वॉटरप्रूफिंग च्या पद्धती, मॉडर्न किचन डिझाईन्स, home करता वास्तु टिप्स, घर बांधकाम खर्च

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा



सिमेंट वॉटरप्रूफिंग म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि फायदे याबद्दल एक मार्गदर्शक

मुसळधार पावसातही इमारती कोरड्या कशा राहतात, याचे कधी नवल वाटले आहे का? गुपित आहे सिमेंट वॉटरप्रूफिंग. वॉटरप्रूफिंग एक संरक्षक आवरण म्हणून कार्य करते जे पाणी आणि ओलाव्यापासून वास्तूंचे संरक्षण करते आणि इमारत कोरडी आणि सुरक्षित राहील याची खात्री करते.

Share:


जर आपण घर बांधण्याची योजना आखत असाल आणि ते पाऊस आणि ओलसरपणापासून कसे सुरक्षित ठेवावे याबद्दल चिंतित असाल तर सिमेंट वॉटरप्रूफिंग हे एक उत्तम उत्तर आहे. पावसात रेनकोट परिधान करण्याप्रमाणेच, पाणी गळतीमुळे उद्भवू शकणाऱ्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी आम्ही आपल्या घराला वॉटरप्रूफ लेयरने झाकून ठेवतो.

 

बांधकाम प्रकल्पांमध्ये वॉटरप्रूफिंग हा एक महत्त्वाचा उपाय आहे, कारण पाण्याच्या गळतीमुळे केवळ ओलसर पट्टा, बुरशी आणि पाण्यापासूनचे संरचनात्मक नुकसान होऊ शकत नाही तर इमारतीच्या  एकंदरीत सामर्थ्यास देखील हानी पोहोचते. वॉटरप्रूफिंगची अंमलबजावणी करून आपण विविध वातावरणात सिमेंट-आधारित वास्तूंची अखंडता, देखावा/सौंदर्य आणि टिकाऊपणा प्रभावीपणे जतन करू शकतो. या ब्लॉगमध्ये, आपण सिमेंट वॉटरप्रूफिंग म्हणजे काय आणि इष्टतम वॉटरप्रूफिंग सुनिश्चित करण्यासाठी ते विविध प्रकारे कसे केले जाते याबद्दल जाणून घेऊया.



सिमेंट वॉटरप्रूफिंग म्हणजे काय?



सिमेंट वॉटरप्रूफिंग म्हणजे एखाद्या वास्तूच्या पृष्ठभागावर विशिष्ट वॉटरप्रूफिंग रसायनांमध्ये मिसळलेल्या सिमेंटचा समावेश असलेला संरक्षक अडथळा लागू करणे. इमारतीच्या रचनेत पाणी किंवा ओलाव्याचा प्रवेश होऊ नये म्हणून हे संरक्षणात्मक उपाय डिझाइन केलेले असतात. हे मिश्रण एक मजबूत, पाणी-प्रतिरोधक थर तयार करते जे संरचनेची अखंडता आणि कोरडेपणा सुनिश्चित करते. बांधकाम उद्योगातील ही आवश्यक प्रक्रिया इमारतींचा टिकाऊपणा आणि आयुर्मान वाढवते आणि पाणी आणि ओलाव्याशी संबंधित नुकसानीवर किफायतशीर उपाय प्रदान करते.

 

 

सिमेंट वॉटरप्रूफिंगचे प्रकार

संरचनेची आवश्यकता, स्थान आणि पाण्याच्या संभाव्य प्रत्यक्षनावर अवलंबून या पद्धतीचे वॉटरप्रूफिंग अनेक प्रकारे केले जाऊ शकते. खाली काही लोकप्रिय प्रकार दिले आहेत:

 

