Share:
Home Building Guide
Our Products
Useful Tools
Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost
Share:
या इको-फ्रेंडली दृष्टिकोनाचा घर बांधण्याच्या प्रत्येक टप्प्यात समावेश असतो, ते कसे डिझाइन केले गेले आहे यापासून ते त्यात वापरलेल्या मटेरियलपर्यंत आणि अगदी अंतर्भागातील उपकरणांपर्यंत देखील. पारंपारिक बांधकाम पद्धतींच्या तुलनेत पर्यावरणावर कमी परिणाम करणारी घरे निर्माण करणे हे एक इको-फ्रेंडली घरबांधणीचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही घरे संसाधनांचा वापर कशा प्रकारे करतात याची खात्री करून घेत असतांना हे केले पाहिजे.
हरित घर बांधकाम पद्धती महत्त्वपूर्ण फायदे देऊ करतात. बांधकामापासून ते नूतनीकरणापर्यंत विविध टप्प्यांवर संबंधित हरित घर बांधकाम संकल्पना घरांमध्ये समाविष्ट केल्या जाऊ शकतात. तथापि, जेव्हा आर्किटेक्ट आणि डिझाइनर प्रकल्पाच्या सुरुवातीलाच या पद्धतींचा अवलंब करतात तेव्हा अशा बांधकामाचे सर्वात जास्त फायदे लक्षात येतात. घर बांधणी प्रकल्पासाठी ग्रीन बिल्डिंग(हरित घर)चे काही फायदे हे आहेत:
ग्रीन बिल्डिंगचा सर्वात लक्षणीय फायदा म्हणजे तिचा पर्यावरणावर होणारा सकारात्मक परिणाम. पाण्याचा वापर कमी करून आणि जीवाश्म इंधनासारख्या अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरील अवलंबित्व कमी करून, ग्रीन बिल्डिंग आपल्या वातावरणाचे आणि नैसर्गिक परिसराचे रक्षण करण्यास मदत करतात. इको-फ्रेंडली(पर्यावरणपूरक) घरबांधणीमुळे पाण्याचा अपव्यय तर कमी होतोच, शिवाय जल संसाधनात सुधारणा होऊन नैसर्गिक साहित्या(मटेरियल)चे जतन होते.
पर्यावरणपूरक होणे हे एक स्मार्ट आर्थिक पर्याय देखील आहे. यामुळे कमी ऑपरेशनल खर्च, रहिवाशांची उत्पादकता वाढणे आणि युटिलिटी(सेवासुविधा) बिल कमी होणे असे विविध खर्चबचतीचे फायदे मिळतात. शिवाय, यामुळे ऑपरेशनल खर्चामध्ये बचत झाल्यामुळे गुंतवणुकीवरील परतावा आणि आर्थिक नफा सुधारू शकतो. हरित घर आणि इमारती ह्या देखभाल करण्यास सोपे असतात, परिणामी देखभाल खर्च कमी होतो.
कमी ऊर्जेचा वापर करणाऱ्या राहण्यायोग्य इमारती तयार करण्याचे मोठे आव्हान सध्या आहे. इको-फ्रेंडली घरबांधणी प्रभावी इन्सुलेशन वापरून हे साध्य करते जे इनडोअर तापमान यथायोग्य ठेवते. ऊर्जा वाचविण्यासाठी आणि इमारतीला राहण्यासाठी किंवा काम करण्यासाठी अधिक आरामदायक बनविण्यासाठी ते स्मार्ट वातानुकूलन, नैसर्गिक प्रकाश आणि अगदी ग्रीन रुफचा देखील वापर करतात.
इथे एक चरण-दर-चरण मार्गदर्शक दिले आहे जे हरित घर बांधकाम करण्याच्या प्रक्रियेची रूपरेषा देते:
आपल्या हरित घराद्वारे आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे हे ठरवा. ऊर्जेची बचत, पर्यावरणपूरक असणे आणि कार्बन फूटप्रिंट कमी करणे याबद्दल विचार करा.
अशी स्थान निवडा जिथे आपले घर सूर्यप्रकाश आणि वारा यासारख्या नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करू शकेल. आपल्या घराची रचना अशी करा जेणेकरून ते उन्हामुळे उबदार होईल आणि हवेमुळे थंड होईल आणि जास्त तापन किंवा वातानुकूलनाची आवश्यकता नसेल.
आपल्या घराची इको फ्रेंडली इमारत बांधतांना हरित घर बांधण्याविषयी माहिती असणारा आर्किटेक्ट किंवा डिझायनर नियुक्त करणे आवश्यक आहे. ते नैसर्गिक प्रकाश आणि हवेचा चांगला वापर करणारे डिझाइन तयार करण्यात मदत करतील. तसेच, आपले घर चांगले इन्सुलेटेड आहे आणि उर्जा बचत करण्यासाठी योग्य ठिकाणी खिडक्या आहेत याची खात्री करा.
पुनर्प्राप्त लाकूड, पुनर्वापर(रिसायकल) केलेले स्टील आणि कमी व्हीओसी असलेले रंग वापरा. हे आपल्यासाठी आणि पृथ्वीसाठीही चांगले आहेत.
पाण्याची बचत करण्यासाठी कमी प्रवाह असलेले नळ, शॉवरहेड आणि टॉयलेट बसवावेत. पावसाचे पाणी बाहेर गोळा करा आणि कमी पाणी वापरण्यासाठी आपल्या लँडस्केपिंगमध्ये दुष्काळ प्रतिरोधक झाडी लावा.
