Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

एलिव्हेशन प्लॅन म्हणजे काय? त्यांचे महत्त्व समजून घेण्यासाठीचे एक व्यापक मार्गदर्शक

बांधकामाच्या दुनियेत स्वप्नाला सत्यात उतरविण्यामध्ये नियोजन, मोजमाप आणि तंतोतंतपणे केलेली अंमलबजावणी समाविष्ट असते. कोणत्याही बांधकाम प्रकल्पाचा कणा असलेल्या मूलभूत पैलूंपैकी एक म्हणजे "एलिव्हेशन प्लॅन". हा प्लॅन एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे जो वास्तुविशारद, बांधकाम व्यावसायिक आणि अभियंत्यांसाठी इमारतीच्या डिझाइनबद्दल एक ब्लूप्रिंट म्हणून कार्य करतो.

Share:


एलिव्हेशन प्लॅनमुळे तयार झालेली इमारत कशी दिसेल याची कल्पना येते. हे इमारतीच्या बाह्य बाजूंचे एक दृश्य प्रतिरुपण (विजुयल रिप्रेजेंटेशन) असते, जे संरचनात्मक आणि वास्तुशास्त्रीय तपशील दर्शविते. काही प्रकरणांमध्ये, हे प्लॅन्स एखाद्या इमारतीचे आतील भाग देखील दर्शवू शकतात. ज्याप्रमाणे फ्लोअर प्लॅन किंवा रिफ्लेक्टेड सिलिंग प्लॅन मध्ये इमारतीचे लेआऊट(मांडणी) दर्शविली जाते, त्याचप्रमाणे एलिव्हेशन प्लॅनमध्ये इमारतीची उंची आणि देखावा दर्शविला जातो.

 

आर्किटेक्ट, बिल्डर्स आणि ग्राहकांना इमारत एकदाची पूर्ण झाल्यावर कशी दिसेल याची कल्पना देण्यास आणि समजून घेण्यास मदत करून ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. इमारतीची बाह्य वैशिष्ट्ये आणि व्याप्ती (लांबी-रुंदी) दर्शवून, हे प्लॅन्स सुलभ बांधकाम, देखभाल आणि सुधारणा करण्यात मदत करतात. बांधकाम सुरू होण्यापूर्वी प्रकल्पात सामील प्रत्येक जण डिझाइनबद्दल समाधानी आहे याची खात्री करून ते वेळ, संसाधने आणि पैसे वाचवतात.

 

या ब्लॉगमध्ये, आपण एलिव्हेशन प्लॅन म्हणजे काय, त्याचे महत्त्व आणि बांधकाम प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात ते एक मौल्यवान घटक म्हणून कसे काम करते याबद्दल जाणून घेऊया.



एलिव्हेशन ड्रॉइंगमध्ये काय समाविष्ट केले जाते?



एलिव्हेशन ड्रॉइंग प्लॅन तयार करण्यासाठी मुख्य दरवाजा, खिडक्या, छताचे क्षेत्र, व्याप्ती (लांबी-रुंदी), लिजेंड्स  आणि स्केल (प्रमाणपट्टी) अशा विविध घटकांचा समावेश केला जातो.हे प्लॅन्स सामान्यत: उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा चार दिशीय दृश्यां/देखाव्यासाठी तयार केले जातात. एलिव्हेशन प्लॅनमध्ये सामान्यत: समाविष्ट केलेले मुख्य घटक खाली दिले आहेत:

 

1. वास्तुशास्त्रीय तपशील

हा प्लॅन इमारतीची वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्ये दर्शवितो, जसे की दर्शनी भाग डिझाइन, बाह्य फिनिशिंग, सजावटीचे घटक आणि इतर शोभेची वैशिष्ट्ये जे इमारतीच्या एकंदरीत सौंदर्य आकर्षणास हातभार लावतात.

 

2. व्याप्ती (लांबी-रुंदी)

अचूक मोजमाप आणि व्याप्ती (लांबी-रुंदी) प्लॅनमध्ये समाविष्ट केली जातात, ज्यामुळे बिल्डरांना दर्शनी भागातील प्रत्येक घटकाचा अचूक आकार आणि स्केल निश्चित करणे शक्य होते. बांधकामादरम्यान ही माहिती महत्त्वाची भूमिका बजावते.

