Share:
Home Building Guide
Our Products
Useful Tools
Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost
Share:
स्थापत्य विश्वातील कोणत्याही वास्तूचे बांधकाम बाइंडिंग मटेरियलशिवाय अपूर्ण असते. कोणत्याही इमारतीच्या वस्तू - विटा, दगड, फरश्या इत्यादींना बंधनकारक पेस्ट किंवा मोर्टार ची आवश्यकता असते. मोर्टार हा बांधकाम प्रक्रियेचा एक अपरिहार्य भाग आहे कारण तो बिल्डिंग ब्लॉक्समधील अंतर भरून काढतो. वेगवेगळ्या प्रकारचे मोर्टार वापरण्याचा आधार हा अनुप्रयोग, घनता आणि हेतूवर अवलंबून असतो
साधारणत: बांधकामातील मोर्टार हे पाणी, बाइंडिंग मटेरियल आणि बारीक समुच्चय(फाईन अग्रिग्रेट) (वाळू किंवा सुरखी) यांचे मिश्रण असते. वेगवेगळ्या प्रकारच्या मोर्टार मिश्रणातील घटकांचे गुणोत्तर वापरल्या जाणार्या गवंडीकाम मटेरियलचा प्रकार, आवश्यक संपीडन सामर्थ्य (कोंप्रेसिव्ह स्ट्रेन्थ) आणि अंतिम अनुप्रयोग यावर अवलंबून असते. त्याच्या अंतिम अनुप्रयोगावर अवलंबून मिक्सिंग मोर्टारचे विविध प्रकार पडतात.
नावाप्रमाणेच मोर्टार मिश्रणाच्या या वर्गीकरणात बाइंडिंग मटेरियल सिमेंट असते. सिमेंट, पाणी आणि वाळू/रेती यांच्या मिश्रणाचे प्रमाण हे स्थापित उद्दिष्ट आणि आवश्यक टिकाऊपणावर अवलंबून असते. थोडक्यात, प्रथम, सिमेंट आणि वाळूचे मिश्रण होते. त्यानंतर हळूहळू पाण्याची भर पडते. सिमेंट आणि वाळूचे प्रमाण १:२ ते १:६ यामध्ये काहीही असू शकते.
चुना हा या मोर्टार प्रकारातील प्राथमिक बाइंडिंग मटेरियल आहे. चुना दोन प्रकारचा असतो - हायड्रोलिक लाईम (पाण चुना) आणि फॅट लाईम (कळीचा चुना). कोरड्या परिस्थितीत काम करताना, कळीचा चुना हा सर्वात अनुकूल पर्याय आहे (शक्यतो वाळूच्या प्रमाणाच्या 2 ते 3 पट). तथापि, जोरदार पाऊस किंवा पाणी साचलेल्या भागात, पाण चुना हा योग्य पर्याय ठरेल (चुना-वाळू चे प्रमाण 1: 2 असेल).
जिप्सम मोर्टारमधील बंधनकारक मटेरियल हे प्लास्टर आणि मऊ वाळू असते. हे ओलसर किंवा ओल्या हवामानात खूप कमी टिकाऊपणा प्रदान करते.
जेव्हा आपण चुना आणि सिमेंट यांचे मिश्रण ब्लेंडर म्हणून आणि वाळू बारीक समुच्चय(फाईन अग्रिग्रेट) म्हणून वापरतो, तेव्हा गेज्ड मोर्टार हे परिणामी मिश्रण असते. हे दोन्ही-लाइम मोर्टार आणि सिमेंट मोर्टार पैकी सर्वोत्तम गुणधर्म घेते. चुना आवश्यक प्लास्टिसिटी जोडतो, तर सिमेंट टिकाऊपणा देतो. या मिश्रणातील सिमेंट आणि चुना गुणोत्तर १:६ ते १:९ दरम्यान असते. हे सर्वात किफायतशीर मोर्टार पर्यायांपैकी एक आहे.
चुना, सुरखी आणि पाणी यांची सांगड घातल्यास आपल्याला सुरखी मोर्टार प्राप्त होते. सुरखी एकबारीक समुच्चय(फाईन अग्रिग्रेट) म्हणून काम करते. बारीक पावडर स्वरूपातील जळलेली चिकनमाती म्हणजे सुरखी असते. ही वाळूपेक्षा मोर्टार मिश्रणात अधिक सामर्थ्य जोडते आणि बरीच स्वस्त आहे. अधूनमधून आपण अर्धा भाग वाळू आणि अर्धा सुरखी वापरू शकतो.
कमी प्लास्टिसिटीमुळे सिमेंट मोर्टारसह काम करणे अवघड ठरू शकते. तथापि, जर आपण मिश्रणात हवा-प्रवेश (एयर एंट्रेनिंग) एजंट टाकले तर त्याच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होऊ शकते. त्यामुळे एरेटेड सिमेंटचे मोर्टार विचारात घेतले जाते.
जेव्हा सिमेंट किंवा चुना अनुपलब्ध असतो, तेव्हा आपण त्यांच्या ऐवजी बाइंडिंग एजेंट म्हणून मड(चिखल) वापरू शकतो. बारीक समुच्चय(फाईन अग्रिग्रेट) म्हणून गाईचे शेण किंवा तांदळाच्या भुसा घेऊन त्यात चिखलमाती मिसळली जाते परिणामी मड मोर्टार तयार होते.
मोर्टार ज्याची ठोक घनता 15 किलोन्यूटन/घनमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असते ते भारी वजन मोर्टार ठरते. या प्रकारच्या मोर्टारमध्ये हेवी क्वार्ट्ज हे बारीक समुच्चय(फाईन अग्रिग्रेट) म्हणून असतात. दुसरीकडे, हलक्या वजनाच्या मोर्टारमध्ये, ठीक घनता 15 किलोन्यूटन/घनमीटरपेक्षा कमी असते. या मोर्टारमध्ये बाइंडर म्हणून चुना किंवा सिमेंट आणि बारीक समुच्चय(फाईन अग्रिग्रेट) म्हणून वाळू, भुसा इत्यादींचा वापर केला जातो.
