Share:
होम बिल्डिंग गाईड
आमचे प्रॉडक्ट्स
उपयोगी टूल्स
प्रॉडक्ट्स
अल्ट्राटेक बिल्डिंग प्रॉडक्ट्स
Share:
• स्पेस ऑप्टिमायझेशन(जागेच्या इष्टतमीकरण)साठी दिवाणखान्याच्या आकारानुसार फरशीचा आकार(साइज) निवडा.
• अरुंद वातावरण अनुभव टाळण्यासाठी कमी सूर्यप्रकाशाच्या भागात फिकट/ज्वलंत रंगाच्या फरशांची निवड करा.
• गुणवत्ता हमी आणि ट्रेंडी डिझाइनसाठी नामांकित टायल्स ब्रँडला प्राधान्य द्या.
• व्हिट्रिफाइड किंवा सिरॅमिक मटेरियलचा विचार करून हाय-ट्रॅफिक(जास्त पायी वाहतूक) असलेल्या दिवाणखान्यासाठी हेवी-ड्युटी, अँटी-स्क्रॅच फरशी निवडा.
• आधुनिक सौंदर्य आकर्षण वाढविण्यासाठी आकर्षक रंग आणि समकालीन(कोंटेंपरी) पॅटर्नवर लक्ष केंद्रित करा.
आपण अनेकदा जागेचे तपशील समजून न घेता फरशी निवडतो. दिवाणखान्यासाठी फरशा कशा निवडायच्या हे जाणण्यासाठी दिवाणखान्याचा आकार(साइज) मोजला पाहिजे. जर आपली जागा लहान असेल तर मोठ्या फरशा निवडणे चांगले. हे नेहमीच आपली जागा मोठी असल्याचे भासविते. तसेच जर तुमची बैठक जागा मोठी असेल तर तुम्ही छोट्या आकाराच्या फरशा वापरू शकता.
दिवाणखाना/बैठकीची खोली जवळजवळ नेहमीच चांगली उजळलेली असते, तरीही अशा काही जागा असू शकतात ज्यांना नैसर्गिक प्रकाश मिळत नाही. अशा वेळी हलक्या रंगाच्या/शेड्सच्या फरशा वापरणे चांगले राहते. कमी सूर्यप्रकाश असलेल्या दिवाणखान्यात गडद रंगाच्या फरशा वापरल्यामुळे खोली मळकट/अंधकारमय/उदास दिसेल.
योग्य दिवाणखान्याची फरशी डिझाइन निवडणे हा एक उत्स्फूर्तपणे घेतलेला निर्णय असू नये. नामांकित आणि दर्जेदार उत्पादनांसाठी ओळखला जाणारा टायल ब्रँड निवडा. वर्षानुवर्षे उद्योगात असलेला टायल ब्रँडला ट्रेंड माहिती असतात तसेच ते आपल्याला आपल्या दिवाणखान्यासाठी सर्वोत्तम फरशा मिळतील याची खात्री करतात.
दिवाणखाना/बैठकीची खोली ही घरातील एक अशी जागा आहे जिथे जास्तीत जास्त वर्दळ असते. आपण घरातील इतरांपेक्षा थोडे जास्त हेव्ही-ड्युटी असलेल्या फरशांचाचा विचार करायला हवा. शिवाय, अँटी-स्क्रॅच आणि अँटी-स्टेन असलेल्या फरशा निवडा कारण येथेच आपले बहुतेक कुटुंब वावरत असते. तसेच विविध प्रकारच्या फरशा आहेत; व्हिट्रिफाइड टाइल्सपासून ते सिरॅमिक टाइल्सपर्यंत, आपल्या जीवनशैलीनुसार आपल्या जागेसाठी योग्य दिवाणखान्याची फरशी डिझाइन निवडा.
दिवाणखाना/बैठकीची खोली अशी आहे जिथे घरी असताना आपला बहुतेक वेळ व्यतीत होईल. ती अशी आहे की जिथे आपण चित्रपट पहात असाल, आपल्या मित्रांसह गप्पा मारणार आणि पाहुण्यांचे स्वागत कराल, म्हणून आपण हे सुनिश्चित करावे की आपण आनंददायक रंग आणि पॅटर्न असलेल्या फरशा निवडत आहात. दिवाणखान्यासाठी आधुनिक फरशांचा विचार करा, शक्यतो आपल्या फर्निचरला पूरक असा तटस्थ रंग आणि जागेचे एकंदर आधुनिक सौंदर्य वाढविणारा समकालीन पॅटर्न वापरा.
दिवाणखान्यासाठी फरशीची चांगली काळजी आणि देखभाल घेणे आवश्यक असते. टिकाऊ आणि देखभाल करण्यास सोप्या असलेल्या फरशा निवडा, विशेषत: दिवाणखान्यासाठी फरशी डिझाइन शोधताना. आपल्याला काही वेळातच आपल्या फरशींमध्ये भेगा/तडा बघायच्या नसतील, तर जास्त काळ टिकणार्या आणि साफ करण्यास देखील सोप्या असलेल्या फरशा निवडणे महत्वाचे ठरते.
दिवाणखान्यासाठी टाइल्स कशा निवडाव्यात याबद्दल च्या बर्याच टिप्सपैकी या काही आहेत. आपण एखाद्या नवीन ठिकाणी घर बदलून जात असाल किंवा आपले घर सुधारणा करत असाल, या टिप्स आपल्याला आपला दिवाणखाना चेतनामय करण्यात मदत करतील. हे सोपे करण्यासाठी, दिवाणखान्यासाठी सर्वोत्तम फरशी डिझाइन निवडण्याच्या प्रक्रियेत आपण कोणतेही महत्वाचे टप्पे चुकवायला नका याची खात्री कशी करावी याबद्दल आमच्याकडे हा छोटा व्हिडिओ देखील आहे: https://youtu.be/xNzPO4FpehU