुप्रवाह वाढविण्यासाठी आणि स्वच्छ इनडोअर(घरातील) हवा कायम राखण्यासाठी पूरक व्हेंटिलेशन साधने म्हणून एअर प्युरिफायर वापरण्याचा विचार करा. नैसर्गिक व्हेंटिलेशनचा मर्यादित पुरवठा असलेल्या अतीउंच अपार्टमेंटमध्ये ही उपकरणे विशेषतः फायदेशीर ठरू शकतात.
स्वयंपाकघर आणि बाथरूमसारख्या आपल्या घराच्या काही भागा, प्रदूषक काढून टाकण्यासाठी विशिष्ट व्हेंटिंगची आवश्यकता असते. स्वयंपाकघरातील चिमण्या आणि एक्झॉस्ट फॅन बसवून स्वयंपाकातील वास/दुर्गंधी आणि धूर बाहेर फेका. त्याचप्रमाणे बाथरूममधील एक्झॉस्ट फॅन ओलावा आणि दुर्गंधी दूर करून हवेची गुणवत्ता चांगली राखण्यास मदत करतात.
आपले घर डिझाइन करताना खिडक्यांच्या जागा आणि आकाराकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. चांगल्या वायुप्रवाहाची सोय करण्यासाठी, मोकळ्या जागेकडे तोंड असलेल्या आपल्या घराच्या बाजूला मोठ्या आकाराच्या खिडक्या बसवा. हे डिझाइन आपल्या राहणी जागेतून ताजी हवा प्रवाहित करते, जेणेकरून सुसंगत व्हेंटिलेशन सुनिश्चित होते.
मर्यादित वायुप्रवाहामुळे आपल्या राहणी जागेत योग्य व्हेंटिलेशनचा अभाव असल्यास, एक्झॉस्ट फॅन लावण्याचा विचार करा. हे फॅन्स, ज्याला संतुलित व्हेंटिलेशन सिस्टम देखील म्हणतात, दोन प्रकारात येतात: पॉईंट-सोर्स आणि डक्टेड. पॉईंट-सोर्स एक्झॉस्ट फॅन बाथरूम आणि स्वयंपाकघरासारख्या विशिष्ट भागातून दुर्गंधी आणि प्रदूषक बाहेर काढून टाकण्यासाठी योग्य असतात, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण इनडोअर वातावरणावर परिणाम होण्यापासून टाळले जाते. डक्टेड सिस्टीम ही लिव्हिंग रूम(बैठक खोली) आणि बेडरूम सारख्या सामायिकपणे वापरल्या जाणार्या जागांना ताजी हवा पुरवते, आणि हवेशीर राहणी वातावरण सुनिश्चित करते.
घराच्या व्हेंटिलेशन डिझाइनसाठी या घटकांचा काळजीपूर्वक विचार करून, आपण मर्यादित डिझाइन लवचिकता असलेल्या अतीउंच अपार्टमेंट मध्ये किंवा आपल्या वैयक्तिक घरांमध्ये देखील पुरेसे व्हेंटिलेशन असलेल्या घराची योजना आखू शकता.
चांगले व्हेंटिलेशन असलेली राहणी जागा सुनिश्चित करण्यासाठी व्हेंटिलेशन सिस्टमचे प्रकार समजून घेणे महत्वाचे आहे. नैसर्गिक व्हेंटिलेशनपासून ते यांत्रिक प्रणालीपर्यंत, प्रत्येक प्रणाली अद्वितीय फायदे आणि मुद्दे प्रदान करते. चला या व्हेंटिलेशन पद्धतींच्या तपशीलांमध्ये जाऊया:
जेव्हा खिडक्या आणि दरवाजांमधून अनियंत्रित हवेची हालचाल होते तेव्हा नैसर्गिक व्हेंटिलेशन होते. त्यामुळे घर बांधण्याचे नियोजन करताना, आपल्याकडे पुरेशी जागा असेल तर, त्याभोवती खिडक्या आणि दरवाजे जरूर लावा ज्यामुळे नैसर्गिक हवा खेळती राहील.
