Share:
Home Building Guide
Our Products
Useful Tools
Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost
Share:
• प्री-अप्रूव्ह्ड होम लोन(पूर्व-मंजुरीत गृह कर्ज)साठी अर्ज करा, आपत्कालीन निधी ठेवा आणि आपल्या बजेटचा बारकाईने हिशोब ठेवा.
• अनुभवी कंत्राटदाराची नेमणूक केल्याने आपल्या प्रकल्पाची धोरणात्मक, किफायतशीर अंमलबजावणी सुनिश्चित होते.
• एएसी ब्लॉक्स आणि स्थानिक स्त्रोत असलेले मटेरियल वापरल्याने गुणवत्तेशी तडजोड न करता खर्च लक्षणीय रित्या कमी होऊ शकतो.
• सुरक्षिततेला प्राधान्य द्या आणि कमी-खर्चीक घराचे ध्येय ठेवतानाही मटेरियलच्या गुणवत्तेशी तडजोड करू नका.
आपण कमी बजेटच्या घरबांधणीचे नियोजन सुरू करण्यापूर्वी आणि आपल्या यादीमध्ये खर्च जोडण्यापूर्वी, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कासाठी काही रक्कम बाजूला ठेवण्याची खात्री करा. बजेट काहीही असो, हे दोन शुल्क लागू होतीलच, मग आपले किफायतशीर बांधकाम तंत्र आणि घर बांधणी योजना काहीही असो.
बजेट फ्रेंडली घर बांधण्यासाठी भारतात अनेक कमी-खर्चीक घर बांधणी तंत्र उपलब्ध आहेत. नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत कमी बजेटमध्ये आपले घर बांधण्यासाठी आणि कमी-खर्चीक घर बांधणीची खात्री करण्यासाठी खाली पाच टिपा दिल्या आहेत.
पहिली आणि सर्वात महत्वाची कमी-खर्चीक बांधकाम पद्धत आणि टिप्स म्हणजे प्रत्येक गोष्टीचे आधीच नियोजन करणे. नेहमी प्री-अप्रूव्ह्ड होम लोन (पूर्व-मंजुरीत गृह कर्ज) घ्या. एखादी रक्कम निश्चित करण्यापूर्वी इंटिरिअर बद्दल विसरू नका. प्लंबिंग, फरशी बसविणे, रंगकाम, फ्लोअरिंग आणि फर्निचरचा खर्च आपल्या अंदाजित रकमेत जोडणे आवश्यक आहे. आपल्याला गृहकर्जासाठी ईएमआय किती बसेल याचा अंदाज घेण्यासाठी आपण आमचे ईएमआय कॅल्क्युलेटर वापरुन आपल्या कर्जाच्या गरजांचे सहजपणे नियोजन करू शकता. सरतेशेवटी, आपण अंदाज न घेतलेल्या खर्चांसाठी आपत्कालीन निधी बाजूला सांभाळून ठेवा.
अनुभवी कंत्राटदाराची नेमणूक केल्यास आपला खर्च नियंत्रणात राहण्यास मदत होईल. आपल्या घराच्या बांधकामात अनेक व्यक्तींचा सहभाग असतो. मालक - आपण आणि आपले कुटुंब, एक अभियंता - जो घराच्या संरचनात्मक अखंडतेचे नियोजन करतो, आर्किटेक्ट/वास्तुविशारद - जो घराचे डिझाईन(रचना) करतो, कामगार आणि मिस्त्री - जे आपले घर बांधतात आणि कंत्राटदार - जे सर्व बांधकाम क्रियाकलापांचे नियोजन करतात आणि समन्वय साधतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या घराच्या बांधणीत अविभाज्य भूमिका बजावत असते, परंतु योग्य कमी खर्चीक बांधकाम तंत्राचा वापर करून आणि अंदाजित वेळेत आणि बजेटमध्ये प्रकल्प पूर्ण होईल याची खात्री करण्यासाठी कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणेही तितकेच महत्वाचे असते.
कमी-खर्चीक इमारत बांधकाम प्रकल्पाच्या विपरीत, गृहबांधणी प्रकल्पाचे बजेट करणे सोपे असू शकते, विशेषत: बजेट ट्रॅकरसह. बजेट ट्रॅकर एक नोंदवही आहे ज्यात आपण कमी बजेटच्या घराच्या बांधकामासाठीच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा ट्रक ठेवला जातो. ट्रॅकरचा एक भाग म्हणून, आपण हे लक्षात घेतले पाहिजे:
अ) प्रकल्पाच्या एकूण खर्चाचा प्राथमिक अंदाज हा आपत्कालीन निधी म्हणून १०-१५% रक्कम बाजूला ठेवतो
ब) नियोजित अंदाजपत्रकाच्या/बजेटच्या तुलनेत आपल्या खर्चाचा वेळोवेळी ट्रॅक ठेवा जेणेकरून अनपेक्षित खर्च होणार नाही याची खात्री होईल
होम कन्स्ट्रक्शन कॉस्ट कॅल्क्युलेटर (घर बांधणी खर्च कॅल्क्युलेटर)सह आपण आपले घर बांधताना आपल्या खर्चाचे बजेटचा हिशोब करू शकता. हे कॉस्ट कॅल्क्युलेटर आपल्याला आपल्या कमी-खर्चीक घर बांधकाम प्रकल्पासाठी एक अंदाजित बजेट प्राप्त होण्यास मदत होते.