 

3. स्केल (प्रमाणपट्टी)

ते स्केलनुसार ड्रॉ केले जातात, ज्यामुळे आर्किटेक्ट, बिल्डर आणि ग्राहक इमारतीतील विविध घटकांचे तुलनात्मक आकार आणि अंतर समजून घेऊ शकतात.

 

4. खिडक्या आणि दरवाजे

खिडक्या आणि दरवाजांची रचना, आकार आणि शैली (स्टाईल) एलिव्हेशन प्लॅनमध्ये दर्शविली जाते, ज्यामुळे हे दरवाजे खिडक्या एकंदरीत डिझाइनमध्ये कसे दिसतात याची स्पष्ट कल्पना येते.

 

5. छत डिझाइन

या प्लॅनमध्ये छत डिझाइन, त्याचा उतार, शैली(स्टाईल) आणि चिमणी किंवा स्कायलाइट्स सारखी इतर छताची वैशिष्ट्ये देखील दर्शविली जातात. हे एकंदरीत देखाव्याची कल्पना करण्यास मदत करते आणि छताच्या घटकांची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करते.

 

6. उभ्या उंची

एलिव्हेशन ड्रॉइंग मध्ये मजल्यांची संख्या, छताची उंची आणि रुफलाइनसह इमारतीची उभी व्याप्ती (लांबी-रुंदी) आणि उंची देखील दर्शविली जाते.

 

7. मटेरियल माहिती

या प्लॅनमध्ये बर्‍याचदा विटा, दगड, स्टुको किंवा साइडिंग सारख्या बाह्य भागासाठी वापरल्या जाणार्‍या मटेरियलची माहिती दिलेली असते. यामुळे बांधकामाच्या टप्प्यात बिल्डर आणि कंत्राटदारांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते.

 

8. लँडस्केपिंग आणि बाह्य वैशिष्ट्ये

काही प्रकरणांमध्ये, या प्लॅन्समध्ये बाग(गार्डन), मार्ग, ड्राइव्हवे आणि इमारतीच्या एकंदरीत सौंदर्य आकर्षणात भर घालणारे इतर बाह्य वैशिष्ट्ये यासारख्या लँडस्केपिंग घटकांचा देखील समावेश असतो.


घर बांधताना एलिव्हेशन प्लॅनचे महत्त्व



इमारतीच्या एलिव्हेशनचा विचार केला तर ह्या प्लॅन्सचे खूप महत्त्व आहे. बांधकाम प्रक्रियेत एलिव्हेशन प्लॅन का आवश्यक आहे याची विविध कारणे जाणून घेऊया:

 

1. सुलभ बांधकाम

हे प्लॅन्स इमारतीचे बाह्य तपशील, व्याप्ती (लांबी-रुंदी) आणि फिनिशिंग दर्शविणारी एक ब्लूप्रिंट म्हणून कार्य करू शकतात. ते बांधकाम टीमला डिझाइन अचूकपणे अंमलात आणण्यास मदत करतात, परिणामी बांधकाम प्रक्रिया सुलभ आणि अधिक कार्यक्षम होते.

 

2. सुलभ देखभाल

अशा प्रकारच्या प्लॅन्समुळे घरमालकांना त्यांच्या घराच्या बाहेरील बाजूस आवश्यक असलेल्या कोणत्याही समस्या किंवा दुरुस्ती ओळखणे आणि त्यांचे निराकरण करणे सोपे होते. हे सुनिश्चित करते की देखभाल प्रक्रिया अधिक व्यवस्थित आणि किफायतशीर असेल.

 

3. संसाधनांची बचत करतो

एलिव्हेशन प्लॅनच्या माध्यमातून इमारतीच्या बाह्य रचनेची स्पष्ट दृष्टी/देखावा मनात ठेवून बांधकाम करताना होणाऱ्या महागड्या चुका बिल्डरांना टाळता येतात. हे पुन:कार्य (रिवर्क) किंवा डिझाइनमध्ये बदल टाळून वेळ आणि संसाधने दोन्ही वाचवते.