जर आपण आसंजक शोधत असाल विशेषत: फरश्यांसाठी तर आपण थिन-सेट मोर्टार वापरतो, जे पातळ असते. तथापि, हे मोर्टार विटा किंवा जड दगडांसह वापरण्यास अयोग्य आहे. यात सिमेंट, वाळू आणि वॉटर रिटेन्शन(पाणी धारण) एजंट्सचा समावेश असतो. आजकाल, टाईल मॅस्टिकसह थिन-सेट मोर्टार वापरणे सामान्य आहे. टाईल मॅस्टिक हे भिंती किंवा तळाशी टाइल्स चिकटवण्यासाठीचे आसंजक आहे.
मोर्टारच्या मिश्रणामध्ये प्रगती सामान्य आहे आणि अशाच एका क्रांतिकारी उत्पादनात इपॉक्सी मोर्टारचा समावेश होतो. या मोर्टारमध्ये इपॉक्सी रेझिन, सॉल्व्हेंट्स इत्यादींचा समावेश असतो. हे मोर्टार आसंजक आणि वॉटरप्रूफ आहे. हे रंजन-प्रतिरोधक (स्टेन रेजिस्टंट) आहे आणि सिमेंट मोर्टारपेक्षा जलद वाळणारे असते, ज्यामुळे फरशीचे काम करताना ते वापरणे हा एक स्पष्ट पर्याय बनतो.
या उपविभागात अल्युमिनस सिमेंट हा महत्त्वाचा घटक आहे. तापसाही विटांची (फायर ब्रिक्स) बारीक पावडर आणि सिमेंट मिसळून अग्नि-प्रतिरोधी मोर्टार तयार केले जाते.
सिमेंट-मातवाळू(लोम), सिमेंट-वाळू किंवा कधी कधी सिमेंट-वाळू-लोम यांचे मिश्रणाने पॅकिंग मोर्टार बनते. त्याचे सामर्थ्य आणि पाण्याचा प्रतिरोध यामुळे तेलविहिरींच्या बांधकामात या बाइंडरचा वापर केला जातो.
जिप्सम, स्लॅग किंवा सिमेंट व्यतिरिक्त सिंडर आणि प्युमिक चा बारीक समुच्चय(फाईन अग्रिग्रेट) म्हणून वापर करणारे मोर्टार साउंडप्रूफिंग गुणधर्म विकसित करते आणि म्हणूनच, आपल्याला ध्वनी-शोषक मोर्टार प्राप्त होते. रासायनिक उद्भवाची शक्यता असलेल्या संरचनेसाठी, आपण रासायनिक-प्रतिरोधक मोर्टार वापरू शकतो. एक्स-रेमुळे दुष्परिणाम होतात आणि एक्स-रे खोलीच्या भिंती चांगल्या प्रकारे संरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी, हेव्ही बल्क डेन्सिटी मोर्टार (22 कीलोन्यूटन/घनमीटर) वापरण्यात येते.
बाइंडरचा वापर उपयुक्तता आणि हेतूवर अवलंबून असला, तरीही चांगल्या मोर्टारचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत:
विटा, फरश्या इत्यादी सारखे बिल्डिंग ब्लॉक्स एकत्र जोडणे हा मोर्टारचा प्राथमिक हेतू आहे. म्हणून, आसंजकता(चिकटपणा) हा मोर्टारचा एक अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे.
पावसाळी हवामानाचा सामना करण्यासाठी चांगले मोर्टार पाणी प्रतिरोधक असतात.
कोणत्याही वास्तूबांधणीचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे जास्त झीज व तुट न होता दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता. त्यामुळे कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी मोर्टार प्रीमियम दर्जाचे असावे.
मोर्टार वापरणे आणि त्यासोबत कार्य करण्यास सोपे असावे.
मोर्टार, जेव्हा उच्च दाब किंवा तापमानातील बदलांच्या संपर्कात येते तेव्हा सहजपणे विरुपित होऊ शकते. परिणामी, फरश्या किंवा इमारतीच्या पृष्ठभागांना तडे जाऊ शकतात. म्हणूनच, चांगल्या गुणवत्तेचे मोर्टार अधिक काळासाठी मजबूत जोड आणि पकड सुनिश्चित करेल.
मोर्टारचे प्राथमिक कार्य विटा किंवा दगड यांना एकत्र जोडणे(बाइंड करणे) हे आहे.
मोर्टार प्रतिकूल हवामान परिस्थिती आणि इतर माध्यम (रासायनिक उद्भव, मोठा आवाज इ.) यांच्या विरूद्ध प्रतिकार आणि सामर्थ्य सुनिश्चित करते
पातळ मोर्टार (ग्राऊट) फरश्या किंवा विटा यांच्यामधील जोड आणि जागा भरण्यास मदत करते.
निष्कर्षअंती, मोर्टार एक अष्टपैलू बांधकाम मटेरियल आहे ज्याचे विविध प्रकार आहेत, प्रत्येक प्रकार विशिष्ट गरजांसाठी डिझाइन केलेला आहे. त्याच्या विविध गुणधर्मांसह, बांधकामातील त्याची आवश्यक भूमिका, टिकाऊ संरचना तयार करण्यात त्याचे महत्त्व अधोरेखित करते. बांधकाम उद्योगात काम करणार्या प्रत्येकासाठी मोर्टार प्रकार आणि त्यांचे अनुप्रयोग समजून घेणे महत्वाचे आहे.