अल्ट्राटेक बांधकाम उत्पादने

व्यवसाय

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी आणि जागतिक स्तराच्या आघाडीच्या सिमेंट उत्पादकांपैकी एक आहे. व्हाइट सिमेंट आणि रेडी मिक्स काँक्रीटची ही देशातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे.

कंपनीची ग्रे सिमेंटची वार्षिक एकंदरीत क्षमता 116.75 दशलक्ष टन (एमटीपीए) एवढी आहे. अल्ट्राटेक सिमेंटमचे 23 एकत्रित प्रकल्प,1 क्लिंकरायझेशन प्लांट, 26 ग्राइंडिंग युनिट्स आणि 7 बल्क टर्मिनल्स आहेत. 1 व्हाइट सिमेंट प्रकल्प, 2 वॉलकेअर पुट्टी प्रकल्प आणि 100+ आरएमसी प्रकल्प आहेत- जे भारत, यूएई, बहारीन आणि श्रीलंकामध्ये आहेत. अल्ट्राटेक सिमेंट भारतातली सिमेंटची सर्वात मोठी निर्यातक कंपनी देखील आहे जी हिंदी महासागर, आफ्रिका, युरोप आणि मध्यपूर्वे देशांच्या मागण्यांची पूर्तता करते. (*सप्टेंबर 2020 पर्यंत कमिशनिंग अंतर्गत 2 MTPA सहित)

उत्पादने

अल्ट्राटेक अगदी पायापासून ते समाप्तीपर्यंत बांधकामाच्या विविध बाबींमध्ये सेवा देणारी विविध उत्पादने उपलब्ध करते. यामध्ये सामान्य पोर्टलँड सिमेंट, पोर्टलँड ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंट, पोर्टलँड पोझलाना सिमेंट, व्हाइट सिमेंट, रेडी मिक्स काँक्रीट, बांधकाम उत्पादने आणि इतर अनेक बांधकाम समाधानांचा समावेश होतो. 'अल्ट्राटेक, अल्ट्राटेक प्रीमियम आणि बिर्ला सूपर' या ब्रँडअंतर्गत सिमेंटची विक्री केली जाते. 'बिर्ला व्हाईट'च्या ब्रँड नावाने व्हाइट सिमेंट, 'अल्ट्राटेक काँक्रीट' नावाने रेडी मिक्स काँक्रीट आणि 'एक्सट्रालाइट, फिक्सोब्लॉक, सील अँड ड्राय अॅण्ड रीडिप्लास्ट' नवीन श्रेणीच्या उत्पादनांची निर्मिती केली जाते. अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स हे एक रिटेल/किरकोळ स्वरूप आहे जे ग्राहकाला एकाच ठिकाणी विविध प्राथमिक बांधकाम साहित्य पुरवते.

Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further
LOADING...