Step No.1
तुमच्या घराच्या निर्माणाचा सर्वात पहिला टप्पा म्हणजे मजबूत आणि कणखर पाया/जोते घालणे होय. सर्व प्रथम स्थळावरुन दगड व डेब्रिज काढूओन टाकावा. उत्खनन सुरु करण्याआधी स्थळावरच्या पाण्याची चाचणी करुन घ्यावी आणि प्लॅनप्रमाणे आराखड्याचे रेखांकन असण्याची शाश्वती करावीए. तुमची बांधकाम टिम स्थळाचे लेव्हलिंग करेल, पाया/जोती घालण्यासाठी छिद्रे पाडेल आणि चरे खणेल.
एकदा कॉंक्रीट ओतले की, त्याला सेट होण्यासाठी सोडले पाहिजे आणि नंतर ते नीट क्युअर व्हायला हवे. क्युअरींग नंतर वॉटरप्रुफिंग आणि वाळवी प्रतिबंधक उपचार करणे यथोचित असते. अल्ट्रा टेक ILW+ डॅंप प्रुफ किंवा आर्द्रता प्रतिबंधक कोर्स घालण्यासाठी आदर्श आहे. मग तुमच्या टिमने जोत्याच्या भिंतींच्या सभोवतालचा परिसर पुन्हा चिखलाने भरला पाहिजे.