1. सिमेंटयुक्त वॉटरप्रूफिंग



या पद्धतीत सिमेंटमध्ये वॉटरप्रूफिंग कंपाऊंड मिसळून एक पेस्ट तयार केली जाते, जी पृष्ठभागावर एक पातळ लेप(कोटिंग) म्हणून लावली जाते. एकदा ती कोरडी झाली की ती एक संरक्षक थर तयार करते जो पाण्याच्या प्रवेशास अत्यंत प्रतिरोधक असतो. या प्रकारचे वॉटरप्रूफिंग वापरण्यास सोपे आणि अत्यंत अष्टपैलू असते, हे बहुतेकदा शौचालय आणि स्वयंपाकघर यासारख्या अंतर्गत ओलाव्याच्या भागात वापरले जाते. त्याचा फायदा त्याच्या टिकाऊपणात आणि वेगवेगळ्या पृष्ठभागांवर चांगल्याप्रकारे आसंजीत(चिपकणे) होण्याच्या क्षमतेत आहे आणि ते बर्‍याचदा तळघर, छत आणि पाण्याच्या टाक्यांमध्ये वापरले जाते.

 

2. लिक्विड वॉटरप्रूफिंग मेम्ब्रेन



लिक्विड वॉटरप्रूफिंग मेम्ब्रेन म्हणजे रोलर, स्प्रे किंवा थापीने लावलेला एक पातळ लेप जो प्रक्रिया अंती काँक्रीटच्या पृष्ठभागावर रबरसारखा वॉटरप्रूफ थर तयार करतो. हे उत्कृष्ट लवचिकता आणि टिकाऊपणा प्रदान करते, ज्यामुळे ते जिथे संरचनेत लहान विस्थापन किंवा हालचाल होऊ शकते अशा समस्याग्रस्त परिस्थितींसाठी एक आदर्श निवड बनते. हे सामान्यत: छत, बाल्कनी आणि ओल्या भागात वापरले जातात. जोडाशिवाय अखंडित/सलग अडथळा निर्माण करण्याची क्षमता हा या पद्धतीचा एक लक्षणीय फायदा आहे.

 

3. बिटुमिनस कोटिंग



बिटुमिनस कोटिंग किंवा डांबर कोटिंग हे एक प्रकारचे वॉटरप्रूफिंग आहे जे त्याच्या उत्कृष्ट पाण्याच्या प्रतिकारामुळे लवचिक संरक्षक कोटसाठी वापरला जातो. जाड थरात लावलेले हे लेप(कोटिंग) प्रभावी वॉटरप्रूफ अडथळा प्रदान करतात. सूर्यप्रकाशाच्या संपर्काविरूद्ध कमकुवत प्रतिकारामुळे मुख्यत: जमिनीखालील काँक्रीटच्या रचनांपुरते मर्यादित असले तरी, हे लेप त्याच्या मजबूत आसंजन/चिकट गुणधर्मांमुळे पाया आणि काँक्रीटच्या फुटिंगसाठी उत्कृष्ट ठरते.

 

4. बिटुमिनस मेम्ब्रेन



बिटुमिनस मेम्ब्रेन वॉटरप्रूफिंग हे एक विश्वासार्ह तंत्र आहे जे प्रामुख्याने कमी उताराच्या छतांसाठी वापरले जाते. यात सेल्फ अॅडहेसिव्ह (स्वयं-आसंजन) आणि टॉर्च-ऑन मेम्ब्रेन असते. स्वयं-आसंजन घटक हे डांबर, पॉलिमर आणि फिलर्स यांचे मिश्रण असते जे कालांतराने त्याचे आसंजन गुणधर्म गमावू शकते. टॉर्च-ऑन मेम्ब्रेन हे  लावले जाते आणि नंतर हवामानाच्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी दाणेदार खनिज (ग्रॅन्यूलर मिनरल) समुच्चया(अग्रिगेट)सह पृष्ठभाग तयार केला जातो. या प्रकारचे वॉटरप्रूफिंग, विशेषत: टॉर्च-ऑन सीलिंग, याला त्याच्या टिकाऊपणा आणि खर्च-कार्यक्षमतेमुळे प्राधान्य दिले जाते.

