Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

काँक्रीटमध्ये गंज कशामुळे लागतो आणि ते कसे टाळावे

काँक्रीट हे त्याच्या टिकाऊपणा आणि सामर्थ्यासाठी ओळखले जाणारे तसेच मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे बांधकाम मटेरियल आहे. तथापि, गंजण्यापासून उद्भवणार्या समस्यांपासून ते मुक्त नाही, म्हणूनच गंजणे कसे टाळावे हे शिकणे आवश्यक आहे.

Share:


बांधकाम करणारे आणि मालमत्ता धारकांनी गंज लागण्याची कारणे आणि ते कसे टाळावे याबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे, विशेषत: संरचनात्मक आणि आर्थिकदृष्ट्या यामुळे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेता.

 

या ब्लॉगमध्ये, आपण काँक्रीटमधील गंज लागण्याच्या कारणांचा, तसेच त्याच्या प्रारंभास कारणीभूत असलेल्या घटकांबद्दल जाणून घेऊ. पर्यावरणीय घटकांपासून ते खराब बांधकाम पद्धतींपर्यंत, मूळ कारणे समजून घेणे हे प्रभावी प्रतिबंधात्मक रणनीती तयार करण्यासाठी आवश्यक असते. शिवाय, या वास्तूंमधील गंजणे रोखण्यासाठी आम्ही आपल्याला व्यावहारिक पावले उचलण्यासह सक्षम करू. या प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करून, आपण आपल्या काँक्रीट निर्माणचे दीर्घायुष्य आणि विश्वासार्हता सुनिश्चित करू शकता, ज्याद्वारे दीर्घकालीन कालावधीत वेळ आणि संसाधने दोन्ही वाचवू शकता.



काँक्रीट गंजण्याची कारणे



काँक्रीट गंजणे ही एक क्लिष्ट प्रक्रिया आहे जी अंतर्गत आणि बाह्य अशा अनेक घटकांनी प्रभावित होते. प्रभावी प्रतिबंधात्मक रणनीती विकसित करण्यासाठी ही कारणे समजून घेणे महत्वाचे आहे. काँक्रीटच्या संरचनेतील गंजास कारणीभूत ठरणाऱ्या काही प्रमुख घटकांकडे पाहूया:

 

1. पाणी-सिमेंट गुणोत्तर/प्रमाण



काँक्रीटचे सामर्थ्य आणि टिकाऊपणा निश्चित करण्यात पाणी सिमेंट गुणोत्तर महत्त्वाची भूमिका बजावते. जास्त पाणी-सिमेंट गुणोत्तरामुळे काँक्रीटची पार्यता(पर्मीअबिलिटी) वाढू शकते, ज्यामुळे ते पाण्याच्या प्रवेशास आणि मग त्यामुळे गंजण्यास अधिक प्रभाव्य बनते. अतिरिक्त पाणी हे क्लोराईड आयनसारख्या संक्षारक(गंजकारक) एजंटांना मजबुतीकरण पोलादा(सळई)पर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रवेशिका म्हणून कार्य करते, ज्यामुळे गंज प्रक्रियेस वेग येतो. गंजण्याचा धोका कमी करण्यासाठी पाणी-सिमेंटचे योग्य प्रमाण राखणे आवश्यक आहे.

 

2. काँक्रीटमध्ये आकुंचन (श्रिंकेज)



जसे काँक्रीट कोरडे होऊन मजबूत होत जाते, तसे ते पाण्याच्या बाष्पीभवनामुळे ते आकुंचन होण्याच्या प्रक्रियेतून जाते. या आकुंचनामुळे काँक्रीटमध्ये भेगा/तडा निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे संक्षारक एजंटांना मजबुतीकरण पोलादापर्यंत पोहोचण्याचे मार्ग उपलब्ध होतात. भेगा केवळ संरचनात्मक अखंडतेशी तडजोड करत नाहीत तर त्या संरचना कमकुवत देखील करतात आणि गंज लागण्याच्या प्रारंभास आणि तो पसरण्यास सोपे करतात.

 

3. मटेरियलची गुणवत्ता (क्वालिटी)

काँक्रीट बांधकामात वापरल्या जाणाऱ्या मटेरियलच्या गुणवत्तेचा थेट परिणाम गंजण्याच्या प्रतिकारावर होतो. अपुऱ्या गंज प्रतिकारासह कमी-गुणवत्तेचे अग्रीगेट(समुच्चय) किंवा पोलाद मजबुतीकरण(सळई) गंजणे सुरू होण्यास गती देऊ शकते. उच्च-गुणवत्तेच्या मटेरियलमध्ये गुंतवणूक केल्यास काँक्रीट रचनांचे दीर्घायुष्य लक्षणीयरित्या वाढू शकते.