तळघराच्या भिंती आणि पार्टिशन भिंतींसाठी ऑटोक्लेव्ह एरेटेड काँक्रीट ब्लॉक्स, ज्याला एएसी ब्लॉक देखील म्हणतात, वापरले जातात. ते सिमेंट आणि अॅल्युमिनापासून बनलेले असल्याने ते हलके असतात ज्यामुळे रचनेवरील मृत भार (डेड लोड) कमी होतो ज्यामुळे आरसीसीचा खर्च कमी होतो. ते वाळवी प्रतिरोधक, साउंडप्रूफ (ध्वनिरोधक) देखील असतात आणि उष्णता तसेच थंडीविरूद्ध नैसर्गिक इन्सुलेशन प्रदान करतात.
कमी खर्चात घर कसे बांधता येईल याचा विचार करताना गरजेनुसार मटेरियल खरेदी करावे, जेणेकरून अपव्यय (वेस्टेज) आणि खर्च कमी होण्यास मदत होईल. आपण स्थानिक पातळीवर स्त्रोत असलेले बांधकाम मटेरियलचा वापर करीत आहात याची खात्री करा. स्थानिक मटेरियल वापरुन, आपण वाहतुकीचा खर्च कमी कराल आणि याचा परिणाम आपल्या एकंदरीत घर बांधणीच्या बजेटवर होईल.
आपले घर बांधण्यापूर्वी आणि बांधण्यादरम्यान आपली सर्वात मोठी चिंताम्हणजे - कमी-खर्चीक घरे सुरक्षित आहेत का? कमी खर्चात आपले घर बांधण्याची संकल्पना म्हणजे आपल्या बजेटपेक्षा खर्च जास्त होऊ नये म्हणून नियोजन करणे. आपल्याला मटेरियलच्या गुणवत्तेशी तडजोड करण्याची गरज नाही, नेहमी लक्षात ठेवा प्रमाणापेक्षा गुणवत्ता चांगली.
खाली काही कमी बजेटच्या घर बांधणी कल्पना आहेत ज्या आपल्याला आपले घर बांधण्यास मदत करू शकतात:
१) आडव्या पेक्षा उभ्या पद्धतीने बांधणे स्वस्त आहे म्हणजेच तळपातळीवर तीन खोल्या बांधण्यापेक्षा आपल्या घरात दुसरा मजला जोडणे अधिक किफायतशीर असते. खर्च वाचविण्यासाठी आपल्या भूखंडाचा चांगला वापर करा आणि आडव्या ऐवजी उभ्या पद्धतीने बांधकाम करा. उदाहरणार्थ, चार बेडरूम असलेल्या एका मजली घराऐवजी प्रत्येक मजल्यावर दोन बेडरूम असलेले दोन मजली घर बांधा.
2) तपशीलवार खातेपुस्तक नोंद ठेवणे आपल्याला केवळ आपला खर्च नियंत्रित ठेवण्यास मदत करेल असे नाही तर ते भविष्यात आर्किटेक्ट, कंत्राटदार किंवा अभियंत्याबरोबर उद्भवू शकणार्या कोणत्याही वादापासून आपले संरक्षण करेल.
३) घराची रचना करताना आपल्या कुटुंबाच्या भविष्यातील गरजा विचारात घ्या, उदा. आपल्या लहान मुलासाठी ते मोठे झाल्यानंतर वापरायची एक अतिरिक्त खोली. एकदा आपले घर बांधले गेले की त्यात कोणतीही भर घालणे महाग/अधिक खर्चाचे ठरू शकते याची खबरदारी घ्या.
शेवटी, कमी-खर्चीक घर बांधकाम सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे एकरकमी रक्कम असणे आवश्यक नाही. प्रत्येक टप्प्यानुसार आपला रोख प्रवाह समायोजित(अॅडजस्ट) करा, जेणेकरून काम पूर्ण होण्यापूर्वी आपण आपले बजेटच्या बाहेर जाणार नाहीत.
शेवटी, आपले घर हे केवळ राहण्याची जागा नाही; ती आपल्या भविष्यासाठी आणि कल्याणासाठीची गुंतवणूक आहे. म्हणून, खर्च कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवताना, सुरक्षितता, टिकाऊपणा आणि आपले नवीन घर प्रदान करत असलेल्या एकंदरीत मूल्याचे महत्त्व नेहमीच लक्षात ठेवा. योग्य मानसिकता, भारतातील अचूक कमी खर्चीक घर बांधणी तंत्र आणि सुविचारित योजनेद्वारे आपण आपल्या कमी बजेटच्या घरबांधणी प्रकल्पाला यशस्वी आणि परवडणाऱ्या वास्तवात आणू शकतात.