Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence


बीमचे प्रकार: संरचनांचा कणा समजून घेणे

बांधकामाच्या जगात, इमारती, पूल आणि इतर विविध वास्तूंना आधार देण्यासाठी बीम(तुळई) प्रमुख भूमिका बजावतात. हे आडवे किंवा उतरते संरचनात्मक घटक भार आणि बलांचे वितरण करतात, ज्यामुळे संपूर्ण संरचनेची स्थिरता आणि अखंडता सुनिश्चित होते. उंच गगनचुंबी इमारतींपासून ते बिकट पुलांपर्यंत, प्रकल्पाची एकंदरीत ताकद आणि टिकाऊपणा निश्चित करण्यासाठी त्यात वापरल्या जाणार्‍या बीमचा प्रकार महत्त्वपूर्ण ठरतो.

Share:


बांधकामाच्या जगात बीम आवश्यक आहेत, जे विविध संरचनांना आवश्यक आधार आणि स्थिरता प्रदान करतात. हे आडवे किंवा उतरते संरचनात्मक सदस्य भार आणि बलांचे वितरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, आणि संपूर्ण संरचनेची अखंडता तसेच सुरक्षितता सुनिश्चित करतात. आपण साधी निवासी इमारत डिझाइन करीत असाल किंवा एखादा बिकट पूल, कुठेही प्रकल्पाच्या एकंदरीत सामर्थ्य आणि टिकाऊपणासाठी योग्य प्रकारचे बीम निवडणे महत्वाचे असते.

 

या ब्लॉगमध्ये आपण बांधकामातील विविध प्रकारचे बीम आणि त्यांची अनोखी वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. हे आवश्यक घटक समजून घेतल्यास ते प्रभावी बांधकामांचा कणा/मुख्य आधार कसे बनतात, काळाच्या कसोटीवर ठामपणे उभे राहतात यावर प्रकाश पडेल. शेवट पर्यंत, काळाच्या कसोटीवर उभे राहून हे साधे घटक प्रभावी बांधकामांचा कणा कसे बनवतात याची सखोल माहिती आपल्याला मिळेल.



बीम स्ट्रक्चर म्हणजे काय?



बांधकामात, बीम संरचना (स्ट्रक्चर) म्हणजे एक महत्त्वपूर्ण भारवाहक घटक आहे जो उभ्या भार (वार्टिकल लोड), कर्तन बल (शियर फोर्स) आणि नमन आघूर्ण (बेंडिंग मुमेंट) यांचा प्रतिकार करतो. थोडक्यात, बीम आडवे किंवा उतरते घटक असतात जे दोन किंवा अधिक आधारांवर(टेकूंवर) विस्तारतात, आणि त्यांच्यावर लादलेल्या भाराचे वितरण करतात. त्यांचे प्राथमिक कार्य म्हणजे लादलेल्या भार आधारांवर हस्तांतरित करणे, समतोल राखणे आणि संरचनेला स्वत: च्या वजनामुळे किंवा बाह्य बलांमुळे कोसळण्यापासून रोखणे.

 

बीम प्रामुख्याने इमारती, पूल, छत आणि इतर विविध रचनांमध्ये वापरले जातात, ते उच्च सामर्थ्य आणि स्थिरता प्रदान करतात. उचित प्रकारच्या बीमची निवड विशिष्ट गरजा आणि संरचनेच्या डिझाइनवर अवलंबून असते.


बांधकामातील विविध प्रकारचे बीम

अभियंते आणि वास्तुविशारद (आर्किटेक्ट) यांनी वेगवेगळ्या गरजा भागविण्यासाठी विविध प्रकारचे बीम तयार केले आहेत. चला काही सर्वात सामान्य बीम बद्दल जाणून घेऊया :

 

 

1. कैंटिलिव्हर बीम



कॅन्टिलिव्हर बीम हा एक अनोखा प्रकारचा बीम आहे जो एका टोकाला स्थिरीभूत (अंकेरेड) जातो आणि दुसर्‍या टोकाला मोकळा असतो, जो आडवा बाहेर आलेला असतो. हे डिझाइन मोकळ्या असलेल्या टोकाला अतिरिक्त समर्थनाची आवश्यकता नसतांना देखील असमर्थित स्पॅनवर भार घेण्यास अनुमती देते. बाल्कनी आणि पूल यासारख्या संरचनेत हे बीम सामान्यत: वापरले जातात.

 

 

2. सिंपली सपोर्टेड बीम



बीमचा सर्वात सोपा आणि सर्वात सामान्यपणे वापरला जाणारा प्रकार म्हणजे फक्त समर्थित बीम. नावाप्रमाणेच याला दोन्ही टोकांना आधार दिलेला असतो आणि त्याच्या स्पॅनवर भार दिलेले असतो. भार आधारांवर हस्तांतरित केले जाते, ज्यामुळे वरच्या बाजूला लागू असणारे बले तयार होतात आणि बीम या बलांमुळे वाकण्यास (बेंडिंगला)प्रतिकार करतो. इमारतींमधील फ्लोअर बीमपासून ते पूल आणि क्रेन गर्डरपर्यंत विविध अनुप्रयोगांमध्ये हे बीम आढळतात.

 

 

3. फिक्स्ड बीम



फिक्स्ड बीम हा असा एक बीम आहे जो दोन्ही टोकांवर ठामपणे स्थिर (फिक्स्ड) आणि प्रतिरोधीत (रेस्ट्रेनेड) असतो. या प्रकारचे बीम त्याच्या आधाराच्या ठिकाणी चक्रावर्तनला (रोटेशनला) प्रतिबंधित करतात आणि बेंडिंग मुमेंटला प्रतिकार करण्यात अत्यंत प्रभावी असतात. मल्टी स्पॅन पूल आणि मोठ्या इमारती सारख्या सलग रचनांमध्ये फिक्स्ड बीम्सचा सामान्यपणे वापर केला जातो.