 

4. काँक्रीटची पार्यता(पर्मीअबिलिटी)

पार्यता(पर्मीअबिलिटी) म्हणजे पाणी आणि इतर पदार्थांची काँक्रीटमधून जाण्याची (पास होण्याची) क्षमता. अत्यंत पार्यता काँक्रीट संक्षारक एजंटांना मजबुतीकरण पोलादात प्रवेश करण्यास आणि त्यापर्यंत पोहोचण्यास शक्य करते, ज्यामुळे गंजण्याचा वेग वाढतो. योग्य मिश्रण डिझाइन (मिक्स डिझाईन) आणि अॅडिटीव्हसचा वापर काँक्रीट पार्यता कमी करण्यास आणि त्याचा टिकाऊपणा वाढविण्यास मदत करू शकतो.

 

5. ओलावा

गंज प्रक्रियेत ओलावा हा एक महत्त्वाचा घटक आहे. जास्त आर्द्रता किंवा पाण्याच्या सतत संपर्कात असलेल्या भागात विशेषत: गंज होण्याचा धोका अधिक असतो. आर्द्रता असे वातावरण तयार करते जिथे संक्षारक एजंट मजबुतीकरण स्टीलसोबत अभिक्रिया करू शकतात, ज्यामुळे कालांतराने गंज लागण्यास सुरूवात होते.

 

6. काँक्रीटचे सामर्थ्य



काँक्रीट नैसर्गिकरित्या मजबूत असले तरी खराब डिझाइन, अयोग्य मिश्रण गुणोत्तर, योग्य सजलन प्रक्रियेचा अभाव आणि चुकीची प्लेसमेंट यासारखे घटक सामर्थ्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. कमकुवत काँक्रीटला नुकसान होण्याची, भेगा पडण्याची आणि शेवटी गंज लागण्याची शक्यता जास्त असते.

 

 

काँक्रीट गंजणे कसे टाळावे?



काँक्रीट गंजणे रोखण्यासाठी निकोप बांधकाम पद्धती, धोरणात्मक मटेरियल निवड आणि सक्रिय देखभाल यांचे संयोजन समाविष्ट आहे. सक्रिय उपाययोजना करून, आपण आपल्या काँक्रीट रचनांचे गंजाच्या हानिकारक परिणामांपासून संरक्षण करू शकतो. काँक्रीटमधील गंज रोखण्यासाठी काही प्रभावी प्रतिबंधात्मक रणनीती बघूया:

 

1. काँक्रीटची गुणवत्ता



गंज प्रतिबंधाचा मूलाधार हा उच्च-गुणवत्तेच्या काँक्रीटचा वापर करण्यात आहे. योग्य मिक्स डिझाइन, योग्य सजलन तंत्र आणि योग्य अग्रिगेट वापरल्यास काँक्रीटचा टिकाऊपणा आणि गंज प्रतिकार वाढू शकतो. चांगले बांधकाम केलेली काँक्रीटची रचना ही गंजण्यापासून संरक्षणाचे पहिले बळकटीकरण बनते.

 

2. एपॉक्सी कोटिंग



इपॉक्सी कोटिंग्स काँक्रीटच्या पृष्ठभागांसाठी एक उत्कृष्ट संरक्षक थर प्रदान करतात. हे कोटींग्स अडथळे म्हणून कार्य करतात, काँक्रीटला संक्षारक घटकांच्या संपर्कात येण्यापासून वाचवतात. इपॉक्सी कोटिंग्स केवळ गंजच रोखत नाहीत तर सुधारित रासायनिक प्रतिकार आणि सौंदर्य यासारखे अतिरिक्त फायदे देखील प्रदान करतात. याव्यतिरिक्त, इपॉक्सी ग्राऊटचा वापर खराब झालेल्या काँक्रीटची दुरुस्ती आणि मजबुतीकरण करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्याद्वारे त्याचे आयुष्य वाढविले जाऊ शकते.

 

3. पॉलिमरिक फायबर

काँक्रीट मिश्रणात पॉलिमरिक फायबर्सचा समावेश केल्याने संक्षारक एजंट्ससाठी काँक्रीटमध्ये प्रवेश करण्याचा एक सामान्य मार्ग असलेल्या श्रिंकेज क्रॅकिंग (आकुंचन झाल्यामुळे भेगा जाणे) ला नियंत्रित करण्यात मदत होत. हे फायबर्स काँक्रीटची एकंदरीत कणखरता आणि टिकाऊपणा वाढवतात, ज्यामुळे गंज लागण्याचा धोका कमी होतो.

 

4. योग्य कारागिरी



कुशल आणि काळजीपूर्वक बांधकाम पद्धती गंज प्रतिबंधात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, विशेषत: काँक्रीटमधील पोलादा(स्टील)चे गंजणे रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. योग्य संहनन(कॉम्पॅक्शन), मजबुतीकरणा(सळई)साठी पुरेसे कव्हर आणि बांधकामादरम्यान तपशीलांकडे लक्ष दिल्यास गंज असुरक्षितता उद्भवू शकणारे दोष राहण्याची आणि भेगा/तडा पडण्याची शक्यता कमी होते.