स्मार्ट सिस्टम वापरा जी आपल्याला आपल्या फोनमधूनच हीटिंग, कूलिंग, लाइटिंग आणि सेक्युरिटी नियंत्रित करण्यास अनुमती देतात. हे सोयीस्कर आहे आणि आपल्याला उर्जा अधिक कार्यक्षमतेने वापरण्यास मदत करते.
आपण बांधकाम करताना मटेरियल रिसायकल किंवा पुनर्वापर करण्याची योजना बनवा. इको फ्रेंडली घरबांधणीत कमी अपव्यय नेहमीच पर्यावरणासाठी चांगला मानला जातो.
दिव्यांसाठी एलईडी किंवा सीएफएल बल्ब वापरा. ते जास्त ऊर्जा वापरत नाहीत आणि जुन्या पद्धतीच्या बल्बपेक्षा अधिक काळ टिकतात.
लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंटल डिझाइन सर्टिफिकेशन (एलईईडी-लीड) सारखे ग्रीन बिल्डिंग प्रमाणीकरण मिळविण्याचा विचार करा. ते हे दर्शविते की आपले घर इको-फ्रेंडली आहे आणि आपण त्याची विक्री केल्यास त्याचे मूल्य देखील वाढवू शकतात.
शाश्वत घर बांधणीमध्ये टिकाऊ आणि पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार मटेरियल वापरणे समाविष्ट आहे जे आपले कार्बन फूटप्रिंट कमी करतात, ऊर्जेचे जतन करतात आणि अपव्यय कमी करतात. ही आहेत विचारात घ्यावयाचे काही पर्यावरण-अनुकूल घर बांधकाम मटेरियल :
अ) रिसायकल केलेला ग्लास : स्टायलिश आणि इको-फ्रेंडली लुकसाठी रिसायकल केलेल्या काचेच्या काउंटरटॉप किंवा फरश्यांचा विचार करा.
ब) पुनर्प्राप्त लाकूड: आपल्या घराला एक अद्वितीय स्वरूप देण्यासाठी फरशी, बीम आणि फर्निचरसाठी पुनर्प्राप्त लाकूडचा वापर करा.
क) नष्ट करण्यामधून वाचवलेल्या विटा आणि दगड: संसाधनांची मागणी कमी करत सोबतच आकर्षक बाह्य भिंती तयार करण्यासाठी नष्ट करण्यामधून वाचवलेल्या विटा किंवा दगडाची निवड करा.
अ) एफएससी-प्रमाणित लाकूड: जबाबदार लाकूड सोर्सिंग सुनिश्चित करण्यासाठी फॉरेस्ट स्टीवर्डशिप कौन्सिल (एफएससी) द्वारे प्रमाणित लाकूड आणि प्लायवूड बघा.
ब) बांबू : आपल्या घरातील विविध अनुप्रयोगांसाठी बांबू या वेगाने नवीकरणीय संसाधनाचा वापर करा.
अ) कमी किंवा शून्य व्हीओसी: जोमदार इनडोअर हवेच्या गुणवत्तेस प्रोत्साहन देण्यासाठी कमी किंवा शून्य अस्थिर सेंद्रिय संयुगे (व्हीओसी) असलेले रंग, अभिरंजके आणि फिनिश निवडा.
अ) लोकर, कापूस किंवा रिसायकल केलेले डेनिम: प्रभावी आणि टिकाऊ इन्सुलेशनसाठी लोकर, कापूस किंवा रिसायकल केलेल्या डेनिमसारख्या नैसर्गिक इन्सुलेशन मटेरियलचा विचार करा.
ब) सेल्युलोज इन्सुलेशन : पर्यावरणपूरक घरबांधणीतील आणखी एक पर्याय म्हणजे रिसायकल केलेल्या वृत्तपत्रापासून बनविलेले सेल्युलोज इन्सुलेशन, जे कार्यक्षम ऊष्मीय संरक्षण प्रदान करते.
अ) दुहेरी किंवा तिहेरी-तावदान खिडक्या: उष्णता अंतरण कमी करण्यासाठी आणि ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी दुहेरी किंवा ट्रिपल-तावदान आणि लो-ई कोटिंग्स असलेल्या खिडक्या बसवा.
ब) एनर्जी स्टार रेटिंग: ऊर्जा कार्यक्षमतेच्या मानकांची पूर्तता करण्यासाठी उच्च एनर्जी स्टार रेटिंग असलेल्या खिडक्या बघा.
अ) स्वच्छ ऊर्जा निर्मिती : आपल्या घरासाठी स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा निर्माण करण्यासाठी सौर पॅनेलमध्ये गुंतवणूक करा.
ब) सौर शिंगल्स किंवा एकात्मिक छप्पर: सौंदर्यदृष्ट्या आल्हाददायक आणि ऊर्जा-कार्यक्षम छप्पर उपायासाठी सौर शिंगल्स किंवा एकात्मिक सौर छताचा विचार करा.
निष्कर्षअंती,हरित घर बांधकाम स्वीकारणे ही केवळ एक पर्यावरणीय निवड नाही; तर शाश्वत भविष्य घडवण्याचा हा एक स्मार्ट आणि जबाबदार मार्ग आहे. पर्यावरणपूरक मटेरियल आणि शाश्वत पद्धतींचा वापर करून, आपण आपले कार्बन फूटप्रिंट कमी करू शकतो, पैसे वाचवू शकतो आणि पोषक राहण्याच्या जागा तयार करू शकतो. म्हणूनच, आपण घरमालक असाल किंवा बिल्डर असाल, तर पर्यावरणपूरक घर बांधकाम निवडणे हे एक लहान पाऊल आहे जे अधिक शाश्वत आणि समृद्ध भविष्य तयार करण्यावर महत्त्वपूर्ण परिणाम करू शकते.