 

 

4. ओव्हरहँगिंग बीम

ओव्हरहँगिंग बीमचे वैशिष्ट्य म्हणजे एक किंवा दोन्ही टोके त्याच्या आधाराच्या पुढेपर्यंत/पलीकडे विस्तारीत असतात. हा अतिरिक्त विस्तार एक अधांतर (ओव्हरहँग) तयार करतो, जो डिझाइन आवश्यकतांवर अवलंबून राहून लांबीमध्ये वेगवेगळा असू शकतो. ओव्हरहँगिंग बीम्स अशा परिस्थितीत वापरले जातात जिथे बांधकामास कॅनोपी (छत) किंवा बाल्कनीसारख्या विस्तारित प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते.

 

 

5. कंटीन्यूयस बीम

कंटीन्यूयस बीम म्हणजे अनेक बीम्सचे एकत्रीकरण,जे अनेक आधारांवर असलेला अखंड असा असलेला स्पॅन(विस्तार) तयार करण्यासाठी एकत्र जोडलेले असतात. कंटीन्यूयस बीमचा प्राथमिक फायदा म्हणजे भार अधिक समानपणे वितरित करण्याची, बेंडिंग मुमेंट कमी करण्याची आणि एकंदरीत संरचनात्मक स्थिरता सुधारण्याची त्याची क्षमता. ते सामान्यत: पूल आणि मोठ्या ओपेनिंग(दरवाजा/खिडक्या) असलेल्या संरचनांमध्ये वापरले जातात.

 

 

6. प्लिंथ बीम



प्लिंथ बीम म्हणजे इमारतीच्या भूपृष्ठ पातळीवर बांधलेला एक प्रबलित काँक्रीट बीम, जो सर्व कॉलमस् (स्तंभांना) ला जोडतो. इमारतीसाठी एक स्थिर प्लॅटफॉर्म प्रदान करणे आणि इमारतीचे विषम अवसीदन (डीफारन्शियल सेटलमेंट) रोखणे हा त्याचा उद्देश आहे. जमिनीची धूप, भूकंप आणि इतर भूकंपीय क्रियाकलापांचा धोका असलेल्या भागात ते आवश्यक आहेत.



बांधकामातील बीम विविध रचनांचा कणा (बॅकबोन) म्हणून काम करतो, ज्यामुळे संरचनेला आवश्यक सामर्थ्य आणि टिकाऊपणा मिळतो. सुरक्षित आणि कार्यक्षम इमारती आणि पुलांची डिझाईन करण्यासाठी अभियंते आणि आर्किटेक्टसाठी विविध प्रकारचे बीम आणि त्यांची अद्वितीय वैशिष्ट्ये समजून घेणे महत्वाचे आहे. काळजीपूर्वकपणे उचित बीम निवडून, अभियंते त्यांच्या इमारती आणि पूल हे दिमाखात उभ्या राहतील आणि काळाच्या कसोटीवर सर्वोत्तम ठरतील याची खात्री करू शकतात.



वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 

1. सर्वात मजबूत बीम प्रकार कोणता आहे?

बीम प्रकाराची ताकद मटेरियल आणि डिझाइन यांसारख्या घटकांवर अवलंबून असते. सामान्यत: स्टील प्रबलीत (सळई असलेले) बीम उत्कृष्ट सामर्थ्य आणि भार वहन क्षमता प्रदान करतात, ज्यामुळे ते बांधकामासाठी सर्वात मजबूत पर्यायांपैकी एक बनतात. आपल्या प्रकल्पासाठी सर्वात योग्य बीम प्रकार निश्चित करण्यासाठी अभियंत्याचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते.

 

2. कोणत्या प्रकारचे बीम किफायतशीर असतात?

लहान ते मध्यम-स्पॅन संरचनांसाठी सिंपली सपोर्टेड बीम बर्‍याचदा एक सर्वात किफायतशीर निवड मानली जातात. त्यांचे बांधकाम सोपे असते आणि इतर प्रकारच्या बीमच्या तुलनेत त्यात कमी मटेरियलची आवश्यकता असते.

 

३. बीम आणि पिल्लर (कॉलम) हे एकच आहेत का?

नाही, बीम आणि पिल्लर (कॉलम म्हणून देखील ओळखले जातात) सारखे नसतात. बीम आडवे किंवा उतरते घटक असतात जे भार सहन करतात आणि आधारांवर हस्तांतरित करतात, तर पिल्लर किंवा कॉलम हे उभे घटक असतात जे बीम्सला आधार देतात आणि भार खाली पायावर हस्तांतरित करतात.

 

4. बीममधील किमान अंतर किती असते?

बीम्समधील किमान अंतर विशिष्ट बांधकाम डिझाइन आणि भार आवश्यकतांवर अवलंबून असते. तथापि, बहुतेक प्रकरणांमध्ये, अभियंते पुरेशी संरचनात्मक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी बीम्स दरम्यान कमीतकमी 3 मीटर अंतर ठेवण्याचे लक्ष्य ठेवतात.

 

5. बीमसाठी सर्वोत्तम काँक्रीट मिश्रण गुणोत्तर (मिक्स रेशीओ) काय आहे?

बीमसाठी काँक्रीट मिश्रण गुणोत्तर संरचनेच्या सामर्थ्य आणि टिकाऊपणाच्या आवश्यकतांवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे निवासी व व्यावसायिक इमारतींमध्ये बीमसाठी १ भाग सिमेंट, २ भाग वाळू आणि ३ भाग अग्रिगेट (समुच्चय) असे मिश्रण वापरले जाते


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ





घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....