 

4. सुलभ बदल

जेव्हा इमारतीमध्ये बदल किंवा जोडणी/समावेशन करण्याची आवश्यकता असते तेव्हा हे प्लॅन्स विशेषतः मौल्यवान ठरतात. खोली विस्तारीत करणे असो, खिडकी वाढविणे असो किंवा रुफलाइन बदलणे असो, हा प्लॅन अचूक आणि सुसंगत बदल करण्यासाठी एक संदर्भ बिंदू म्हणून कार्य करतो.

 

5. सुलभ सुगमता (अॅक्सेसीबीलिटी)

एलिव्हेशन ड्रॉइंग तयार करताना सुलभ सुगमता (अॅक्सेसीबीलिटी) ही लक्षात घ्यावयाची एक महत्वाची गोष्ट आहे. ओव्हरहँगच्या बांधकामास कठीण करू शकणार्‍या किंवा इमारतीच्या सभोवतालच्या हालचालींमध्ये अडथळा आणू श्कणार्‍या, सध्या अस्तित्वात असलेल्या भिंती किंवा झाडांचा समावेश करून, एलिव्हेशन प्लॅन हा मालक किंवा बिल्डरला कोणत्याही संभाव्य समस्यांचा अंदाज घेणे आणि त्यांचे निराकरण करणे शक्य करतो.


एलिव्हेशन ड्रॉइंग म्हणजे काय आणि एलिव्हेशन प्लॅन ड्रॉइंग काढण्याच्या पद्धती


१. मुख्य मजल्यावरील भिंतीची बेसलाइन ड्रॉ करणे

पारंपारिक पद्धतींचा वापर करून एलिव्हेशन प्लॅन तयार करण्यासाठी, आपल्याला मुख्य मजल्यावरील भिंतीची बेसलाइन ड्रॉइंग करून सुरुवात करणे आवश्यक आहे. हे आपल्या फ्लोअर प्लॅन ड्रॉइंगस् चा संदर्भ घेऊन आणि कोणत्याही भिंतींचे आडवे अंतर मोजून केले जाऊ शकते. बाह्य बाजूच्या भिंतींसाठी कोणत्याही साइडिंग मटेरियलची जाडी समाविष्ट करण्याची खात्री करा.

 

2. भिंतीची उंची निश्चित करणे

मुख्य मजल्यावरील भिंती मोजल्यानंतर, आपण बाह्य भिंतींसाठी उभ्या रेषा(वर्टिकल लाइन) ड्रॉ करणार. अपूर्ण मजल्याच्या पातळीच्या वर भिंती किती उंच असतील हे ठरविणे महत्वाचे असते. इमारतीच्या विभागातील खोल्यांच्या छताच्या उंचीचा विचार करा आणि त्यामध्ये त्याच्यावरील कोणत्याही मजल्याची किंवा छताची उंची जोडा.

 

3. खिडक्या आणि दरवाजाची आउटलाइन ड्रॉ करणे

भिंतीची उंची निश्चित केल्यानंतर, खिडक्या आणि दरवाजांची आउटलाइन ड्रॉ करा. बाहेरील दरवाजे आणि खिडक्या अचूकपणे स्थितीबद्ध करण्यासाठी आपल्या मजल्यांच्या आडव्या रेषांपासून त्यांची मोजणी करा. अचूकता सुनिश्चित करण्यासाठी, आपल्या एलिव्हेशन ड्रॉइंगमधील प्रत्येक खिडकी आणि दरवाजासाठी लांबी-रुंदी मिळविण्यासाठी स्वतंत्र खिडकी आणि दरवाजाच्या शेडुयलच संदर्भ घ्या.

 

४. छत ड्रॉ करणे

छत ड्रॉ करतांना, आपण आता आपल्या प्लॅनसाठी इच्छित रूफलाइन तयार करू शकता. इच्छित स्थापत्य शैली प्राप्त करण्यासाठी गॅबल, शेड, हिप किंवा गॅम्ब्रेल सारख्या विविध छप्पर प्रकारांमधून निवड करा. तयार करण्यात येत असलेल्या बाह्य एलिव्हेशन प्लॅनमध्ये छत बाहेरील भिंतीच्या बाहेर लटकणार(ओव्हरहॅंग) की जाईल (ड्रॉप) हे लक्षात घ्या, ज्यामुळे एकसंध आणि दृष्टीस सुखावणारी डिझाईन सुनिश्चित होईल.