ही प्रणाली अतिशय मूलभूत आणि सोपी स्वरूपाची आहे. आपण सामाईक बाथरूम आणि स्वयंपाकघरात एक्झॉस्ट फॅन लावू शकतात. बर्याच घरांमध्ये ते असतात, तथापि, आपल्याला हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की एक्झॉस्ट पंखे योग्यरित्या घराबाहेरील वातावरणाची जोडले गेले आहेत; अन्यथा, सिस्टम फक्त ओलावा हलवत असेल आणि हवेला आपल्या घरात इतरत्र कुठे नेत असेल.
ही सिस्टीम बाहेरील हवेला घरात सोडते, ज्यामुळे आतील हवेतील तितक्याच प्रमाणातील हवा घराबाहेर पडते. बहुतेक पुरवठा/सप्लाय व्हेंटिलेशन सिस्टम मध्यवर्ती हीटिंग आणि कूलिंग सिस्टमच्या विद्यमान नलिका(डक्ट) आणि त्यांचे ब्लोअर वापरतात. त्यांना फक्त एअर हँडलरला बाहेरील भागाशी जोडणारी एक लहान पुरवठा नलिका आवश्यक असते, जी बाहेरची हवा, आत आणते.
ज्या दराने घरातील शिळी हवा संपते, त्याच दराने ही सिस्टीम बाहेरची ताजी हवा घरात आणते. समतोल व्हेंटिलेशन सिस्टीम व्यवस्थित डिझाईन करून बसवली तर ती घरात दबाव किंवा ऋणदबाव निर्माण करत नाही आणि सर्व खोल्यांमध्ये योग्य व्हेंटिलेशन होते.
उष्णता पुनर्प्राप्ती व्हेंटिलेशन, ज्याला यांत्रिक(मेकॅनिकल) वेंटिलेशन देखील म्हणतात, हे सहसा आपल्या घराच्या छतावर किंवा अपार्टमेंट इमारतीच्या वर स्थित असते. हे उष्णता पुनर्प्राप्ती व्हेंटिलेशन ताजी हवा प्रदान करण्यासाठी वेगवेगळ्या तापमानांच्या दरम्यान कार्य करते. व्हेंटिलेशन आणि वायुप्रवाह कायम राखण्यासाठी आपल्या घराला वातानुकूलित हवा प्रदान करण्यासाठी हे विशेषतः डिझाइन केलेले असते.
एक प्रभावी होम व्हेंटिलेशन सिस्टम तयार करण्यासाठी विविध घटकांचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. आपले घर हवेशीर(चांगल्या प्रकारे व्हेंटिलेट) राहील याची खात्री करण्यासाठी, आपल्याला खालील गोष्टींची आवश्यकता असेल:
व्हेंटिलेशन सिस्टमच्या प्रकारांमधून आपण काय निवडाल हे मुख्यतः आपल्या घराची मांडणी आणि आपल्या विशिष्ट गरजा यावर अवलंबून असावे. सामान्य पर्यायांमध्ये नैसर्गिक व्हेंटिलेशन (खिडक्या आणि दरवाजांद्वारे), यांत्रिक व्हेंटिलेशन (जसे एक्झॉस्ट पंखे, अॅटिक पंखे आणि व्होल-हाऊस पंखे) किंवा संतुलित व्हेंटिलेशन (जसे की उष्णता पुनर्प्राप्ती व्हेंटिलेशन किंवा ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेशन) यासारख्या वर नमूद केलेल्या पर्यायांचा समावेश आहे. प्रत्येक सिस्टमचे त्यांचे फायदे आणि तोटे आहेत, म्हणून आपल्या घरासाठी सर्वात अनुकूल अशी निवड करणे महत्वाचे आहे.
आपल्या उद्दिष्टांशी जुळणार्या होम व्हेंटिलेशन रणनीती ठरवा. उदाहरणार्थ, जर आपल्याला अतिरिक्त ओलावा काढून टाकायचा असेल तर एक्झॉस्ट व्हेंटिलेशनला प्राधान्य देणारी सिस्टम योग्य असू शकते. याउलट, जर आपण ऊर्जा कार्यक्षमतेचे लक्ष्य ठेवत असाल तर उष्णता किंवा ऊर्जा पुनर्प्राप्ती क्षमतेसह संतुलित व्हेंटिलेशन सिस्टमचा विचार करा.
