Share:
Home Building Guide
Our Products
Useful Tools
Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost
Share:
• मातीच्या प्रकारामुळे बांधकाम प्रकल्पांच्या स्थैर्यावर मोठा परिणाम होतो.
• वालुकामय आणि मातवाळू माती हे त्यांच्या पाणी व्यवस्थापन आणि स्थिरतेच्या गुणधर्मामुळे पाया बांधण्यासाठी उत्कृष्ट असतात.
• चिकनमाती आणि पीट माती अनुक्रमे त्यांच्या विस्तारक्षमता आणि उच्च पाणी धारणेच्या गुणधर्मामुळे आदर्श नसतात.
• उत्तम माती निवडण्यासाठी बांधकाम सुरू करण्यापूर्वी जागेची तपासणी आणि माती परीक्षण महत्वाचे आहे.
सर्व बांधकामे मजबूत आणि स्थिर मातीवर बांधली पाहिजेत. मातीचे सामर्थ्य तिच्या भौतिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असते. इमारतीखालील माती पुरेशी मजबूत नसल्यास पायाल तडे जाऊ शकतात, तो तुटू शकतो आणि परिणामी इमारत कोसळू शकते.
पाया बांधण्यासाठी मातीचे विविध प्रकार आणि त्यांचे गुणधर्म खाली दिले आहेत जे आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करतील:
बांधकामात असलेल्या विविध प्रकारच्या मातीमध्ये रेती/खडी चे कण सर्वात मोठे असतात. मोठ्या कणांमुळे या प्रकारची माती पाणी टिकवून ठेवत नाही आणि पाण्याचा निचरा लवकर होऊ देते जे इमारतींसाठी उत्तम असते. घनीकरण केलेली रेती/खडी अजून जास्त स्थिरता प्रदान करते आणि पाया तयार करण्यासाठी उत्कृष्ट आहे.
इमारतींच्या पायाभरणीसाठी मटेरियल म्हणून चिकनमाती वापरणे योग्य नाही. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आकुंचीत आणि विस्तारित होण्याच्या तिच्या प्रवृत्तीमुळे इमारतीच्या पायाला तडे किंवा भेगा पडतात. पुरेसे स्थैर्य मिळेल याची खात्री करण्यासाठी चिकनमाती(क्ले)वरील पाया सहसा जास्त खोल असतो. मातीतील सूक्ष्म कण जास्त काळ पाणी धरून ठेवतात. टोकाचे बदल(आकुंचन/विस्तारण) पायावर लक्षणीय प्रमाणात दबाव आणू शकतात.
मातवाळू हा बांधकामातील मातीचा एक उत्तम प्रकार आहे. त्यात रेती, गाळवट आणि चिकनमाती यांचा उत्तम मिलाफ/संयोग असतो. यामुळे पाया भक्कम होण्यास मदत होते. पाण्याच्या संपर्कात आल्यावर मातवाळूचे आकुंचन, विस्तारण होत नाही किंवा ती सरकत नाही. मातवाळू मातीचा एकच तोटा म्हणजे या प्रकारच्या मातीच्या रचनेत अर्धवट कुजलेले पदार्थ असण्याची शक्यता असते जे बांधकामापूर्वी फिल्टर केले पाहिजेत.
पीट माती ही दलदल आणि पाणथळ जागा यांसारख्या भागात आढळणारी माती आहे. यात प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थ आणि वनस्पतींचा समावेश आहे. त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहते ज्यामुळे ती बांधकामासाठी योग्य ठरत नाही. पीट मातीवरील पायाला तडा/भेगा जाण्याच्या धोका जास्त असतो, तो सरकू शकतो आणि त्याची वहन क्षमता कमी असते. अशा प्रकारच्या पायावर इमारत बांधल्यास नुकसान होण्याचा धोका खूप जास्त असतो.
चुनखडी, कठीण शडूची माती, वालुकाश्म इ. सर्वांची वहन क्षमता चांगली असल्याने ते पायासाठी एक आदर्श मटेरियल ठरतात. पाण्यामुळे होणार्या नुकसानीच्या बाबतीत तलशिला(दगडी मातीवरील पाया) अधिक स्थिर आणि प्रतिरोधक असतो. दगडी माती/तलशिला वर पाया बांधकाम करताना सर्वात महत्वाची लक्षात ठेवली पाहिजे ती गोष्ट म्हणजे तो चांगल्या प्रकारे सपाट आहे की नाही याची खात्री करणे.
इतके पर्याय असताना बांधकामातील मातीच्या प्रकारांचा विचार करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. प्रत्येक इमारतीचा पाया मजबूत, कार्यक्षम आणि व्यवस्थित बांधलेला असावा. ज्या प्रकारची माती वापरली जाते तिच्या गुणधर्मांनुसार पायावर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. सर्वसाधारणपणे ज्या जमिनीत खडक, रेती व खडी जास्त असते ती अधिक मजबूत असते व बदलत्या ऋतूंना तोंड देऊ शकते. पाण्याच्या संपर्कात आल्यावर फारशी विस्तारत नाही किंवा आकुंचीत होत नाही अशी माती निवडा. सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची प्रवृत्ती जास्त असते ज्यामुळे पाया सरकतो आणि त्याला तडे जातात. बांधकामासाठी चांगल्या जमिनीत मटेरियचे गंजणे टाळण्यासाठी संतुलित रासायनिकी(केमिस्ट्री) असणे आवश्यक असते.
निष्कर्षअंती, पाया बांधण्यासाठी योग्य प्रकारच्या मातीची निवड करणे हे कोणत्याही संरचनेचे स्थैर्य आणि दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मातीचे प्रत्येक प्रमुख प्रकार त्यांच्या स्वतःच्या विशिष्ट वैशिष्ट्यांसह येतात आणि अभियंते तसेच बांधकाम व्यावसायिकांसाठी हे गुणधर्म समजून घेणे आवश्यक आहे. विस्तारीत होणारी माती असो, रेताड माती असो किंवा मातवाळू माती असो, योग्य जागेची/साईटची तपासणी आणि माती परीक्षण योग्य निर्णय घेण्यासाठी अनिवार्य आहे.