 

5. डेक आणि रेलिंग समाविष्ट करणे

एकदा खिडक्या, दरवाजे, छत आणि बेसिक ड्रॉइंग पूर्ण झाल्यानंतर, आपण डेक किंवा पोर्च, रेलिंग आणि पायऱ्या समाविष्ट करू शकता. आपला मुख्य मजला आणि घराभोवतीच्या लँडस्केपिंगच्या अंतिम स्तर यांच्यातील उंचीचा फरक अचूकपणे मोजण्याची खात्री करा.

 

6. चर्चा करा

अभिप्राय आणि आकलन गोळा करण्यासाठी संबंधित भागधारकांसोबत प्रारंभिक ड्रॉइंगबद्दल चर्चा करा. हा सहयोगी दृष्टिकोन डिझाइनचे व्यापक पुनरावलोकन (रिव्हयू) करणे साध्य करतो आणि कोणत्याही चिंता किंवा बदलांकडे लक्ष दिले जात आहे याची खात्री करतो. त्यानंतर प्लॅनमध्ये बदल करून ड्रॉइंग सुधारता येते.

 

7. डिझाइन अंतिम करा

आवश्यक बदल आणि सूचनांचा समावेश केल्यानंतर, एलिव्हेशन ड्रॉइंगच्या डिझाइनला अंतिम रूप देण्याची वेळ आली आहे. हे सुनिश्चित करा की ते ग्राहकाच्या दृष्टीकोनाशी एकात्मित(अलाइन) आहे, बिल्डिंग कोड आणि नियमांची पूर्तता करत आहे आणि कोणत्याही विनिर्दिष्ट गरजा पूर्ण करत आहे.



निष्कर्षअंती, एलिव्हेशन प्लॅन इमारतीच्या बाह्य भागाचे अचूक दृश्यमान प्रतिरुपण प्रदान करतो. आपण घरमालक, बिल्डर किंवा आर्किटेक्ट असाल, तर इमारत प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी हे प्रतिरुपण महत्त्वपूर्ण ठरते. त्यांचे महत्त्व समजून घेतल्यास आपले स्वप्न प्रभावीपणे अस्तित्वात येऊ शकते.



वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 

१. सर्वात आधी काय येते, फ्लोअर प्लॅन की एलिव्हेशन प्लॅन?

साधारणत: डिझाइन प्रक्रियेत एलिव्हेशन प्लॅनच्या आधी फ्लोअर प्लॅन येतो. एलिव्हेशन ड्रॉइंगसाठी इमारतीच्या उंचीचे ज्ञान आवश्यक असते, जे इमारतीची फुटप्रिंट स्थापित झाल्यानंतरच निश्चित केले जाऊ शकते.

 

२. एलिव्हेशन किती प्रकार आहेत?

दर्शनी, मागच्या बाजूचे, बाजूचे आणि अंतर्गत एलिव्हेशनसह अनेक प्रकारचे एलिव्हेशन असतात. इमारतीच्या वास्तुशास्त्रीय रचनेनुसार ही एलिव्हेशन ड्रॉइंग वेगवेगळे दृष्टीकोन आणि तपशील प्रदान करतात.

 

३. घराचे चार एलिव्हेशन कोणते आहेत ?

घराच्या चार एलिव्हेशनमध्ये दर्शनी, मागच्या बाजूचा, डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूच्या एलिव्हेशनचा समावेश होतो. हे एलिव्हेशन वेगवेगळ्या दृष्टीकोनातून इमारतीच्या बाह्य भागाचे व्यापक दृश्य प्रदान करतात, ज्यामुळे डिझाइनर आणि आर्किटेक्ट रचनेची व्याप्ती (लांबी-रुंदी), वैशिष्ट्ये आणि सौंदर्यात्मक देखावा अचूकपणे चित्रित करू शकतात.


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ





घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....