खर्चात मोठी तफावत असू शकते, योग्य प्रकारच्या व्हेंटिलेशन सिस्टम आणि वैशिष्ट्यांमधून निवड करताना आपल्या आर्थिक मर्यादा समजून घेणे आणि आपल्या बजेटचे नियोजन करणे महत्वाचे आहे.
व्हेंटिलेशन सिस्टम आपल्या घरासाठी योग्य आकाराची आहे याची खात्री करा. मोठ्या आकाराची सिस्टम अकार्यक्षम असू शकते, तर लहान आकाराची सिस्टम आपल्या व्हेंटिलेशनच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करणार नाही.
आपली व्हेंटिलेशन सिस्टम चांगली कामगिरी करीत आहे हे सुनिश्चित करण्यासाठी इनडोअर()घरातील हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करणे आवश्यक आहे. यामध्ये आर्द्रता, कार्बन डायऑक्साईडची पातळी आणि पार्टिकुलेट मॅटर(छोटे कण) मोजण्यासाठी एयर क्वालिटी सेन्सरचा वापर करणे समाविष्ट असू शकते, ज्यामुळे आपल्याला आवश्यक समायोजन(अॅडजस्टमेंट) करणे शक्य होते.
फिल्टर, पंखे आणि इतर घटकांवर कालांतराने धूळ आणि कचरा जमा होऊ शकतो, ज्यामुळे सिस्टमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. नियमित देखभाल आणि सर्व्हिसिंगसाठी निर्मात्याच्या शिफारशींचे अनुसरण करा.
आपण यांत्रिक प्रणाली स्थापित करीत असल्यास, ते व्यावसायिकरित्या स्थापित करण्याचा सल्ला दिला जातो. विविध प्रकारच्या व्हेंटिलेशन सिस्टमची योग्य स्थापना/इंस्टॉलेशन हे सुनिश्चित करते की सिस्टम योग्यरित्या कार्य करते आणि सुरक्षा मानकांचे पालन करते.
आपण विविध प्रकारच्या व्हेंटिलेशन सिस्टममधून निवडण्यापूर्वी, आपल्याला अनुभवी अभियंत्याला खालील प्रश्न विचारणे आवश्यक आहे:
• इमारतीतील एकंदरीत वायुप्रवाहाची दिशा स्वच्छ ते घाणेरड्या क्षेत्रापर्यंत आहे का?
• प्रत्येक खोलीत ताजी हवा पोहोचवण्यासाठी व्हेंटिलेशन सिस्टीम कितपत कार्यक्षम आहे?
• प्रत्येक खोलीतील दुर्गंधी दूर करण्यासाठी व्हेंटिलेशन सिस्टीम कितपत कार्यक्षम आहे?
• छोट्या खिडक्यांमधून क्रॉस व्हेंटिलेशन
• दरवाजांना जाळी लावा जेणेकरून हवा प्रवाहीत होऊ शकेल
• ताज्या हवेला प्रोत्साहन देणारी इनडोअर प्लान्ट(झाडे) लावा
आरोग्यकारक आणि आरामदायक राहणी वातावरण राखण्यासाठी चांगले व्हेंटिलेशन असलेले घर महत्वाचे आहे. त्याचे महत्त्व समजून घेण्यापासून ते विविध प्रकारच्या व्हेंटिलेशन सिस्टमचा शोध घेण्यापर्यंत, आपल्या घराला व्हेंटिलेशन करण्याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आता आपल्याकडे आहे. आपण नैसर्गिक व्हेंटिलेशन, यांत्रिक सिस्टम किंवा संतुलित व्हेंटिलेशनची यापैकी कोणाचीही निवड केली तरीही, हवेशीर( चांगले व्हेंटिलेशन असलेल्या) घराची खात्री करणे ही आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठीची आणि आपल्या मालमत्तेच्या दीर्घायुष्यासाठीची गुंतवणूक आहे. हवेची गुणवत्ता आणि आरामाला प्राधान्य द्या आणि आपल्याला हवेशीर आणि मोहक राहणी जागेचे फायदे प्राप्त होतील.