 

5. क्रिस्टलीय अॅडमिक्चर



स्फटिकीय मिश्रणे (क्रिस्टलीय अॅडमिक्चर) थेट काँक्रीट मिश्रणात जोडली जातात, जिथे ते पाण्यासोबत आणि हायड्रेट न झालेल्या सीमेंट कणांसोबत अभिक्रिया करतात ज्याद्वारे अघुलनशील/अद्रावणीय स्फटिके तयार होतात. हे स्फटिके काँक्रीटमधील छिद्रे आणि केशिका भरतात, आणि प्रभावीपणे पाण्याचा प्रवेश रोखतात. ही पद्धत काँक्रीटला पाण्याच्या प्रवेशापासून सील करते आणि संरक्षण करते आणि विविध प्रकारच्या काँक्रीट अनुप्रयोगांसाठी अनुकल असते.

 

6. अॅडमिक्चर वॉटरप्रूफिंग



अॅडमिक्चर वॉटरप्रूफिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यात पार्यता(पर्मीअॅबिलिटी) कमी करण्यासाठी काँक्रीटमध्ये संयुगे(कंपाऊंड) टाकले जातात, ज्यामुळे पाण्याचा प्रतिकार वाढतो. एकंदरीत टिकाऊपणा आणि दीर्घायुष्य सुधारण्यासाठी मिश्रण प्रक्रियेदरम्यान नवीन काँक्रीटसह अॅडमिक्चर वापरले जाऊ शकते. ही पद्धत विशेषत: मोठ्या प्रकल्पांसाठी फायदेशीर आहे जिथे संपूर्ण काँक्रीटमध्ये समान वॉटरप्रूफिंग सुनिश्चित करणे आवश्यक असते.

 

 

सिमेंट वॉटरप्रूफिंगचे फायदे

जेव्हा पाण्याच्या घुसखोरीच्या हानिकारक परिणामांपासून वास्तूंचे संरक्षण करण्याची वेळ येते, तेव्हा सिमेंट वॉटरप्रूफिंग बरेच फायदे प्रदान करते. चला जाणून घेऊया कोणत्या फायद्यांमुळे ही एक शहाणपणाची गुंतवणूक ठरते:

 

1. टिकाऊपणा वाढवते

वॉटरप्रूफिंगमुळे वास्तूंचा टिकाऊपणा लक्षणीयरीत्या वाढतो. पाण्यापासून संरक्षणात्मक अडथळा निर्माण करून, ते काँक्रीट आणि मेसानरी मटेरियलचे ओलाव्याशी संबंधित हानीपासून संरक्षण करते. हे वास्तूंचे आयुष्य वाढवते, वारंवार दुरुस्ती आणि बदल करण्याची आवश्यकता कमी करते.

 

2. दुरुस्तीचा खर्च कमी करते

वॉटरप्रूफिंगद्वारे पाण्याचे नुकसान लवकर रोखल्यास दीर्घकालीन खर्चात मोठी बचत होऊ शकते. पाण्याच्या घुसखोरीमुळे तडे जाणे, धूप होणे आणि इतर प्रकारचे संरचनात्मक नुकसान होऊ शकते, ज्यासाठी दुरुस्तीची आवश्यकता असते. हे एक सक्रिय उपाय म्हणून कार्य करते, ज्यामुळे भविष्यातील विस्तृत दुरुस्तीची आवश्यकता कमी होते.

 

3. गंज रोखते

पाण्याच्या घुसखोरीमुळे काँक्रीटमधील मजबुतीकरण पोलाद(सळई)ला गंज लागू शकतो, ज्यामुळे संरचनात्मक अखंडतेशी तडजोड होऊ शकते. हे प्रभावीपणे पाणीला पोलादाच्या संपर्कात येण्यापासून रोखून गंजण्याचा धोका कमी करते, अशा प्रकारे मटेरियलचे संरचनात्मक सामर्थ्य कायम राखले जाते.

 

4. गळती रोखते

बांधकामातील सर्वात सामान्य समस्या म्हणजे भिंती आणि फ्लोअरमधून होणारी पाणी गळती. हे अभेद्य अडथळा निर्माण करून पाण्याची गळती प्रभावीपणे प्रतिबंधित करते. विशेषत: जोरदार पावसाची शक्यता असलेल्या भागात हे फायदेशीर आहे, जेणेकरून अंतर्गत भाग कोरडा आणि सुरक्षित राहील.