 

5. संक्षारक नसलेल्या (गंज-प्रतिरोधक) धातूंचा वापर करा

मजबुतीकरण स्टील निवडताना, स्टेनलेस स्टील किंवा एपॉक्सी-कोटेड स्टील सारख्या बिगर-संक्षारक किंवा गंज-प्रतिरोधक मटेरियल निवडा. हे मटेरियल संक्षारक वातावरणाचा प्रतिकार करण्यासाठी डिझाइन केलेले असतात आणि ते काँक्रीट संरचनेचे आयुष्य लक्षणीयरित्या वाढवू शकतात.

 

6. कोटिंग वापरा

शेवटी, काँक्रीट कोटिंग लावणे हे बाह्य हानिकारक घटकांविरूद्ध अतिरिक्त संरक्षणात्मक थर(लेयर) प्रदान करते. हे कोटिंग्स गंजविरोधी रंगांपासून ते सीलेंट्सपर्यंत असू शकतात, जे पाणी आणि संक्षारक एजंटला काँक्रीटमध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतात. कालांतराने त्यांची परिणामकारकता सुनिश्चित करण्यासाठी आणि काँक्रीटमधील गंजणे रोखण्यासाठी या कोटिंग्सची नियमित तपासणी आणि देखभाल करणे आवश्यक आहे.



काँक्रीटच्या संरचनेतील गंज लागणे हा एक गंभीर धोका आहे जो कालांतराने त्यांच्या अखंडतेशी तडजोड करू शकतो. पाणी-सिमेंट गुणोत्तर, आकुंचन आणि मटेरियलची गुणवत्ता यासारखी मूळ कारणे समजून घेऊन आपण गंज रोखण्यासाठी सक्रिय पावले उचलू शकतो. इपॉक्सी कोटिंग्स, पॉलिमर फायबर आणि योग्य कारागिरी हे प्रमुख प्रतिबंधात्मक उपाय आहेत. लक्षात ठेवा, आज प्रतिबंधात गुंतवणूक केल्यास उद्यासाठी काँक्रीट बांधकामांचे दीर्घायुष्य आणि विश्वासार्हता सुनिश्चित होते.



वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 

१) कोणत्या काँक्रीटला गंज लागण्याची शक्यता जास्त असते?

उच्च पाणी-सिमेंट गुणोत्तर, निकृष्ट दर्जाचे मटेरियल, वाढलेली पार्यता आणि अपुरी सजलन प्रक्रिया केलेले काँक्रीट गंजण्यास अधिक ग्रहणशील आहे. याव्यतिरिक्त, क्लोराईड, सल्फेट्स किंवा तीव्र हवामान परिस्थिती सारख्या संक्षारक घटकांच्या संपर्कात असलेल्या संरचना देखील अधिक असुरक्षित असू शकतात.

2) आरसीसीवर गंजाचा काय परिणाम होतो?

प्रबलित सिमेंट काँक्रीट (आरसीसी) मधील गंजामुळे आकारमान विस्तार होऊ शकतो, ज्यामुळे अंतर्गत ताण आणि भेगा निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे भारवहन क्षमता आणि संरचनात्मक अखंडता कमी होते. यामुळे भारवहन क्षमता कमी होऊ शकते, तणावाखाली खराब कामगिरी होऊ शकते आणि शेवटी संरचनात्मक अखंडतेशी तडजोड होऊ शकते.

 

३) काँक्रीटच्या टिकाऊपणावर गंजाचा काय परिणाम होतो?

गंजामुळे काँक्रीटची पार्यता वाढते, ज्यामुळे तडा/भेगा जाणे, पापुद्रे पडणे आणि शेवटी मोडकळीस येणे अशा गोष्टी होऊ शकतात. हे घटक काँक्रीटच्या वास्तूंचा टिकाऊपणा आणि आयुर्मान लक्षणीयरीत्या कमी करतात आणि दुरुस्ती किंवा बदल करण्यासाठी लवकर आलेले आणि खर्चिक हस्तक्षेपाची आवश्यकता वाढवतात.

 

4) कोणते मटेरियल काँक्रीट गंजणे रोखू शकतात?

प्रतिबंधात्मक मटेरियलमध्ये उच्च-गुणवत्तेचे अग्रिगेट आणि सिमेंट, इपॉक्सी ग्राउट, पॉलिमर फायबर, स्टेनलेस स्टील सारखे संक्षारक नसलेले (गंज-प्रतिरोधक) धातू आणि संरक्षणात्मक काँक्रीट कोटिंग्स यांचा समावेश आहे. बांधकामाच्या टप्प्यात हे मटेरियल आणि साधने समाविष्ट केल्याने दीर्घकाळापर्यंत गंजाविरूद्ध चांगला प्रतिकार सुनिश्चित होतो.

 

5) काँक्रीटमध्ये कोणत्या धातुला गंज लागत नाही?

स्टेनलेस स्टील आणि गॅल्व्हेनिज्ड स्टील सारख्या धातूंच्या कमी असलेल्या अभिक्रियाशीलतेच्या पातळीमुळे काँक्रीटमध्ये गंज लागण्याची शक्यता कमी असते. त्यांचा गंज प्रतिकार त्यांना दीर्घकालीन टिकाऊपणा आणि देखभाल बचतीसाठी एक प्रभावी निवड बनवतो.


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ





घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....