 

5. ओलसरपणा प्रतिबंधित करते

भिंतींमधील ओलसरपणामुळे डाग आणि रंगाचे पोपडे निघणे हे तर होतेच, शिवाय बुरशीच्या वाढीमुळे आरोग्याला ही धोका निर्माण होतो. योग्य सिमेंट वॉटरप्रूफिंग, विशेषत: भिंतींमधील ओलसरपणा रोखणारे स्फटिकीय मिश्रणासारखे तंत्र, कोरडे आणि आरोग्यकारक राहणी वातावरण सुनिश्चित करते.



निष्कर्षअंती, सिमेंट वॉटरप्रूफिंग अनेक फायदे प्रदान करते जे निव्वळ पाण्याचे नुकसान टाळण्याच्या पलीकडे जातात. यात एक छोटी प्रारंभिक गुंतवणूक समाविष्ट आहे परंतु आपल्या वास्तूचे जतन करून, महागड्या दुरुस्तीस प्रतिबंधित करून आणि संरचनेचे आयुष्य वाढवून दीर्घकालीन फायदे ते देतात. आपल्या वास्तुच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन वर चर्चा केलेल्या योग्य प्रकारच्या वॉटरप्रूफिंग पद्धतींमधून निवड करणे महत्वाचे असते.



वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 

1. सिमेंट वॉटरप्रूफिंग किती काळ टिकते?

साधारण, वापरल्या जाणार्‍या वॉटरप्रूफिंगच्या प्रकारावर आणि एकंदरीत देखभालीवर अवलंबून राहून सिमेंट वॉटरप्रूफिंग 5 ते 10 वर्षे टिकू शकते. तथापि, पर्यावरणीय परिस्थिती आणि अनुप्रयोगाच्या गुणवत्तेवर आधारित राहून हे बदलू शकते.

 

2. प्लास्टर करण्यापूर्वी सिमेंट वॉटरप्रूफिंग केले जाते का?

हो. सिमेंट वॉटरप्रूफिंग सहसा प्लास्टर करण्यापूर्वी केले जाते. वॉटरप्रूफिंग थर पाण्याच्या गळतीविरूद्ध अडथळा म्हणून कार्य करतो, ज्यामुळे पाणीला प्लास्टरथरापर्यंत पोहोचण्यापासून रोखले जाते.

 

3. सिमेंट वॉटरप्रूफिंग वाळायला/कोरडे होण्यास किती वेळ लागतो?

वापरल्या जाणार्‍या वॉटरप्रूफिंग मटेरियलचा प्रकार आणि पर्यावरणीय घटकांवर अवलंबून सिमेंट वॉटरप्रूफिंगची वाळण्याची वेळ बदलू शकते. तथापि, ते पूर्णपणे कोरडे होण्यास सामान्यत: सुमारे 24 ते 48 तास लागतात.

 

4. वॉटरप्रूफिंगसाठी कोणत्या ग्रेडचे सिमेंट वापरले जाते?

वॉटरप्रूफिंगसाठी वापरले जाणारे सिमेंट सामान्यत: ग्रेड 43 किंवा 53 चे ओपीसी (ऑर्डिनरी पोर्टलंड सिमेंट) किंवा पीपीसी (पोर्टलंड पोझोलाना सिमेंट) असते.

 

5. छतासाठी सिमेंट वॉटरप्रूफिंग चा वापर करता येईल का?

होय, छतासाठी सिमेंट वॉटरप्रूफिंगचा वापर केला जाऊ शकतो. तथापि, वापरल्या जाणार्‍या विशिष्ट प्रकारची वॉटरप्रूफिंग ही छताच्या मटेरियल आणि संरचनेवर अवलंबून असेल. बिटुमिनस मेम्ब्रेन वॉटरप्रूफिंग आणि लिक्विड वॉटरप्रूफिंग मेम्ब्रेन सामान्यत: छतांसाठी वापरले जातात.


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ





घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....